12 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

12 November 2019 Current Affairs In Marathi

12 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 नोव्हेंबर 2019)

संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीवर मनमोहन सिंग नियुक्त :

 • माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचे आधीचे सदस्य दिग्विजय सिंह यांच्या जागी डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली आहे.
 • तसेच दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्तीही नायडू यांनीच केली आहे.
 • मनमोहन सिंग यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचा राजीनामा दिला होता. मनमोहन सिंग हे 1991 ते 1996 दरम्यान देशाचे अर्थमंत्री होते, तसेच सप्टेंबर 2014 ते मे 2019 दरम्यान ते अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य व राज्यसभेचे सदस्य होते. नंतर जूनमध्ये त्यांची राज्यसभेची मुदत संपली व ऑगस्टमध्ये राजस्थानातून ते राज्यसभेवर पुन्हा बिनविरोध निवडून आले.

दीपक चहरची क्रमवारीत मोठी झेप :

 • बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या दीपक चहरने आयसीसीच्या टी-20 क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे.
 • तर आपल्या आधीच्या क्रमवारीवरून 88 अंकानी झेप घेत दीपक चहर थेट 42 व्या स्थानी पोहचला आहे.
 • बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात दीपकने 3.2 षटकांत 7 धावा देऊन 6 बळी घेतले होते.
 • दीपकची ही कामगिरी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. याचसोबत टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून हॅटट्रीक नोंदवणारा दीपक पहिला गोलंदाज ठरला आहे.

आशियाई नेमबाजी स्पर्धात सौरभचा ‘रौप्यवेध’ :

 • 17 वर्षीय विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभने 244.5 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले.
 • तर उत्तर कोरियाच्या किम संग गुकने 246.5 गुण मिळवत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
 • तसेच इराणच्या फोरॉघी जावेदने (221.8 गुण) कांस्यपदक प्राप्त केले.
 • लुसेल नेमबाजी संकुलात चालू असलेल्या या स्पर्धेत सौरभ आणि अभिषेक वर्मा प्रत्येकी 583 गुणांसह अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या क्रमांकासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
 • तर आठ जणांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत अभिषेकने 181.5 गुण मिळवल्याने पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • याआधीच्या स्पर्धामध्येच सौरभ आणि अभिषेक यांनी ऑलिम्पिकमधील स्थानांची निश्चिती केली आहे.
 • 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारत आणि चीन यांनी दोन स्थानांची आधीच निश्चिती केल्याने इराण, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांना ऑलिम्पिक स्थाने देण्यात आली.

दिनविशेष:

 • 12 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक न्यूमोनिया दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा 12 नोव्हेंबर 1880 मध्ये पारनेर, जि. अहमदनगर येथे जन्म झाला.
 • समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव तथा एस.एम. जोशी यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1904 मध्ये झाला.
 • सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
 • सन 2000 मध्ये 12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.