13 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

13 November 2019 Current Affairs In Marathi

13 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 नोव्हेंबर 2019)

आंध्र प्रदेशात सर्व तेलुगु शाळा आता इंग्रजी माध्यमाच्या :

  • आंध्र प्रदेशातील तेलुगु माध्यमाच्या सर्व शाळांचे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये रूपांतर करण्यास आंध्र प्रदेश सरकारने मान्यता दिली आहे.
  • तर राज्यात पंचायत राज, महापालिका आणि सरकारी अशा तेलुगु माध्यमाच्या जवळपास 44 हजार शाळा आहेत. या निर्णयाबद्दल तेलुगु देसम पार्टी आणि भाजपने निषेध नोंदविला आहे.
  • तसेच मंडल प्रजा परिषद आणि जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी या वर्गाचे 2020-21 मध्ये, इयत्ता नववीच्या वर्गाचे 2021-22 मध्ये आणि इयत्ता दहावीच्या वर्गाचे 2022-23 या शैक्षणिक वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या
    शाळांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या वर्गासाठी आदेशाची प्रथम अंमलबजावणी करण्यात येणार आहेत.
  • तथापि, शालेय शिक्षण आयुक्त तेलुगु आणि ऊर्दू हे सक्तीचे विषय करण्याबाबत योग्य निर्णय घेणार आहेत. शिक्षणाचा अधिकार कायद्याने विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षणाचा हक्क दिला आहे त्याचे आम्ही संरक्षण करणार आहोत आणि तेलुगु भाषेला कमी लेखणार नाही, तेलुगु भाषा सक्तीचा विषय म्हणून शिकविण्यात येणार आहे., मात्र काही वर्षांत शिकविण्याचे माध्यम हे तेलुगुऐवजी इंग्रजी राहणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता स्पर्धेत आकाश त्रिपाठी देशात प्रथम :

  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) घेतलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आकाश कमलेश त्रिपाठी या विद्यार्थ्याने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • तर प्रथमच घेतलेल्या अशा प्रकारच्या या स्पर्धेत देशभरातील 1000 महाविद्यालयांतील 30,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
  • तसेच नवसारी येथील स्नेह आर. मेहता दुसर्या, तर आयआयटी जोधपूरमधील हर्षित शर्मा तिसर्या क्रमांकावर राहिला. अंतिम फेरीत 20 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना टीसीएसमध्ये संधी देण्याची तयारी दर्शविली आहे.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

  • विधानसभा निवडणुकीनंतर एखाद्या राज्यामध्ये घटनात्मक सरकार स्थापन झाले नाही तर राज्यपाल राज्यघटनेच्या भाग 18 मधील कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस शकतात. राष्ट्रपतींकडून ती शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवली जाते आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीने तसा आदेश जारी केला जातो.
  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात.
  • राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत विधानसभा निलंबित अवस्थेत राहते. ती स्थापनही झाली नसेल तर तिचे गठनही निलंबित राहते.
  • राज्यपालांच्या मदतीसाठी तीन सनदी अधिकारी सल्लागार म्हणून काम करतात. राज्याचे सर्व प्रशासन राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येते. विधानसभा जे कायदे करते ते कायदे संसदेत केले जातात.
  • संसदेच्या दोन्ही सभागृहांची संमती न मिळाल्यास राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांनी संपुष्टात येते. संसदेची संमती घेऊन एका वेळी सहा महिने अशा प्रकारे जास्तीत जास्त तीन वर्षे राष्ट्रपती राजवट लागू राहू शकते. मात्र राष्ट्रपती राजवट एक वर्षाहून अधिक काळ लागू ठेवायची असेल तर संबंधित राज्यात निवडणूक घेणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र सक्तीचे असते. देशात आधीपासूनच आणिबाणी पुकारलेली असेल तर एखाद्या राज्यातील राष्ट्रपती राजवट एक वर्षांहून जास्त काळ लागू ठेवता येऊ शकते.
  • राज्यातील शासन राज्यघटनेनुसार चालविता येण्यासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याची खात्री झाल्याने राज्यपालांनी तशी शिफारस केल्यास लागू असलेली राष्ट्रपती राजवट केव्हाही संपुष्टात आणता येते. सरकार स्थापन न होऊ
  • शकल्याने लावलेली राष्ट्रपती राजवट सरकार स्थापनेची शक्यता निर्माण होईल तेव्हा उठविता येते. लागू केलेली राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी संसदेच्या संमतीची गरज नसते.
  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल राजकीय पक्षांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावू शकतात. सर्वांत जास्त संख्या असलेल्या किंवा बहुमताचा आकडा शक्य असलेल्या राजकीय पक्षांना सत्तास्थापनेचा दावा करता येतो. त्यांना ठराविक मुदत देऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाते.
  • राष्ट्रपती राजवटीच्या काळात मंत्रिमंडळच नसते. त्यामुळे पालकमंत्री असण्याचा प्रश्नच नाही. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतात.

दिनविशेष:

  • 13 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक दयाळूपणा दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1780 मध्ये झाला होता.
  • रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी सन 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर केले.
  • महाराष्ट्राचे 5 वे व 9 वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 मध्ये झाला होता.
  • वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन सन 1921 मध्ये पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
  • सन 1931 मध्ये शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.