23 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 October 2019 Current Affairs In Marathi

23 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 ऑक्टोबर 2019)

सौरव गांगुली स्वीकारणार बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रं :

 • क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून सूत्रं स्वीकारणार आहे.
 • बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती.
 • मात्र 14 ऑक्टोबर रोजी सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे गांगुली BCCI च्या
  अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित झालं होतं. त्यानुसार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्याच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही पार पडणार आहे.
 • सौरव गांगुलीची निवड बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध झाली आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी विराजमान होणार आहे. बीसीसीआयचे माजी
  अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ हे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष असणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2019)

सातवा वेतन आयोग जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू:

 • जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारने येथील सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार मिळणारे सर्व भत्ते लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
 • जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार मिळणाऱ्या सर्व भत्त्यांचा लाभ 31 ऑक्टोबर 2019 पासून मिळेल असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
 • केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक आदेश जारी केलेत. गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेश आणि लद्दाखच्या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती देण्यात आली.

फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धात सिंधूची दमदार विजयी सलामी :

 • जगज्जेतेपदानंतर सुमार कामगिरी करणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. पाचव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिचा सहजपणे अडथळा पार केला.
 • जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला गेल्या तीन स्पर्धामध्ये दुसऱ्या फेरीचाही अडथळा पार करता आला नव्हता. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सिंधूने आश्वासक खेळ करत मिशेल हिला 21-15, 21-13 असे नमवत आगेकूच केली आहे. सिंधूचा मिशेलविरुद्धचा हा पाचवा विजय ठरला आहे.
 • सिंधूला दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 26व्या स्थानी असलेल्या सिंगापूरच्या येओ जिया मिन हिच्याशी लढत द्यावी लागेल.

समाजमाध्यमांच्या गैरवापराबाबत जानेवारीत अहवाल :

 • समाजमाध्यम प्रोफाइल आधारशी जोडण्याबाबत देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे समाजमाध्यमांच्या
  गैरवापराबाबत आपला अहवाल जानेवारी महिन्यात सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
 • समाजमाध्यम आधारशी जोडण्याबाबतच्या याचिका तीन उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची मागणी फेसबुकने केली होती. न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस
  यांच्या पीठाने फेसबुकची मागणी मान्य केली. याबाबत संबंधित सर्व प्रकरणे सरन्यायाधीशांसमोर ठेवण्याचे आदेश पीठाने रजिस्ट्रीला दिले आहेत.

दिनविशेष:

 • कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 मध्ये झाला.
 • सन 1890 मध्ये हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
 • श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1923 मध्ये झाला.
 • सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना सन 1997 मध्ये प्रदान झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.