20 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

20 November 2019 Current Affairs In Marathi

20 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 नोव्हेंबर 2019)

भारत-पाक टपालसेवा पुन्हा सुरू :

  • पाकिस्तानने भारताबरोबरची थांबवलेली टपाल सेवा पुन्हा सुरू केली आहे, मात्र पार्सल सेवा अजूनही बंदच आहे. गेले तीन महिने ही सेवा बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता.
  • जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने टपाल सेवा बंद केली होती पण ती पुन्हा सुरू करण्यात आल्याचे वृत्तपत्रातील बातम्यात म्हटले आहे.
  • 5 ऑगस्ट रोजी भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले राजनैतिक संबंध निम्न स्तरावर आणून भारतीय
    उच्चायुक्तांना मायदेशी पाठवले होते. त्याचवेळी पाकिस्तानने भारताशी दळणवळण व इतर व्यापार संबंध तोडले होते.

काटरेसॅट 3 उपग्रहाचे 25 नोव्हेंबरला प्रक्षेपण :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो येत्या 25 नोव्हेंबर रोजी काटरेसॅट-3 हा पृथ्वी प्रतिमा व नकाशा निर्मिती उपग्रह प्रक्षेपित करणार असून त्यासमवेत अमेरिकेचे 13 व्यावसायिक नॅनो उपग्रह सोडण्यात येणार आहेत.
  • उपग्रह भारताच्या पीएसएलव्ही सी 47 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात येणार असून आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे उड्डाण होणार आहे.
  • तर 25 नोव्हेंबरला सकाळी 9.28 वाजता हे प्रक्षेपण अपेक्षित असून हवामान प्रतिकूल राहिल्यास ते लांबणीवर पडू शकते.
  • तसेच काटरेसॅट हा प्रगत उपग्रह असून त्याच्या मदतीने अधिक सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील. 509 किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात येणार असून पीएसएलव्ही सी 47 प्रक्षेपकाचे हे 21 वे उड्डाण आहे.
  • पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात सहा घन इंधन मोटारी आहेत. पीएसएलव्ही सी 47 आणखी 13 व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावणार आहे, ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटा येथून होणारे हे 74 वे उड्डाण असणार आहे.

नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवराला ‘रामसर’चा दर्जा मिळणार :

  • नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर व बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लवकरच ‘रामसर’चा दर्जा मिळणार असल्याचे संकेत येथे सुरू असलेल्या पाणथळ आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मिळाले. बॉम्बे नॅचरल सोसायटी (बीएनएचएस)ने ही परिषद आयोजित केली आहे.
  • नवेगाव बांध, माहुल (शिवडी खाडी), हतनूर धरण, ठाणे खाडी, नांदूर मधमेश्वर, लोणारसह जायकवाडी धरण परिसराला ‘रामसर’चा दर्जा मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यातील नांदूर मधमेश्वर आणि लोणारला
    लवकरच संमती मिळेल, असे सूतोवाच मँग्रोव्ह फाऊंडेशनचे अप्पर प्रधान वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी केले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त दिले होते.
  • ‘रामसर’च्या यादीत भारतातील 26 पाणथळ जागांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. या दोन जागांच्या समावेशामुळे महाराष्ट्रही या यादीत झळकेल.
  • नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या 265 प्रजातींची नोंद झाली आहे.
  • रामसरमध्ये आढळणाऱ्या 148 स्थलांतरित पक्ष्यांपैकी 88 प्रजाती नांदूर मधमेश्वरमध्ये आढळतात. या अभयारण्यात एकूण 5 हजार 687 पक्षी आढळले आहेत.
  • तर हे सर्वात छोटे पक्षी अभयारण्य आहे. विविध प्रजातींच्या पक्षांचे अस्तित्व इथे आहे. सरोवरातील पाण्याचा सामू (पीएच) 10.5 असून यातील स्पुरूलिना शैवालामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहेत.

दिनविशेष:

  • 20 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बाल दिन‘ आहे.
  • म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1750 मध्ये झाला होता.
  • थॉमस अल्वा एडिसन यांनी सन 1877 मध्ये ग्रामोफोन चा शोध लावला.
  • सन 1994 मध्ये भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.