19 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

19 November 2019 Current Affairs In Marathi

19 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 नोव्हेंबर 2019)

न्यायमूर्ती शरद बोबडे झाले सरन्यायाधीश :

  • न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पदाची शपथ दिली. बोबडे यांच्या रुपाने मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे.
  • न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द 17 महिन्यांची असेल आणि ते सरन्यायाधीश पदावरून 23 एप्रिल 2021 या दिवशी निवृत्त होतील.
  • तसेच सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त झाले. सरन्यायाधीशपदी त्यांची निवड सेवाज्येष्ठतेनुसार झाली आहे. दरम्यान, न्याय संस्थेतील सर्वोच्च पदावर विराजमान होणारे न्यायमूर्ती शरद बोबडे हे चौथे महाराष्ट्रीयन व्यक्ती
    आहेत. तर त्यांच्यापूर्वी न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्रगडकर, न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह, न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचुड यांनी सरन्यायाधीशपदी काम केलं आहे.
  • 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी न्यायमूर्ती बोबडे मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. 12 एप्रिल 2013 रोजी त्यांची सर्वोच्च
    न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली.

श्रीलंकेच्या अध्यक्षपदी गोटाबाया राजपक्षे :

  • श्रीलंकेतील अध्यक्षीय निवडणुकीत युद्धकाळातील वादग्रस्त संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांची निवड झाली असून त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार साजिथ प्रेमदास यांचा पराभव केला.
  • तर रविवारी अटीतटीच्या झालेल्या या लढतीचा निकाल जाहीर करण्यात आला.
  • तर राजपक्षे घराणे हे चीनकडे झुकलेले असून सात महिन्यांपूर्वी ईस्टर संडेच्या दहशतवादी हल्ल्यात 269 लोक मारले गेल्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षा आव्हानांमुळे या प्रश्नावर कठोर भूमिका घेतलेल्या गोटाबाया राजपक्षे यांची निवड
    अध्यक्षपदी झाली आहे. राजपक्षे हे मैत्रीपाल सिरीसेना यांचे उत्तराधिकारी असतील.

एअर इंडिया, भारत पेट्रोलिअम चार महिन्यांत विकणार :

  • कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
  • देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
  • भारत पेट्रोलिअम कॉर्पोरशन लिमिटेडने (बीपीसीएल) सचिवांच्या एका गटाने ऑक्टोबरमध्ये सरकारची पूर्ण 53.29 टक्के हिस्सा विक्रीसाठी सहमती व्यक्त केली होती. बीपीसीएलचा बाजार भांडवल सुमारे 1.02 लाख कोटी रुपये आहे.
  • तर याची 53 टक्के हिश्याच्या विक्रीसह 65000 कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होईल अशी सरकारला आशा आहे.

दिनविशेष:

  • 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरूष दिन तसेच महिला उद्योजकता दिन म्हणून मानला जातो.
  • आधुनिक स्टेथॅस्कोपचे जनक ‘लिओपोल्ड अॅव्हेल ग्रुबर‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1722 मध्ये झाला होता.
  • झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 मध्ये झाला होता.
  • ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक ‘केशव चंद्र सेन‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1838 मध्ये झाला होता.
  • भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ‘इंदिरा गांधी‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 मध्ये झाला होता.
  • मुष्टीयोद्धा आणि अभिनेता ‘दारा सिंग‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1928 मध्ये झाला होता.
  • सन 1960 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Sonali redekar. says

    Very great knowladge given by you.

Leave A Reply

Your email address will not be published.