2 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2019)
भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल :
- महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे.
- तर सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.
- सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी चर्चा सुरू झाली होती.
- तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला होता. तसेच 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.
- महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कलराज मिश्रा यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहेत. बंडारू दत्तात्रय हे हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल आहेत. आरीफ मोहम्मद खान यांची केरळच्या, तर तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
मनोज नरवणे यांनी स्वीकारली लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे :
- लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर वरिष्ठ कमांडंट या नात्याने पदाच्या शर्यतीत नरवणे आघाडीवर असणार आहेत.
- तसेच लेफ्टनंट जनरल डी.अंबू शनिवारी लष्कर उपप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
- तर लष्कराच्या पूर्वेकडील कमांडचे प्रमुख म्हणून मनोज नरवणे चार हजार किलोमीटरच्या भारत-चीन सीमेवर तैनात होते. 37 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कमांडचे नेतृत्व केले आहे. जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील दहशतवादी कारवायांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आहे.
मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद
- टी-20 आणि वन-डे मालिकेत बाजी मारल्यानंतर भारताने कसोटी मालिकेवरही भारताने आपलं वर्चस्व प्राप्त केलं आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर जमैका कसोटीतही भारताने विंडीजला बॅकफूटवर ढकललं आहे.
- वेस्ट इंडिजला विजयासाठी 468 धावांचं आव्हान दिल्यानंतर, भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस यजमानांच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात यश मिळवलं आहे.
- तर दुसऱ्या डावात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1-1 बळी घेत यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. मोहम्मद शमीने या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये बळींचं दीड शतक साजरं केलं.
- शमीने आपल्या 42 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे.
- सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये बळींचं दीड शतक साजरं करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी आता तिसऱ्या स्थानावर आहे. शमीने झहीर खान आणि इशांत शर्मा यांना मागे टाकलं आहे. या यादीमध्ये कपिल देव आणि जवागल श्रीनाथ हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
ऑलिम्पिकमधील भारताचे नववे स्थान निश्चित :
- यशस्वीनी सिंह देसवालने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युक्रेनच्या ऑलिना कोस्टिव्हायशवर मात करीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले.
- याचप्रमाणे ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी भारताचे नववे स्थान निश्चित केले.
- 22 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या यशस्विनीने आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत 236.7 गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ऑलिनाने 234.8 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर सर्बियाच्या जस्मिना मिलाव्होनोव्हिचने 215.7 गुणांसह कांस्यपदक मिळवले.
जीएसटी संकलनात घट :
- ऑगस्ट महिन्यातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांखाली घसरले असून, त्यामुळे मंदीसदृश वातावरणात सरकारी महसुलातही घट होत असल्याचे स्पष्ट झाले.
- तर ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन 98 हजार 202 कोटी रुपये नोंदवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील संकलनाच्या तुलनेत ते 4.51 टक्के अधिक असले, तरी मासिक एक लाख कोटी रुपयांच्या सरकारी उद्दिष्टापेक्षा ते कमीच भरले.
- तसेच गेल्या महिन्यात केंद्रीय जीएसटी महसुलाची रक्कम 17733 कोटी, राज्य जीएसटीची रक्कम 24239 कोटी आणि एकात्मिक (इंटिग्रेटेड) जीएसटीची रक्कम 48958 कोटी रुपये उपकर संकलनाची रक्कम 7273 कोटी इतकी होती, असे निवेदनात नमूद केले आहे.
- ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन सहसा कमी असते. उत्सवी हंगामाच्या पाश्र्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यातील संकलनात वृद्धी होईल, असा अंदाज काही विश्लेषकांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जीएसटी संकलन 93 हजार 960 कोटी रुपये होते. मात्र संकलनातील तूट केंद्रासाठी डोकेदुखी ठरेल, कारण राज्यांसाठी हीतूट भरून काढण्याची जबाबदारी केंद्राचीच आहे.
- जून-जुलै 2019 या काळात जीएसटी संकलनातील तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना 27 हजार 955 कोटी रुपये अदा केल्याचे, असे अर्थ खात्यातर्फे जारी निवेदनात म्हटले आहे. करगळती थांबवण्यासाठी मंदीच्या छायेतील उद्योजकांकडून करवसुली सक्तीने करवून घेतल्यास, सरकारच्या प्रतिमेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
दिनविशेष :
- 2 सप्टेंबर 1916 मध्ये पटणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन 2 सप्टेंबर 1920 मध्ये झाले.
- व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून 2 सप्टेंबर 1945 मध्ये स्वतंत्र झाला.
- 2 सप्टेंबर 1946 मध्ये भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
- केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक 2 सप्टेंबर 1960 मध्ये झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Very helpful