1 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 September 2019 Current Affairs In Marathi

1 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 सप्टेंबर 2019)

देशात नवी वाहतूकदंड आकारणी :

  • वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना 1 सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे.
  • तर नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे.
  • अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.
  • तसेच वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे 500 रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.

वाहतूक नियम –

  • स्ते नियमांचा भंग – जुना दंड 100 रु., नवीन दंड 500 रु
  • प्रशासनाचा आदेशभंग – जुना दंड 500 रु, नवीन दंड 2,000 रु.
  • परवाना नसलेले वाहन चालवणे – जुना दंड – 500 नवीन दंड – 5,000 रु.
  • पात्र नसताना वाहन चालवणे – जुना दंड 500 रु, नवीन दंड 10,000 रु
  • वेगमर्यादा तोडणे – जुना दंड – 400 रु, नवीन दंड – 2,000 रु
  • धोकादायक वाहन चालवणे, जुना दंड – 1,000, नवीन दंड 5,000 रु
  • दारू पिऊन वाहन चालवणे – जुना दंड 2,000 रु, नवीन दंड – 10,000 रु.
  • वेगवान वाहन चालवणे – जुना दंड – 500 रु, नवीन दंड – 5,000 रु
  • विनापरवाना वाहन चालवणे – जुना दंड, 5,000 रु., नवीन दंड – 10,000
  • सीटबेल्ट नसणे – जुना दंड – 100 रु, नवीन दंड – 1,000 रु
  • दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – जुना दंड – 100 रु, नवीन दंड – 2,000 रु
  • अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंड – 10,000
  • विमा नसताना वाहन चालवणे – जुना दंड 1,000 रु, नवीन दंड – 2, 000 रु
  • अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा — 25,000 रु. दंड व मालक – पालक दोषी. 3 वर्षे तुरुंगवास.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2019)

‘आयआरसीटीसी’च्या ई-रेल्वे तिकिटांवर आजपासून पुन्हा सेवा शुल्क :

  • भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ म्हणजे आयआरसीटीसी या संस्थेने रेल्वेच्या ई-तिकिटांवर सेवा शुल्क 1 सप्टेंबरपासून पुन्हा लागू केल्याने रेल्वे प्रवास महागणार आहे. हे सेवा शुल्क आयआरसीटीसी मार्फत खरेदी केलेल्या
    तिकिटांवर लागू राहील.
  • आयआरसीटीसीने नॉन एसी (वातानुकूलित नसलेल्या) वर्गाच्या प्रत्येक तिकिटावर 15 रुपये तर एसी (वातानुकूलित) वर्गाच्या प्रत्येक तिकिटावर 30 रुपये सेवा शुल्क लागू केले आहे.
  • तर याबाबतचा आदेश आयआरसीटीसीने 30 ऑगस्टला लागू केला होता. वस्तू व सेवा कर वेगळा लागू राहील. सेवा शुल्क हे तीन वर्षांपूर्वी डिजिटल पेमेंटला उत्तेजन देण्यासाठी रद्द करण्यात आले होते. त्या वेळी नॉन एसी तिकिटांवर प्रत्येकी 20 रुपये तर एसी तिकिटांवर प्रत्येकी 40 रुपये शुल्क आकारले जात होते. या महिन्याच्या सुरुवातीला रेल्वे मंडळाने भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळास (आयआरसीटीसी) सदर सेवा शुल्क पुन्हा लागू करण्यास परवानगी दिली होती. ई-तिकिटांवर हे सेवा शुल्क लागू होणार

HAL ने बनवलेलं डॉर्नियर 228 आता युरोपियन देशांमध्ये घेणार ‘भरारी’ :

  • भारतात निर्मिती करण्यात आलेल्या डॉर्नियर 228 या ‘मेड इन इंडिया’ विमानाचा आता युरोपमध्ये वापर सुरु होऊ शकतो. नागरी उड्डाण महासंचालनालयने (डीजीसीए) 2017 च्या अखेरीस हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) द्वारा निर्मित डॉर्नियर 228 विमानास टीसी प्रमाणपत्र दिले होते. टीसी प्रमाणपत्रामुळे देशांतर्गत ऑपरेटर्सचा डॉर्नियर 228 या बहुउपयोगी हलक्या विमानाचा नागरी उड्डाणासाठी वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
  • तर आता युरोपियन युनियनच्या हवाई सुरक्षा संस्थेने डीजीसीएने दिलेल्या प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे.आता डॉर्नियरचा युरोपमध्ये व्यावसायिक उड्डाणासाठी वापर करता येऊ शकतो.
  • तसेच डॉर्नियर 228 या 19 आसनी विमानाचा आधी फक्त संरक्षण दलापुरता वापर मर्यादीत होता. पण डिसेंबर 2017 च्या अखेरीस डीजीसीएने डॉर्नियर 228 च्या व्यापारी उपयोगास मंजुरी दिली. डॉर्नियर 228 च्या व्यावसायिक वापरामुळे मोदी सरकारच्या महत्वकांक्षी उडान योजनेला बळकटी मिळेल अशी शक्यता होता.
  • कानपूरमधील एचएएलच्या वाहतूक विभागात डॉर्नियर 228 विमानाची निर्मिती केली जाते. हे एक हलके बहुउपयोगी विमान आहे. प्रवासी वाहतुकीबरोबर समुद्री सुरक्षा, टेहळणीसाठी या विमानाची निर्मिती करण्यात आली होती. हे विमान रात्रीसुद्धा उड्डाण करण्यासाठी सक्षम आहे

दिनविशेष :

  • हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 मध्ये झाला.
  • सन 1906 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.
  • पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात सन 1911 मध्ये भारत गायन समाजाची स्थापना केली.
  • 1 सप्टेंबर 1956 मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.