31 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

31 August 2019 Current Affairs In Marathi

31 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2019)

सरकारी बँकांचे महाविलीनीकरण :

  • थकीत कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सशक्त करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गतिमान करण्यासाठी गरजेची असलेली मोठी कर्जे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारने 10 सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला.
  • तर देशाच्या बँकिंग क्षेत्रात दूरगामी परिणाम करणाऱ्या या महाविलीनीकरणाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली.
  • तसेच सरकारी बँकांच्या महाविलीनीकरणामुळे देशात आता 12 मोठय़ा सार्वजनिक बँका कार्यरत राहतील. 2017 मध्ये ही संख्या 27 इतकी होती.
  • भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी असून विलीनीकरणामुळे पंजाब नॅशनल बँक ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक होणार आहे.
  • तसेच पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक यांच्या विलीनीकरणामुळे त्यांची एकत्रित उलाढाल 17.95 लाख कोटी रुपये इतकी होणार असून या तीन बँकांचा विस्तार पंजाब नॅशनल बँकेच्या दीडपट अधिक असेल.
  • बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या दोन्ही सार्वजनिक बँक म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत राहतील. सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणाची ही तिसरी फेरी आहे.
  • तर गेल्या वर्षी विजया बँक आणि देना बँकेच्या बँक ऑफ बडोदामधील विलीनीकरणाला मान्यता देण्यात आली होती. एप्रिल 2019 मध्ये ती अमलात आणली गेली.
  • त्यापूर्वी 2017 मध्ये भारतीय स्टेट बँकेत बिकानेर-जयपूर, म्हैसूर, त्रावणकोर, पटियाला आणि हैदराबाद या पाच संलग्न बँका तसेच महिला बँकेचे विलीनीकरण झाले होते.
  • पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटटल बँक आणि युनायटेड बँक (देशातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक बँक) (एकूण आर्थिक उलाढाल-17.95 लाख कोटी) (नवी बँक- पंजाब नॅशनल बँक)
  • कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक (देशातील चौथ्या क्रमांकाची सार्वजनिक बँक) (एकूण आर्थिक उलाढाल- 15.20 लाख कोटी) (नवी बँक- कॅनरा बँक)
  • युनियन बँक, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक (देशातील पाचव्या क्रमांकाची सार्वजनिक बँक) (एकूण आर्थिक उलाढाल-14.59 लाख कोटी) (नवी बँक- युनियन बँक)
  • इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक (देशातील सातव्या क्रमांकाची सार्वजनिक बँक) (एकूण आर्थिक उलाढाल-8.08 लाख कोटी ) (नवी बँक- इंडियन बँक)
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2019)

महिलांच्या बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुपटीहून अधिक :

  • भारतात महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत त्यांची शैक्षणिक पात्रता बरोबरीची असूनही दुपटीहून अधिक आहे,असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
  • ‘जेंडर इनक्लुजन इन हायरिंग इन इंडिया’ या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे,की देशात 8.7 टक्के सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत; तुलनेने
    चार टक्के पुरुषांना नोकऱ्या नाहीत.
  • तसेच महिलांचा निर्णय व त्यांची नोकरी शोधण्याची क्षमता यावर परिणाम करणारे घटक वेगळे असतात. लिंगभेदामुळे उच्च शिक्षित स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नोक ऱ्या मिळण्यास कठीण जाते.
  • भारतातील 200 प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली, त्यात 2016-2017 दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भरतीचे स्वरूप त्यातून स्पष्ट झाले.

लिव्हरपूलचा व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी :

  • लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला. गुरुवारी झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (2018-19 या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.
  • तर लिव्हरपूलला 2018-19च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता.
  • बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2012मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.

अभिषेक वर्माला सुवर्णपदक, सौरभ चौधरीला कांस्य :

  • ब्राझीलच्या रिओ दी जनेरो शहरात सुरु असलेल्ये नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे.
  • पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्ण तर सौरभ चौधरीने कांस्यपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने 244.2 तर सौरभ चौधरीने 221.9 गुणांची कमाई केली.
  • तर तुर्कीच्या इस्माईल केलेसने 243.1 गुणांसह रौप्यपदक कमावलं.
  • 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक आणि सौरभ या दोन्ही भारतीय खेळाडूंनी आपला ऑलिम्पिक प्रवेश याआधीच निश्चीत केला आहे. याव्यतिरीक्त 50 मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्यपदकाची कमाई करत ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.

दिनविशेष :

  • 31 ऑगस्ट हा दिवस बालस्वातंत्रदिन आहे.
  • मृत्युंजय कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक ‘शिवाजी सावंत‘ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 मध्ये झाला.
  • सन 1947 मध्ये 31 ऑगस्ट रोजी भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
  • पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1996 मध्ये मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाले.
  • राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते सन 1970 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Amruta pachel says

    Very nice aisehi karent affearce bhejte raho thank u

Leave A Reply

Your email address will not be published.