3 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

3 September 2019 Current Affairs In Marathi

3 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 सप्टेंबर 2019)

19 सप्टेंबरला भारताला फ्रान्सकडून मिळणार पहिले फायटर विमान :

 • बहुचर्चित राफेल फायटर विमान भारताकडे सोपवण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. फ्रान्स येत्या 19 सप्टेंबरला पहिले राफेल फायटर विमान इंडियन एअर फोर्सकडे सुपूर्द करणार आहे. फ्रान्समधील एअर फोर्सच्या तळावर होणाऱ्या छोटेखानी सोहळयामध्ये राफेलचा एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश केला जाईल.
 • तर इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा फ्रान्सला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या राफेल विमानाच्या समावेशाचा कार्यक्रम सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडयात करण्याबद्दल IAF ने फ्रान्स सरकारला आधीच कळवले होते. भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल फायटर विमानांच्या खरेदीचा करार केला आहे.
 • तसेच औपचारीक समावेशाचा कार्यक्रम झाल्यानंतर राफेल विमानांची पहिली तुकडी पुढच्यावर्षी एप्रिल-मे पर्यंत भारतात दाखल होईल. पहिल्या तुकडीत चार राफेल विमाने असतील. सप्टेंबर 2022 पर्यंत भारताला सर्वच्या सर्व 36 राफेल विमाने मिळतील.
 • 23 सप्टेंबर 2016 रोजी भारताने फ्रान्सबरोबर 59 हजार कोटी रुपयांचा 36 राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला.

आठ ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्स ताफ्यात दाखल :

 • भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आठ शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ अपाचे हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.
 • तर या हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. परिणामी भारतीय हवाई दलाची क्षमता आणि ताकद आता कैकपटीने वाढणार आहे.
 • जवळपास 280 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेणारं हे हेलिकॉप्टर त्याच्या डिझाइनमुळे रडारमध्ये सहजपणे दिसत नाही. जवळपास पावणे तीन तासांपर्यंत हवेत राहू शकणाऱ्या या हेलिकॉप्टरने दशहतवाद्याचं तळ असो किंवा लढाऊ टँक सर्व उद्ध्वस्त करता येणं शक्य आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये असते.
 • अपाचे एएच-64ई या जातीचे हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकी लष्कर वापरतं. जगातील हे सर्वात अत्याधुनिक आणि मल्टी-रोल कॉम्बॅट तसंच शक्तिशाली लढाऊ विमान आहे.
 • 1975 मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती तर 1986 मध्ये ही हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आली होती. अमेरिकेशिवाय नेदरलॅंड्स ,इजिप्त ,इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे विमानं आहेत.
 • तसेच भारतीय वायुसेनेने सप्टेंबर 2015 मध्ये 4168 कोटी रुपयांमध्ये अमेरिकेच्या बोइंग लिमिटेडसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला होता. त्यानुसार आतापर्यंत आठ हेलिकॉप्टर मिळाले आहेत, पुढील वर्षापर्यंत सर्व 22 हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील.

विक्रम लँडरपासून चंद्र काही पावलं दूर :

 • चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरपासून काल वेगळा झालेला विक्रम लँडर चंद्राच्या आणखी जवळ पोहोचला आहे. सात सप्टेंबरला मध्यरात्री 1.55 च्या सुमारास विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. अवघ्या चार सेकंदाच्या ऑपरेशनमध्ये विक्रम लँडरने चंद्राच्या नव्या कक्षेत प्रवेश केला.
 • तसेच स्वदेशी बनावटीच्या या लँडरमधील प्रोप्लशन सिस्टिम पहिल्यांदाच प्रज्वलित करण्यात आली. यापूर्वी कक्षा बदल करताना चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरची प्रोप्लशन सिस्टिम प्रज्वलित करण्यात आली होती.
 • तर ऑर्बिटर पुढचे वर्षभर चंद्राभोवती फिरत रहाणार असून चंद्रावरील भूप्रदेश, वातावरण आणि खनिज याची माहिती गोळा करणार आहे.
 • ऑर्बिटर आणि लँडरमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरु असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेमुळे चंद्राबद्दल आजवर अज्ञात असलेल्या अनेक गोष्टी जगाला समजणार आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे लँडिंग होणार असून अजूनपर्यंत कुठलाही देश चंद्राच्या या भागात पोहोचलेला नाही.
 • तर प्रग्यान हा सहा चाकी रोव्हर असून सध्या तो विक्रम लँडरमध्ये आहे. प्रग्यान रोव्हर चंद्राचा पृष्ठभाग, पाणी, खड्डे यासंबंधीची माहिती इस्रोला पाठवेल. यातून चंद्राबद्दल अज्ञात असलेल्या अनेक गोष्टींची उकल होऊ शकते.
 • लँडिंगच्यावेळी शास्त्रज्ञांसमोर चंद्रावरच्या धुळीचे आव्हान असेल. इस्रो पहिल्यांदाच अशा प्रकारे चंद्रावर लँडिंग करणार आहे.
 • विक्रम लँडरच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगनंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश बनू शकतो. याआधी अमेरिका, यूएसएसआर आणि चीनच्या यानाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे.

आधार क्रमांकाच्या मदतीने विवरणपत्र भरणाऱ्यांना आपोआप ‘पॅन’ मिळण्यास सुरुवात :

 • कुठल्याही करदात्याने आधार क्रमांक टाकून कर विवरण पत्र भरल्यास त्याला आपोआप कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजे पॅन क्रमांक देण्याची सुविधा प्राप्तिकर खात्याने आता दिली आहे. ती 1 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे, त्यामुळे पॅन क्रमांकासाठी आता वेगळी खटपट करावी लागणार नाही.
 • पॅन व आधार या दोन माहिती संचांची जोडणी केली असल्याने जेव्हा एखादी व्यक्ती आधार क्रमांक टाकून विवरण पत्र भरेल तेव्हा आपोआप आधारमधील माहिती घेऊन त्या व्यक्तीचा पॅन क्रमांक तयार होईल. याबाबतची अधिसूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 30 ऑगस्ट रोजी जारी केली आहे.
 • पॅन क्रमांकासाठी कुठलीही वेगळी कागदपत्रे करदात्याला सादर करावी लागणार नाहीत. हा नियम 1 सप्टेंबरपासून अमलात आला आहे. कर विभागाने आधार म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया कडून प्रत्येक व्यक्तीची सगळी माहिती घेतली असून त्याआधारे पॅन क्रमांक जारी केला जाणार आहे.

दिनविशेष :

 • सन 1752 मध्ये अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
 • श्रीमती अॅनी बेझंट यांनी 3 सप्टेंबर 1916 मध्ये होमरुल लीगची स्थापना केली.
 • महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 मध्ये झाला.
 • लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म 3 सप्टेंबर 1940 मध्ये झाला.
 • सन 1971 मध्ये कतारला स्वातंत्र्य मिळाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.