2 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन

2 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 फेब्रुवारी 2023)

मुकेश अंबानी बनले जगातील सर्वात श्रीमंत भारतीय:

  • भारताचे दिग्गज उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि भारतीय व्यक्ती बनले आहेत.
  • फोर्ब्स रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानींनी गौतम अदाणींना एकूण संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
  • फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे 84.3 बिलियन डॉलर्स एकूण संपत्तीसह नवव्या क्रमांकावर पोहचले आहेत.
  • तर 84.1 अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदाणी दहाव्या स्थानावर आले आहेत.
  • फोर्ब्सच्या रिअर टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार बर्नाड अरनॉल्ट आणि कुटुंब टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत अव्वलस्थानी आहेत.
  • दुसऱ्या क्रमांकावर इलॉन मस्क, तिसऱ्या स्थानी जेफ बेझोस, चौथ्या क्रमांकावर लॅरी एलिसन, पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफे, सहाव्या स्थानी बिल गेट्स, सातव्या क्रमांकावर कार्लोस स्लिम हेलू आणि कुटुंब, आठव्या क्रमांकावर लॅरी
  • पेज, यानंतर नवव्या स्थानी मुकेश अंबानी, त्यांच्यानंतर दहाव्या स्थानी गौतम अदाणी आहेत.

निर्मला सीतारामन यांच्या नावे अर्थसंकल्प सादर करण्याचा नवा विक्रम:

  • निर्मला सीतारामन या आपल्या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत ज्यांच्या नावे सलग पाचवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड नोंद झाला आहे.
  • मोदी सरकार 2.0 आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.
  • माजी अर्थमंत्री अरूण जेटली, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम , यशवंत सिन्हा, मनमोहन सिंह आणि मोरारजी देसाई यांच्या यादीत आता सहावं नाव हे निर्मला सीतारामन यांचं असणार आहे.
  • आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त वेळेला अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावे आहे.
  • 1962 ते 1969 या कालावधीत त्यांनी दहावेळा अर्थसंकल्प सादर केला.
  • त्यानंतर पी. चिदंबरम यांच्या नावे नऊवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.
  • तर प्रणव मुखर्जी आणि यशवंत सिन्हा यांच्या नावे 8 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांस झुकते माप:

  • सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. हे क्षेत्र ‘उत्पादनात’ 45 टक्के योगदान देते.
  • देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 30 टक्के योगदान देत आहे, तर निर्यातीच्या संदर्भात पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग बनले आहे.
  • देशाच्या एकूण निर्यातीत याचे योगदान सुमारे 48 टक्के आहे.
  • तर रोजगारनिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना सुमारे 110 दशलक्ष लोकांना रोजगार देतात.
  • जे भारतातील एकूण रोजगाराच्या 22-23 टक्के आहे.

आरोग्य क्षेत्राच्या तरतुदींत 13 टक्क्यांनी वाढ:

  • देशभरातील मधुमेहाचा वाढता धोका कमी करणे, सिकल सेल अ‍ॅनिमियाचे 2047 पर्यंत उच्चाटन करणे असे लक्ष्य ठेवत अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 13 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
  • 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी आरोग्य क्षेत्रासाठी 89,155 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • जगभरात सिकल सेल अ‍ॅनिमियाचा 7 कोटींहून अधिक जणांना प्रादुर्भाव झालेला आढळतो.
  • तसेच २०१४ पासून स्थापना करण्यात आलेल्या 157 वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न अशी 157 परिचारिका महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही सीतारामन यांनी केली.
  • औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यात येणार आहे. देशांतर्गत औषधनिर्माण उद्योगाने यासंदर्भात मागणी केली होती की,
  • अर्थसंकल्पात इंधन नवकल्पना व संशोधन आणि विकासासाठी मदत करण्यात यावी, ज्यामुळे औषधनिर्माण उद्योगाला चालना मिळेल. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी औषधनिर्माण संशोधनासाठी नव्या कार्यक्रमांची घोषणा केली.

‘पंतप्रधान आवास’ला 79 हजार कोटी:

  • केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक (भांडवली खर्च) 33 टक्क्यांनी वाढवून ती 10 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे.
  • तर दुसरीकडे सर्वासाठी घरे असे म्हणत पंतप्रधान आवास योजनेसाठीचा खर्च 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी रुपये करण्यात आला आहे.
  • या तरतुदींमुळे पायाभूत सुविधा, विकास क्षेत्रासह बांधकाम क्षेत्रातही आनंदाचे वातावरण आहे.
  • त्यानुसार आता या क्षेत्रात 10 लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाणार आहे.

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय:

  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला.
  • या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर 168 धावांनी मात करताना ऐतिहासिक विजय नोंदवला.
  • त्यामुळे भारतीय संघाने 2-१1 अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.
  • तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करताना एक मोठा विक्रम केला आहे.
  • टीम इंडियाचा टी-20 इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे.

सूर्या ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील तिसरा फलंदाज:

  • सूर्यकुमार यादवसाठी टी-20 क्रिकेट हा डाव्या हाताचा खेळ बनला आहे.
  • तो सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे.
  • बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-20 क्रमवारीत त्याने आणखी एक विक्रम केला आहे.
  • सूर्याने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी विराट कोहलीचा विक्रमही मोडला आहे.
  • भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले आहे.
  • रेटिंग गुणांच्या बाबतीत तो आता डेव्हिड मलानच्या सर्वोत्तमपेक्षा थोडा मागे आहे.
  • आता सूर्याने 910 रेटिंग गुण मिळवले आहेत.
  • प्रथमच कोणत्याही भारतीयाने 900 गुणांचा टप्पा ओलांडला आहे.

दिनविशेष:

  • 2 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ भूमी दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
  • स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1856 मध्ये झाला होता.
  • केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1923 रोजी झाला होता.
  • गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची सन 1957 मध्ये गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता झाली होती.
  • सन 1962 मध्ये 400 वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
  • इराणमधील रामसर येथे सन 1971 मध्ये पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.