1 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

1 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2023)

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा :

  • कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून अंगिकारण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आले नाही अथवा अधिकृतपणे कोणत्याही गीतास राज्यगीताचा दर्जा देण्यात आला नाही.
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे यासाठी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून स्विकारण्यात आले आहे.
  • हे राज्यगीत 1.41 मिनिट अवधीचे आहे.

MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार:

  • एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करावा अशी मागणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
  • दरम्यान, राज्य सरकारने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे.
  • सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात प्रथमच उष्माघात नियंत्रणासाठी कृती आराखडा:

  • उष्माघात नियंत्रणासाठी जास्त उष्ण भागातील रस्ते, इमारतीचे रंग, वृक्ष लागवडीसह इतर व्यवस्थापन कसे असावे याबाबत सध्या केंद्र सरकारकडे कोणताही ठोस आराखडा नाही.
  • मात्र आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेकडे (व्हीएनआयटी) हा आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.
  • हा आराखडा भविष्यात देशभरात वापरला जाऊ शकतो.
  • उष्माघाताचे रुग्ण व त्यामुळे होणाऱ्या मृत्यू नियंत्रणासाठी केंद्र सरकारने करोनापूर्वी नागपूर, राजकोट आणि झाशी या तीन शहरात उष्माघात व्यवस्थापनाचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे ठरवले होते.
  • त्यासाठी या शहरातील रस्ते, इमारतीच्या नकाशांसह इतरही अनेक गोष्टींवर तापमान कमी करण्याच्या दृष्टीने लक्ष दिले जाणार होते.
  • त्यासाठी दिल्लीतील ‘एनडीएमए’ संस्थेने नागपुरातील ‘व्हीएनआयटी’ संस्थेकडे उष्माघात व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.

आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टनम:

  • विशाखापट्टनम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल.
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या नवाची घोषणा केली आहे.
  • मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टनम येथे स्थलांतरित केली जाणार आहे.
  • आंध्र प्रदेश सरकारने 23 एप्रिल 2015 रोजी अमरावती शहर आपली राजधानी म्हणून घोषित केलं होतं.
  • 2020 मध्ये राज्य सरकारने तीन शहरं राजधानी म्हणून बनवण्याची योजना आणली होती.
  • ज्यामध्ये अमरावती, विशाखापट्टनम आणि कुरनूल या शहरांचा समावेश होता.
  • त्यानंतर ही योजना मागे घेण्यात आली आणि अमरावती हेच शहर आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून कायम राहिलं.

दुबईमधील अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव आता ‘हिंद सिटी’:

  • दुबईमधील अल मिन्हाद जिल्हा आणि आसपासच्या परिसराचे नाव बदलून आता हिंद सिटी असे नवे नाव देण्यात आल्याची घोषणा उपराष्ट्रपती व पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी केली.
  • अल मिन्हाद जिल्ह्या चार सेक्टरमध्ये विभागला गेलेला आहे.
  • याला अनुक्रमे हिंद 1, हिंद 2, हिंद 3 आणि हिंद 4 अशी नावे देण्यात आली आहेत.
  • दुबईमध्ये शहराचे किंवा एखाद्या स्थळाचे नाव बदलण्याची ही पहिली वेळ नाही.
  • याआधी देखील 2010 मध्ये दुबईची जगप्रसिद्ध इमारत बुर्ज दुबईचे नाव बदलण्यात आले होते.
  • अबू धाबीचे शासक आणि संयुक्त अरब अमीरातचे माजी राष्ट्रपती शेख खलीफा बिन जायद अल नाहयान यांच्या नावाने बुर्ज दुबईच्या इमारतीला बुर्ज खलीफा असे नाव दिले होते.

भारतीय महिला क्रिकेट संघाची गोलंदाज दीप्ती शर्माचा ICC T20 क्रमवारीत जलवा:

  • भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे आणि आता इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनच्या अव्वल स्थानावर लक्ष आहे.
  • 25 वर्षीय ऑफस्पिनर दीप्ती, दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिकेत नऊ विकेटसह सर्वात यशस्वी गोलंदाज, आता इंग्लंडच्या डावखुरा फिरकीपटू एक्लेस्टोनपासून केवळ 26 गुणांनी विभक्त झाली आहे.

हरमनप्रीत कौर आघाडीच्या स्पोर्ट्स ब्रँडची होणार ब्रँड अ‍ॅम्बेसेडर:

  • भारताची स्टार फलंदाज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने एका आघाडीच्या स्पोर्ट्स ब्रँडशी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून हातमिळवणी केली आहे.
  • पंजाबच्या 33 वर्षीय तेजस्वी फलंदाजाने जगातील चौथ्या जलद महिला टी20 शतकाचा विक्रम केला आहे आणि महिलांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ती भारताची एकमेव शतकवीर आहे.
  • 2017 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या खेळाडूला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
  • एक ब्रँड म्हणून, Puma नेहमी आपल्या वेळेच्या पुढे आहे आणि खेळांमध्ये महिलांना पाठिंबा देण्यासाठी, उत्सव साजरा करण्यासाठी आणि सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
  • या करारामुळे, हरमनप्रीत प्यूमाच्या विराट कोहली, केएल राहुल, करीना कपूर खान, युवराज सिंग, सुनील छेत्री अलीकडे हार्डी संधू आणि अनुष्का शर्मा यांसारख्या मोठ्या व्यक्तींच्या यादीत सामील झाली आहे.

दिनविशेष:

  • 1 फेब्रुवारी हा दिवस 2013 या वर्षीपासून ‘जागतिक बुरखा/हिजाब दिन’ म्हणून पाळला जातो.
  • सन 1884 मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
  • सुधी रंजन दास यांनी सन 1956 मध्ये भारताचे 5वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • 1 फेब्रुवारी सन 2003 रोजी अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी पडले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.