3 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

MQ-9B predator
MQ-9B predator

3 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 फेब्रुवारी 2023)

अमेरिकेकडून भारताला मिळणार लवकरच ‘हे’ शस्त्र :

 • गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये लष्करापासून ते पोलीस विभागापर्यंत ड्रोनचा वापर केला आहेत.
 • विशेषतः काही प्रमुख देशांचा भर हा लष्करी वापरासाठी तेही सशस्त्र ड्रोनच्या वापरावर राहिला आहे.
 • अमेरिकेसारख्या देशामध्ये तर लढाऊ विमानांप्रमाणे ड्रोनची स्वतंत्र स्कॉड्रन आहेत.
 • भारत अमेरिकेकडून गेली काही वर्षे ड्रोन घेण्याबाबत चर्चा करत आहे.
 • तेव्हा दोन MQ-9 Reaper हे ड्रोन अमेरिकने प्रायोगिक वापर करायला भारतीय नौदलाकडे सूपुर्त केली आहेत.
 • भाडे तत्तावर त्याचा सध्या वापर करत असून लवकरच हे ड्रोन अमेरिकेला परत केले जाणार आहे.
 • मात्र गेल्या काही दिवसांतील चर्चेनंतर MQ-9B predator हे सशस्त्र ड्रोन अमेरिकेकडून घेण्याबाबत आता शिक्कामोर्तब झालं आहे.
 • अशी एकूण 30 ड्रोन भारत घेणार आहे. लष्कर,नौदल आणि वायू दल यांना प्रत्येकी 10 ड्रोन देण्याचे नियोजन आहे.
 • जमीन आणि हवेतील लक्ष्यावर नजर ठेवत सलग 14 तास टेहेळणी करत उड्डाण करण्याची क्षमता हे या ड्रोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
 • तसंच एका दमात 1800 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमात यामध्ये आहे.
 • हवेतून हवेत मारा करु शकणारी क्षेपणास्त्रे, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब टाकण्यााची क्षमता या ड्रोनमध्ये आहे.
 • तसंच जास्तीत जास्त 480 किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेत संचार करण्याचे कौशल्य या ड्रोनमध्ये असल्याने MQ-9B predator हे सध्याच्या काळातील सर्वात घातक ड्रोन समजले जाते.

जानेवारी महिन्यात बेरोजगारीचा दर घसरला:

 • देशातील बेरोजगारीचा दर जानेवारी महिन्यात घसरला आहे.
 • मागच्या चार महिन्याती हा सर्वात कमी दर आहे.
 • आर्थिक निगरानी संस्थेने (Centre for Monitoring Indian Economy – CMIE) ही माहिती दिली आहे.
 • वर्ष 2022 मध्ये ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये बेरोजगारीच्या दराने उच्चांक गाठला होता.
 • बिगर शासकीय संस्था असलेल्या सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2023 महिन्यातला महागाईचा दर 7.14 टक्क्यांवर आला आहे.

नळाद्वारे पाणी पुरवठय़ात महाराष्ट्र देशात 13 व्या क्रमांकावर:

 • ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘जल जीवन मिशन’ या योजनेवर केंद्र व राज्य सरकारचे शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही महाराष्ट्रात डिसेंबर 2022 अखेपर्यंत 72.27 टक्के ग्रामीण कुटुंबापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करता आला.
 • संपूर्ण देशात महाराष्ट्र या योजनेत तेराव्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय पाणीपुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
 • ऑगस्ट 2019 पासून केंद्र सरकारने ‘जल जीवन मिशन’ ही योजना हाती घेतली.
 • 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठय़ाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले.

फुटबॉल खेळाडूंना जर्मनीत मिळणार प्रशिक्षण:

 • राज्यात फुटबॉल खेळाचा विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनीशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे.
 • फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लब पैकी एक आहे.
 • त्याअनुषंगाने, आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे क्रीडा नैपुण्य दाखविणाऱ्या 14 वर्षांखालील 20 खेळाडूंना जर्मनीत फुटबाॅलचे धडे मिळणार आहे.

दिनविशेष:

 • स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास 1783 मध्ये मान्यता दिली.
 • 1870 मध्ये अमेरिकेच्या संविधानातील 15 वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
 • भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे 1925 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
 • 1966 मध्ये सोव्हिएत रशियाने लूना-9 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
 • वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म 1821 मध्ये झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.