18 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

18 September 2019 Current Affairs In Marathi

18 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 सप्टेंबर 2019)

पंतप्रधान मोदी यांना गेट्स फाउंडेशनचा पुरस्कार :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील आठवडय़ात ‘ग्लोबल गोलकीपर’ पुरस्कार देऊन बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वतीने गौरवण्यात येणार आहे.
  • नेतृत्व व भारतातील स्वच्छता उद्दिष्टांची वचनबद्धता यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांना गेट्स फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • तर आतापर्यंत स्वच्छ भारत मोहिमेत 9 कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली असून 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. तसेच भारतातील 98 टक्के खेडय़ात सध्या शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून चार वर्षांपूर्वी हे प्रमाण 38 टक्के होते. बिल गेट्स फाउंडेशनने 24 सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे.

आता 70 किमी अंतरावरुनही F-16 पाडणं शक्य :

  • संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे डीआरडीओने विकसित केलेल्या अस्त्र मिसाइलमुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. अस्त्र हे एअर टू एअर हल्ला करणारे मिसाइल आहे.
  • तर इंडियन एअर फोर्सच्या सुखोई-30 एमकेआय या अत्याधुनिक फायटर विमानामधून ‘अस्त्र’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सुखोईमधून डागण्यात आलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राने हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

क्षेपणास्त्राची वैशिष्टये

  • अस्त्र हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे पहिले बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे दृष्टीपलीकडचा लक्ष्यभेद करणारे एअर तो एअर मिसाइल आहे.
  • अस्त्र ताशी 5,555 किलोमीटर वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावते.
  • अस्त्रमध्ये 70 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.
  • अस्त्र 15 किलोपर्यंत वॉरहेड म्हणजे स्फोटके वाहून नेऊ शकते.
  • अस्त्रची रचनाच लघु आणि दीर्घ पल्ला तसेच वेगवेगळया उंचीवरील लक्ष्यभेदण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.
  • अस्रची सुखोई-30 एमकेआयमधून चाचणी करण्यात आली असली तरी मिराज-2000 आणि मिग-29 विमानांमध्येही हे मिसाइल बसवण्यात येईल.
  • डीआरडीओने अस्त्रची निर्मिती 50 अन्य सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने केली आहे.
  • सुखोईला अस्त्र मिसाइलने सुसज्ज करण्यासाठी एचएएलने या फायटर विमानामध्ये काही बदल केले आहेत.
  • भविष्यात अस्त्रचा पल्ला 300 किलोमीटरपर्यंत करण्याची डीआरडीओची योजना आहे.

GSTN ने जाहीर केली नवीन जीएसटी रिटर्नची ऑनलाइन आवृत्ती :

  • सध्या चालू असलेल्या नवीन जीएसटी रिटर्न्स चाचणीचा एक भाग म्हणून वस्तू व सेवा कर नेटवर्ककडून (जीएसटीएन) नवीन रिटर्न जीएसटी एएनएक्स -1 आणि जीएसटी एएनएक्स -2 ची ऑनलाईन आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
  • तर करदात्यांची ओळख पटवण्याच्या दृष्टीकोनातून ही ऑनलाइन आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये असणाऱ्या नवीन वैशिष्ट्यांची माहिती जीएसटी पोर्टल www.gst.gov.in वर देण्यात आली आहे.
  • नवीन जीएसटी रिटर्न भरण्याच्या प्रस्तावित प्रणालीमध्ये सामान्य करदात्याला फॉर्म जीएसटी आरईटी -1 (सामान्य) (मासिक किंवा तिमाही आधारावर) किंवा (फॉर्म जीएसटी आरईटी) -2 (सहज) / फॉर्म जीएसटी रेट-3 (सुगम) (तिमाही
    आधारावर दोन्ही) दाखल करावा लागेल. या रिटर्न्सचा एक भाग म्हणून पुरवठा (एनएसटी एएनएक्स – 1) आणि आवक पुरवठा एनेक्सचर (जीएसटी एएनएक्स – 2) देखील अपलोड करावे लागतील.
  • प्रस्तावित नवीन रिटर्न सिस्टीम असलेल्या भागधारकांची ओळख करुन घेण्यासाठी आणि त्यांचा अभिप्राय / सूचना प्राप्त करण्यासाठी, नवीन रिटर्न ऑफलाइन साधनामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, ऑफलाइन टूलची चाचणी आवृत्ती यावर्षी जुलैमध्ये जीएसटी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

दिनविशेष :

  • सन 1882 मध्ये पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.
  • महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना 18 सप्टेंबर सन 1927 मध्ये करण्यात आली.
  • सन 1947 मध्ये अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए. (CIA) ची स्थापना करण्यात आली.
  • निझामाच्या सैन्याने सन 1948 मध्ये पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.
  • अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म 18 सप्टेंबर 1971 मध्ये झाला.
  • सन 1997 मध्ये महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.