17 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 September 2019 Current Affairs In Marathi

17 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2019)

PMO कडून NSA अजित डोवाल यांची कार्यकक्षा निश्चित :

 • पंतप्रधान कार्यालयाने पी.के.मिश्रा, पी.के.सिन्हा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कार्यकक्षा निश्चित केली आहे.
 • तर काही दिवसांपूर्वीच पी.के.मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव आणि पी.के.सिन्हा यांची प्रधान सल्लागार या पदांवर नियुक्ती झाली आहे. पीएमओकडून या संदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे.
 • तसेच प्रधान सचिव मिश्रा धोरणात्मक मुद्दे कार्मिक, कायदा मंत्रालयाशी संबंधित विषय, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती संदर्भात विषय हाताळतील. त्याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विषय, भ्रष्टाचार विरोधी युनिट असे महत्वाचे विषय हाताळतील.नियुक्त्यांचा विषय वगळता एनएसए अजित डोवाल यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेशी संदर्भात जबाबदारी असेल तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित असलेले धोरणात्मक विषय, संरक्षण, अवकाश, अणू ऊर्जा आणि ‘रॉ’ यांच्याशी संबंधित कामकाजावर एनएसए डोवाल लक्ष ठेवतील.
 • तर रासायनिक शस्त्रांसंदर्भात धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. त्याशिवाय नागालँडमधील फुटीरतावादी एनएससीएन बरोबर चर्चेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मिश्रा पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव होते. मागच्या आठवडयात त्यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्रा पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी मिश्रा यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

पाकिस्तानचा २०२२ पर्यंत अवकाशात अंतराळवीर पाठवण्याचा दावा :

 • आर्थिक संकटांचा सामना करावा लागणाऱ्या पाकिस्तानने अवकाशात अंतराळवीर पाठवण्याचा दावा केला.
 • भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेवरुन गरळ ओकणारे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तान 2022 पर्यंत चीनच्या मदतीने अवकाशात पहिला अंतराळवीर पाठवणार असल्याचं सांगितलं आहे. या मोहिमेची तयारी सुरु झाली असून 2020 मध्ये अवकाशात पाठवण्यासाठी अंतराळवीर निवडण्याचं काम सुरु केलं जाईल असं सांगितलं आहे.
 • इम्रान खान यांच्या सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधऱी यांनी अवकाश मोहिमेसाठी चीन मदत करत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “सुरुवातीला या मोहिमेसाठी 50 जणांची निवड करण्यात येईल.
 • यानंतर पुढच्या टप्प्यात यापैकी 25 जणांचा समावेश कऱण्यात येईल. शेवटी फक्त एका अंतराळवीराची निवड करण्यात येईल. या सर्व प्रक्रियेत पाकिस्तान हवाई दल मुख्य भूमिका बजावणार आहे”.

स्टीव्ह स्मिथचा अनोखा ‘षटकार’; अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच :

 • अ‍ॅशेस 2019 मध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली.
 • स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील 4 सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. एका सामन्यात त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. पण त्याने केलेल्या 4 सामन्यात त्याने तब्बल 774 धावा केल्या. महत्वाचे म्हणजे त्याने सलग 6 डावात 80 पेक्षा अधिक धावा केल्या. स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील सहा डावात 144, 142, 92, 211, 82 आणि 80 अशा धावा केल्या.
 • तर असे 80+ धावांचा ‘षटकार’ लगावणारा स्मिथ हा कसोटी क्रिकेटमधील केवळ दुसराच फलंदाज ठरला.
 • स्मिथच्या आधी फक्त विंडिजचे माजी खेळाडू सर एव्हर्टन वीक्स यांनीच अशी कामगिरी केली होती. तसेच सलग जास्तीत जास्त अर्धशतकी खेळी करण्याचाही त्याने विक्रम केला.

दिनविशेष :

 • 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिदिन म्हणून पाळला जातो.
 • स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 मध्ये झाला.
 • महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म 17 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
 • सन 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.