15 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

15 September 2019 Current Affairs In Marathi

15 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 सप्टेंबर 2019)

क्रिकेटवीर कपिल देव झाले ‘कुलगुरू’ :

 • भारताला 1983 साली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकूण देणारे कर्णधार कपिल देव यांची हरयाणा स्पोर्ट्स विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. हरयाणा युवा व क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
 • तर हे देशातील तिसरे क्रीडा विद्यापीठ आहे. या विद्यापीठांमध्ये गुजरात गांधीनगर येथील स्वर्निम गुजरात क्रीडा विद्यापीठ आणि चेन्नईच्या तामीळनाडू फिजिक्स एज्युकेशन व क्रीडा विद्यापीठाचा समावेश आहे. पण, पुर्णतः खेळासाठी असलेले हे पहिलेच विद्यापीठ आहे.
 • तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक करीअरच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये हरयाणा क्रीडा विद्यापीठाचे बील पास करण्यात आले.

मुंबई मेट्रोच्या संचलन, व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना :

 • मुंबई महानगर प्रदेशातील 14 मेट्रो मार्गिकांचा प्रचंड व्याप, व्यवसाय आणि वेळेवर संचलन ही महत्त्वाची जबाबदारी पेलण्यासाठी महा मुंबई मेट्रो आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडची (एमएमएमओसीएल) स्थापना नुकतीच करण्यात आली. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या कंपनीच्या स्थापनेस मान्यता दिली.
 • ही कंपनी म्हणजे एक स्वायत्त संस्था असेल. तिचे अध्यक्ष म्हणून प्राधिकरणाचे महानगर आयुक्त नियुक्त असतील. नवीन कंपनीतील 1,100 पदे भरण्यासाठी प्राधिकरणाने अर्ज मागविले आहेत. व्यवसाय, देखभाल आणि संचलनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास प्राधिकरणाला जूनमध्ये केंद्र सरकारनेही अनुमती दिली.
 • वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कार्यालयातून नव्या कंपनीचा कारभार चालेल. सर्व कॉरिडॉरचे संचलन आणि देखभाल एकाच प्राधिकरणाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. या कंपनीचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालकांकडे असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)सारख्या सार्वजनिक संचालित कंपन्यांप्रमाणेच या कंपनीचे कामकाज आय.ए.एस. दर्जाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी करतील.

दिनविशेष :

 • भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा 15 सप्टेंबर 1861 मध्ये मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म झाला.
 • 15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, जागतिक लिंफोमा जागृती दिन तसेच राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
 • सन 1935 मध्ये भारताचे पहिले पब्लिक स्कूल ‘द डून स्कूल’ सुरू झाले.
 • सन 1935 मध्ये जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
 • भारतीय सैन्याने सन 1948 मध्ये निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.
 • सन 1953 मध्ये श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
 • प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा सन 1959 मध्ये सुरू झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.