14 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

14 September 2019 Current Affairs In Marathi

14 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 सप्टेंबर 2019)

नवजात कृष्ण विवरातील गुरुत्वीय लहरी शोधण्यात यश :

  • नवजात कृष्णविवरातून बाहेर पडलेल्या गुरुत्वीय लहरी शोधण्यात संशोधकांना प्रथमच यश आले असून त्यातील चक्राकार प्रारूपामुळे कृष्णविवराचे वस्तुमान व त्याची फिरण्याची पद्धत व दिशा यावर माहिती मिळाली आहे. तसेच
    आइस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरील पुराव्यात त्यामुळे मोलाची भरही पडण्याची शक्यता आहे.
  • फिजिकल रिव्ह्य़ू लेटर्स या नियतकालिकात म्हटले आहे, की कृष्णविवराचे वस्तुमान, फि रण्याची पद्धत व गती, विद्युत भार हे प्रमुख निरीक्षणक्षम घटक असतात हे यातून दिसून आले आहे.
  • आइनस्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतात म्हटल्यानुसार ठरावीक वस्तुमान व गती असलेल्या कृष्णविवराचा क्षय हा विशिष्ट पद्धतीने होत असतो.
  • तर मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या अमेरिकी संस्थेतील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यांनी या कृष्णविवराची चक्राकार गती, वस्तुमान याबाबत अंदाज मांडला आहे. त्यात अल्बर्ट आइनस्टाइन यांनी माडलेल्या
    सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा आधार घेण्यात आला होता. आताची ही गणने यापूर्वी कृष्णविवराची जी मापने करण्यात आली होती त्याच्याशी जुळणारी आहेत.

पुढच्या चार दिवसात ‘विक्रम’बद्दल समजणार ठोस माहिती :

  • पुढच्या चार दिवसात ‘विक्रम’बद्दल ठोस माहिती समजू शकते.
  • नासाने 2009 साली चंद्रावर शोध मोहिमेसाठी पाठवलेला ऑर्बिटर 17 सप्टेंबरला विक्रमचे लँडिंग झाले त्या भागातून जाणार आहे.
  • तर या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने 40 वर्षापूर्वीच्या मानवी चंद्र मोहिमेच्या पावलाचेही फोटो पाठवले होते. त्यामुळे विक्रमची माहिती मिळण्याची शक्यता वाढली आहे.

राणी रामपालकडे भारताचे नेतृत्व :

  • आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे 27 सप्टेंबरपासून मारलो येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
  • 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान रंगणाऱ्या या दौऱ्यासाठी 18 जणींच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल.
  • जपानमधील ऑलिम्पिकपूर्व तयारी हॉकी स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघातील सविता आणि रजनी इथिमारपू यांनी आपले स्थान कायम राखले आहे.
  • तर बचावपटू दीप ग्रेस इक्का, गुरजित कौर, रीना खोखार आणि सलिमा टेटे यांनीही स्थान मिळवले आहे. मधल्या फळीत अनुभवी नमिता टोप्पो हिने दुखापतीनंतर बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन केले आहे.

क्रीडा मंत्रालय करणार 9 महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस :

  • भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला खेळाडूच्या नावाची, देशातील दुसऱ्या सर्वोच्च मानाच्या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
  • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सहा वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी बॉक्सर मेरी कोमचं नाव पद्मविभूषण पुरस्कारासाठी सुचवलं आहे. याआधी मेरी कोमला 2013 साली पद्मभूषण तर 2016 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर पद्म पुरस्कारांसाठीही क्रीडा मंत्रालयाने यंदा महिला खेळाडूंचं नावच पुढे केलं आहे.
  • जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण तर कुस्तीपटू विनेश फोगट, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू राणी रामपाल, नेमबाजपटू सुमा शिरुर, टेबल टेनिसस्टार मनिका बत्रा आणि
    ताशी-नुंगशी या जुळ्या बहिणींचं नाव पद्मश्री पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे.
  • तर 2017 साली पी.व्ही.सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं होतं, मात्र अंतिम यादीत तिला स्थान मिळू शकलं नाही. 2015 साली सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

दिनविशेष :

  • शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.
  • सन 1948 मध्ये दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.
  • 14 सप्टेंबर 1949 मध्ये हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
  • सन 1960 मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.
  • मायक्रोसॉफ्ट कंपनीने वर्ष 2000 मध्ये विंडोज एमई रिलीज केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.