10 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
10 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 सप्टेंबर 2019)
विक्रम लँडर सुस्थितीत :
- चांद्रयान 2 मधील विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून आघाती अवतरणानंतर ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर कोसळले असले तरी, त्याचे तुकडे झालेले नाहीत, ते सुस्थितीत आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्पष्ट केले.
- तसेच विक्रम लँडरमध्ये प्रज्ञान ही बग्गीसारखी गाडी आहे.
- चांद्रयानापासून 2 सप्टेंबरला वेगळ्या झालेल्या विक्रम लँडरला अलगदपणे चांद्रभूमीवर उतरवण्याचा प्रयोग 7 सप्टेंबरला करण्यात आला. तो सुरुवातीला व्यवस्थित पार पडला; पण अखेरच्या टप्प्यात लँडर चांद्रभूमीपासून दोन कि.मी. उंचीवर असताना त्याचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी व पृथ्वीवरील भूकेंद्रांशी संपर्क तुटला. जेथे हे विक्रम लँडर उतरणे अपेक्षित होते तेथेच त्याचे आघाती अवतरण झाले, असे ‘ऑर्बिटर’ने पाठवलेल्या छायाचित्रांतून दिसत आहे. लँडरचे तुकडे झालेले नाहीत, तर ते सुस्थितीत आहे.
- विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश आले तर नेमके काय घडले हे समजू शकेल. इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्रॅक)च्या चमूने या अवतरणात नेमके काय चुकले असावे याचा शोध सुरू केला आहे.
- तसेच चांद्रयान 2 मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम), रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग होते. लँडर आणि रोव्हरचा कार्यकाल एक चांद्र दिवस म्हणजे पृथ्वीवरील चौदा दिवसांइतका होता. चौदा दिवसांत लँडरशी संपर्क प्रस्थापित करणे
आवश्यक आहे, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष शिवन यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
लाभार्थीना वाटते तोपर्यंत आरक्षण ठेवावे :
- अद्याप सामाजिक आणि आर्थिक असमानता असल्यामुळे आरक्षण आवश्यक असून, जोवर त्याची गरज असल्याचे लाभार्थीना वाटते तोवर ते सुरू राहायला हवे, असे रा.स्व. संघाने सांगितले.
- देशातील मंदिरे, स्मशाने आणि पाणवठे हे कुठल्याही विशिष्ट जातींपुरते मर्यादित न राहता सर्वासाठी खुले असावे असे आमच्या संघटनेला वाटते, असे संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे म्हणाले.
- तसेच आपल्या समाजात सामाजिक आणि आर्थिक विषमता असून त्यामुळे आरक्षण आवश्यक आहे. घटनेने अनिवार्य ठरवलेल्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे संघाच्या तीन दिवसांच्या समन्वय बैठकीच्या अखेरच्या दिवशी होसबाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रशीद खानने केली इम्रान खानच्या विक्रमाशी बरोबरी :
- बांगलादेशविरूद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने यजमानांवर 224 धावांनी विजय मिळवला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा अफगाणिस्तानचा दुसरा विजय ठरला. या विजयासह कसोटी क्रिकेटचा दर्जा
मिळाल्यापासून सर्वात कमी कालावधीत दुसरा कसोटी विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी अफगाणिस्तानने बरोबरी केली. - बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा संघ सरस ठरला. 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ 205 धावाच करता आल्या. कसोटी कारकिर्दीतील सर्वात तरूण कर्णधार ठरलेल्या रशीद खानने सामन्यात अर्धशतक ठोकले आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यात 11 गड्यांना अडकवले.
- त्यासोबत त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळीही केली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्या एकाच कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी आणि 10 हून अधिक बळी टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. याशिवाय, कर्णधार म्हणून
खेळताना पहिल्यावहिल्या सामन्यातच अशी कामगिरी करणारा रशीद पहिलाच खेळाडू ठरला.
दिनविशेष :
- 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे.
- कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के.एस. रणजितसिंह यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 मध्ये झाला. तसेच यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात.
- स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 मध्ये झाला.
- सन 1966 मध्ये पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
- सन 2002 मध्ये परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा