19 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

19 September 2019 Current Affairs In Marathi

19 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 सप्टेंबर 2019)

ई-सिगारेटवर देशभरात बंदी :

 • केंद्र सरकारने ई-सिगारेटचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात घोषणा केली. धुम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरल्याचंही त्यांनी नमूद केलं.
 • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. धुम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेटला अपयश आलं असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे फॅड वाढले आहे, असं त्यांनी सांगितलं. परिणामी ई-सिगारेटचं उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक आणि जाहिरात या सगळ्यांवर बंदी घालण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 • तसेच कॅनडा आणि इंग्लंड या देशांमध्ये ई-सिगारेटवर यापूर्वीच बंदी आहे.
 • या बंदीचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा एक वर्षापर्यंत, तर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर परत उल्लंघन केल्यास तीन वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. ई-हुक्कावरही बंदीच असणार आहे,

विक्रम लँडरबद्दल ISRO जाहीर करणार रिपोर्ट :

 • चंद्रावर हार्ड लँडिंग करणाऱ्या विक्रम लँडरबद्दल माहिती मिळणे अपेक्षित आहे. कारण नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर आज विक्रमने हार्डलँडिंग केले त्या भागातून जाणार आहे. त्यावेळी नासाच्या ऑर्बिटरकडून मिळणाऱ्या फोटोंमधून विक्रम लँडरची नेमकी स्थिती स्पष्ट होईल.
 • तर पुढच्या दोन दिवसात हा अहवाल सादर होईल. या समितीच्या काही बैठका झाल्या असून त्यांनी त्यातून निष्कर्ष काढला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
 • तसेच लवकरच हा अहवाल सार्वजनिक करण्यात येईल. सात सप्टेंबरच्या रात्री विक्रमने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित होते. पण चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी नासाचीही मदत घेण्यात आली. पण अजून संपर्क होऊ शकलेला नाही.

देशभरात 2 ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंदी :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लास्टिक बंदी
  करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले असून सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
 • महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक
  पूर्णपणे बंद करण्यात येईल असं म्हटलं होतं.
 • सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पर्यावरण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

टी-20 क्रिकेटमध्ये कोहलीचा ‘विराट’ विक्रम :

 • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामन्यात आपला सहकारी रोहित शर्माला मागे टाकलं आहे. नाबाद 72 धावांची खेळी करत विराटने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याचसोबत विराट टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आपला सहकारी रोहित शर्माला दुसऱ्या स्थानी ढकललं आहे.
 • तर रोहितचा विक्रम मोडण्यासाठी विराटला सामन्यात अर्धशतकी खेळीची गरज होती. त्यातच रोहित शर्मा अवघ्या 12 धावा काढून माघारी परतल्यामुळे विराटला रोहितचा विक्रम मोडण्याची संधीच मिळाली.
 • दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 गडी राखून मात केली आहे.

विनेश फोगटला कांस्यपदक :

 • भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे.
 • 53 किलो वजनगी गटात विनेशने ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीवर 4-1 ने मात केली.
 • कझाकस्तानमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत विनेशने बुधवारी दुपारी रेपिचाजचे दोन्ही राऊंड जिंकत 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं.
 • तर या कामगिरीसह 2020 टोकियो ऑलिम्पिकला पात्र होणारी विनेश पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.

दिनविशेष :

 • भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा 19 सप्टेंबर 1965 रोजी क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म झाला.
 • सन 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
 • गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना सन 2001 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.
 • सन 2007 मध्ये टी-20 क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.