15 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
15 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 जानेवारी 2023)
महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा:
- पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला.
- नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले.
- दरम्यान, अंतिम सामना सुरू होण्या अगोदर या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना एक आनंदाची बातमी दिली.
- भाषणात त्यांनी राज्य सरकारने कुस्तीपटूंचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले.
- राज्यात ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धा यामध्ये जे खेळतात त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण मानधन देतो. आता ते मानधन 20 हजार करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घोषित करूया.
- हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद यांना केवळ चार हजार रुपये मानधन आपण देतो, ते आता 15 हजार रुपये मानधन हे देण्याच निर्णय या ठिकाणी जाहीर केलं.
Must Read (नक्की वाचा):
शमन पर्यायाने हरितगृह वायू उत्सर्जन घटवणे शक्य:
- जागतिक स्तरावर विविध प्रकारचे शमन पर्याय लागू केल्यास हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, असा निष्कर्ष कॅनडा येथील मॅकगिल विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने काढला आहे.
- जगातील सुमारे एक चतुर्थाश वीज नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जाप्रकल्पांमधून निर्माण होते.
- यामुळे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन आणि हवामानबदलावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो.
- नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जाप्रकल्प सुमारे दहा टक्के ऊर्जासंबंधित उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.
- आता मॅकगिल विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने देशानुसार उत्सर्जनाचे प्रमाण मोजण्यासाठी जगभरातील 108 देशांची माहिती जमविली आहे.
- वायूवर चालणाऱ्या ऊर्जेच्या जीवनचक्रातून एकूण जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाण दरवर्षी 3.6 अब्ज टन आहे.
- तसेच जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या शमन पर्यायांची अंमलबजावणी केल्यास सुमारे 71 टक्क्यांनी हे उत्सर्जन कमी केले जाऊ शकते, असा निष्कर्ष या चमूने काढला.
- अधिक कार्यक्षम वनस्पतींद्वारे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी केले जाऊ शकते.
- अमेरिका, रशिया, इराण, सौदी अरेबिया आणि जपान, हे देश जगभरातील सर्वात मोठे गॅस उत्पादक आणि ग्राहक आहेत.
अॅल्युमिनिअम उद्योगातील कचऱ्यापासून क्ष-किरण विरोधी टाईल्सची निर्मिती:
- देश- विदेशात अॅल्युमिनिअम- स्टिल उद्योगातून निघणाऱ्या कचऱ्याची (लाल गाळ) विल्हेवाट हा चिंतेचा विषय आहे.
- या कचऱ्यावर भोपाळच्या सीएसआरआय- अॅडव्हान्स मटेरियल अॅन्ड प्रोसेस रिसर्च इन्स्टिटय़ूटने (सीएसआयआर- एम्प्री) संशोधन करत क्ष- किरण विरोधी टाईल्स तयार केली.
- ही टाईल्स एक्स-रे, सीटी स्कॅन तपासणी यंत्राच्या खोलीत लावणे फायदेशीर आहे.
- या संशोधनाला स्वामित्व हक्कही मिळाले आहे.
- नागपुरातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या सीएसआईआर- एम्प्रीतर्फे ही टाईल्स प्रदर्शनात ठेवली होती.
- भारतातही अॅल्युमिनिअम व स्टिल उद्योग मोठय़ा प्रमाणावर असून आपला देश लाल चिखल तयार करणाऱ्या देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
- या चिखलाच्या विल्हेवाटीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी भोपाळच्या सीएसआईआर- एम्प्री संस्थेने संशोधन सुरू केले.
शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी:
- पुण्यात शनिवार 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला.
- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली.
- यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला.
- महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास चांदीची गदा, रोख पाच लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी बक्षीस रुपात मिळाली आहे.
- तर, उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस मिळाले आहे.
दिनविशेष :
- राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून 15 जानेवारी 1559 मध्ये वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.
- पानिपतचे तिसरे युद्ध 15 जानेवारी 1761 मध्ये संपले.
- एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट 15 जानेवारी 1861 मध्ये मिळाले.
- द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे 15 जानेवारी 1889 मध्ये स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
- जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे 15 जानेवारी 1949 मध्ये हाती घेतली.
- मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा 15 जानेवारी 1970 मध्ये झाले.
- जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे 9 वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे 15 जानेवारी 1973 मध्ये हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
- भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे 15 जानेवारी 1996 मध्ये करण्यात आले.
- गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 15 जानेवारी 1999 मध्ये प्रदान करण्यात आला.
- सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर 15 जानेवारी 2001 मध्ये मध्ये प्रथमच उपलब्ध झाला.