14 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
14 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 जानेवारी 2023)
निर्मला सीतारामन 1 फेब्रवारीला अर्थसंकल्प मांडणार:
- संसदेच्या अर्थसंक्लपीय अधिवेशनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे.
- 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होणार आहे, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडणार आहेत.
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात 66 दिवसांमध्ये एकूण 27 बैठका होतील.
- तर 14 फेब्रुवारी ते 12 मार्च पर्यंत अवकाश घेतला जाणार आहे.
- 12 मार्चपासून संसदेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोंधित करतील.
- संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे हे पहिलेच संबोधन असणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘या’ देशाचा पासपोर्ट आहे सगळ्यात पॉवरफुल:
- पासपोर्ट जपानचा असेल तर 193 देशांत व्हिसा-फ्री एन्ट्री मिळते.
- ‘हेनली पासपोर्ट इंडेक्स’नुसार ही क्रमवारी ठरवण्यात येते.
- या यादीत पाहिला क्रमांक मिळवण्याचे जपानचे हे सलग पाचवे वर्ष आहे.
- या क्रमवारीमध्ये सिंगापूर आणि साऊथ कोरिया यांना दुसरा क्रमांक देण्यात आला आहे.
- त्यानंतर जर्मनी, स्पेन, फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग यांचे नाव आहे.
- तर या यादीत सर्वात शेवटी अफगाणिस्तानचे नाव आहे.
- पासपोर्टधारक व्हिसाशिवाय प्रवेश करू शकणाऱ्या देशांच्या संख्येनुसार ही क्रमवारी ठरवली जाते.
- इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) कडुन मिळालेल्या डेटावरून ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ही क्रमवारी ठरवतात.
- या 109 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 89 वा आहे.
जगातील सर्वात लांब नदी क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ प्रवासासाठी सज्ज:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला हा हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
- वाराणसीच्या रामनगर बंदरावरून ही क्रूझ प्रवासाला सुरूवात करेल.
- तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
- ‘एमव्ही गंगा विलास’ही क्रूझ 51 दिवसांत 32 प्रवाशांसह वाराणसीहून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार 200 किमीचा प्रवास करणार आहे.
- या क्रूझमध्ये 5 स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचा समावेश आहे.
- तसेच मेन डेकवरील 40 सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे.
- तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवण्यात आले आहे.
- याबरोबच एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहे.
- या दरम्यान ती गंगा, हुगळी, विद्यावती, भागीरथी, मातला, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या नदीतून प्रवास करणार आहे.
सानिया मिर्झाचा प्रोफेशनल टेनिसला अलविदा:
- भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने टेनिसला रामराम केला आहे.
- प्रोफेशनल टेनिसमधून आपण निवृत्त होतो आहोत असा आशय असलेली एक पोस्ट सोशल मीडियावर सानिया मिर्झाने लिहिली आहे.
भारताची स्पेनवर 2-० ने मात:
- ओडिशामधील राऊरकेला येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली आहे.
- सलामीच्या पहिल्या सामन्यात त्याने स्पेनचा 2-0 असा पराभव केला.
- भारताकडून या सामन्यात अमित रोहिदास आणि हार्दिक सिंगने गोल केले.
- भारताचा दुसरा सामना आता 15 जानेवारीला बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे.
- अमित रोहिदासला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दिनविशेष:
- भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव व्दारकानाथ देशमुख उर्फ सी.डी. देशमुख यांचा जन्म 14 जानेवारी 1896 रोजी झाला होता.
- सन 1923 मध्ये विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 मध्ये झाला.
- लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र 14 जानेवारी 1948 मध्ये सुरू झाले.
- सन 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.