16 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

बोनी गॅब्रिएल
बोनी गॅब्रिएल

16 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 जानेवारी 2023)

बोनी गॅब्रिएल हिने मिस युनिव्हर्स पेजेंटचे विजेतेपद पटकवले:

  • जगभरातील 84 स्पर्धकांना मागे टाकत यूएसएच्या आर’बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) हिने 71 व्या मिस युनिव्हर्स पेजेंटचे विजेतेपद पटकवले आहे.
  • गॅब्रिएलच्या रूपात जगाला नवी मिस युनिव्हर्स मिळाली आहे.
  • 15 जानेवारीला न्यू ऑर्लिन्स येथे पार पडलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात यंदाचा मिस युनिव्हर्स किताब जाहीर करण्यात आला.
  • भारताच्या हरनाझ कौर सिंधू हिने नव्या मिस युनिव्हर्सला मानाचा मुकुट देऊन गौरवले.
  • व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल पहिली तर डॉमिनिकन रिपब्लिकची आंद्रेना मार्टिनेझ दुसरी उपविजेता ठरली.
  • तर,भारतीय दिविता रायने टॉप 16 मध्ये स्थान मिळवले.

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत लेमी, हेमानोतला विक्रमी वेळेसह जेतेपद:

  • दोन वर्षांच्या खंडानंतर प्रचंड उत्साहात रविवारी संपन्न झालेल्या 18व्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या ‘एलिट’ गटात पुरुषांमध्ये हायले लेमी आणि महिलांमध्ये अंचलेम हेमानोत या इथिओपियाच्या धावपटूंनी विक्रमी वेळेसह जेतेपद पटकावले.
  • यासह त्यांनी 45 हजार अमेरिकी डॉलरचे बक्षीस आणि 15 हजार अमेरिकी डॉलर बोनसच्या रूपात आपल्या नावे केले.
  • ‘एलिट’ गटात भारतीयांमध्ये पुरुष विभागात ऑलिम्पिकपटू आणि 2017च्या आशियाई अजिंक्यपद मॅरेथॉनचा विजेता गोपी थोनाक्कलने बाजी मारली.
  • हेमानोतने अग्रस्थान मिळवताना दशकभरापासूनचा विक्रम मोडीत काढला.
  • यापूर्वी मुंबई मॅरेथॉनमध्ये एलिट महिलांत सर्वोत्तम वेळेचा विक्रम व्हॅलेंटिन किपकेटरच्या नावे होता. तिने 2013च्या स्पर्धेत ही कामगिरी केली होती.

खाशाबा जाधवांना गूगलची ‘डूडल’सह मानवंदना:

  • जगभरात आंतरजाळाचा (इंटरनेट) वापर करताना हवे ते शोधण्याचे माध्यम (सर्च इंजिन) मानल्या जाणाऱ्या ‘गूगल’ने रविवारी भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे स्मरण करत खास ‘डूडल’ तयार करून त्यांना आगळी मानवंदना दिली.
  • स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची रविवारी 97वी जयंती होती.
  • अशा वेळी जगभरात शोध माध्यमात अग्रस्थानी असलेल्या ‘गूगल’ने त्यांची आठवण ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त खास ‘डूडल’ची निर्मिती केली.
  • सर्वप्रथम 1948 लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला. मात्र, तेव्हा त्यांना गादीवर (मॅट) खेळायची सवय नसल्याने त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • पुढील चार वर्षांत त्यांनी वजन गट वाढवून कठोर मेहनत घेतली आणि 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून दिले.

विराटचा आणखी एक विक्रम:

  • विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी खेळी खेळली, त्याने 110 चेंडूत नाबाद 166 धावा केल्या.
  • कोहलीने या दीड शतकाच्या जोरावर अनेक विक्रम केले.
  • विराट कोहलीने धावांबरोबरच षटकारांचा विक्रम केला.
  • ज्यामध्ये त्याने ब्रायन लारा, किरॉन पोलार्ड, शेन वॉटसन या खेळाडूंना मागे टाकत वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली.
  • कोहलीने त्याच्या दीड शतकासह सचिनला मागे टाकले, हे त्याचे घरच्या मैदानावरील 21 वे एकदिवसीय शतक आहे, जे भारतातील सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम आहे.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 136 षटकार लगावले आहेत.
  • शतकांच्या बाबतीत, कोहलीने माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली.
  • या प्रकरणातील दोघेही संयुक्तपणे सहावे भारतीय फलंदाज आहेत.
  • विराट कोहलीने महेला जयवर्धनेला मागे टाकत वनडेत सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.

रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये केला ‘हा’खास पराक्रम:

  • भारत आणि श्रीलंका संघात मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात आहे.
  • तसेच भारतीय संघाने विराट कोहलीच्या नाबाद दीड शतकाच्या जोरावर श्रीलंकेला 391 धावांचे लक्ष्य दिले.
  • या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 42 धावा केल्या.
  • त्याचबरोबर रोहित शर्माने एक विक्रम केला आहे. ज्यामध्ये त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा डिव्हिलियर्सच्या पुढे गेला आहे.
  • रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात 24वी धाव घेताच केल्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले.
  • वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आता 17व्या स्थानावर पोहोचला आहे.
  • त्याचबरोबर या यादीत तो सहावा भारतीय आहे.

दिनविशेष:

  • सन 1681 मध्ये छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला होता.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सन 1941 मध्ये देशाबाहेर प्रयाण.
  • पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते सन 1955 मध्ये उद्घाटन झाले होते.
  • सन 2008 मध्ये टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण केले.
  • रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती सन 1660 शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.