14 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

14 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 डिसेंबर 2022)

अणुकेंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती प्रयोगाला मोठे यश :

 • अणुकेंद्रकांच्या संयोगातून (न्यूक्लिअर फ्यूजन) ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरिकेतील संशोधकांना मोठे यश आले आहे.
 • या प्रक्रियेसाठी लागलेल्या ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जेची निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून त्यामुळे कार्बनमुक्त आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे.
 • यावर अधिक संशोधन होऊन खरोखर निर्मितीप्रकल्प अस्तित्वात आले, तर केवळ एक ग्लास पाण्यापासून एका घराला वर्षभर पुरेल इतकी वीज निर्माण होऊ शकेल.
 • अणुकेंद्रक संयोग प्रक्रियेमध्ये डय़ुटेरिअम आणि ट्रीटियम या हायड्रोजनच्या समस्थानिकांमध्ये (आयसोटोप्स) संयोग घडविण्यात आला आहे.
 • अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमध्ये या प्रक्रियेवर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे.
 • फ्रान्समधील ‘इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एक्सप्रिमेंटल रिअॅक्टर’ प्रयोगशाळा हे युरोपातील संशोधनाचे मुख्य केंद्र आहे.
 • या प्रयोगामध्ये भारतासह चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ, रशिया, जपान, दक्षिण कोरिया अशा 35 देश या प्रयोगामध्ये सहभागी आहेत.

भारत-बांगलादेश पहिली कसोटी आजपासून :

 • केएल राहुलची नेतृत्वक्षमता आणि फलंदाजांची बुधवारपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत कस लागणार आहे.
 • तसेच, या मालिकेचा निकाल जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात पात्रता मिळवण्याच्या भारताच्या आशा आणखी मजबूत करू शकतात.
 • भारतीय संघ या मालिकेत काही महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरेल.
 • भारत ‘डब्ल्यूटीसी’ गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेनंतर चौथ्या स्थानावर आहे.
 • भारताला जूनमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याकरता पात्रता मिळवायची असल्यास त्यांना बांगलादेशविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारही कसोटी सामने जिंकावे लागतील.

अर्जेंटिना सहाव्यांदा अंतिम फेरीत :

 • लिओनेल मेस्सीने आपल्या जादुई कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाला अंतिम फेरीत नेले आहे.
 • त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे.
 • शेवटच्या वेळी 2014 मध्ये त्यांच्या संघाला विजेतेपदाच्या लढतीत जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला होता.
 • लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिनाने गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला.
 • आता अंतिम फेरीत त्याचा सामना याच मैदानावर गतविजेता फ्रान्स किंवा मोरोक्कोशी 18 डिसेंबर रोजी होईल.
 • अर्जेंटिनाचा संघ सहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.
 • 1978 च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.

दिनविशेष:

 • योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचा जन्म 14 डिसेंबर 1918 रोजी झाला होता.
 • अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 मध्ये झाला होता.
 • ‘दुसरे महायुद्ध‘ सन 1941 मध्ये जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
 • इंदिरा गांधी यांचे पुत्र ‘संजय गांधी‘ यांचा जन्म 14 डिसेंबर 1946 मध्ये झाला होता.
 • सन 1961 मध्ये टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.