13 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

13 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 डिसेंबर 2022)

भारतीय नौदलात आता महिलाही होणार ‘मरिन कमांडो’ :

 • भारतीय नौदलाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
 • या निर्णयानुसार आता महिलांनाही नौदलाच्या मरिन कमांडोजच्या स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल होता येणार आहे.
 • या वृत्तानुसार, महिलांनी ठरलेले निकष पूर्ण केले तर त्यांनाही नौदलात मरिन कमांडो म्हणून भरती होता येणार आहे.
 • असं असलं तरी कोणालाही थेट मरिन कमांडो म्हणून भरती होता येत नाही.
 • नौदलात भरती झाल्यानंतर मरिन कमांडो होण्यासाठीचे निकष पूर्ण करून मगच ‘स्पेशल फोर्स’मध्ये भरती होता येते.
 • भारतीय सैन्य, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तिन्ही दलात स्पेशल फोर्सेस आहेत.
 • या स्पेशल फोर्सेसमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही तग राहू शकतील असे मानसिक आणि शारीरिक पातळीवरील सदृढ सैनिकांची भरती केली जाते.

देशात लवकरच नवी टोल सिस्टीम :

 • केंद्र सरकार लवकरच नवीन टोल सिस्टिम आणणार आहे.
 • सध्या फास्टटॅगवरून टोल जमा करण्याच्या सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे.
 • यामध्ये लवकरच बदल करण्यात येत असुन एका नवी सिस्टिम अंमलात आणण्यात येणार आहे.
 • केंद्र सरकारकडुन कॅमेरावर आधारित टोल जमा करण्याच्या पद्धतीचा विचार सुरू आहे.
 • या कॅमेऱ्यांना ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’ (ANPR) म्हणून ओळखले जाईल.
 • कॅमेऱ्यावर आधारित या टोल जमा करण्याच्या पद्धतीचे मुख्य कारण नागरिकांचा टोल प्लाझावरील वेळ वाचवणे हा आहे.
 • देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरून टोल प्लाझा हटवण्यात येतील आणि त्याजागी एएनपीआर इन्स्टॉल केले जाईल.
 • एएनपीआरद्वारे गाडीच्या नंबर प्लेटवरील नंबरची नोंद करण्यात येईल आणि त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून पैसे भरले जातील.

मोपा विमानतळाला मनोहर पर्रीकरांचं नाव :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केलं.
 • यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आदी नेते उपस्थित होते.
 • मोपा येथील या नवीन विमानतळाला सरकारने दिवंगत मनोहर पर्रीकर यांचं नाव दिलं आहे.
 • मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे.

स्मृती मंधानाने रचला इतिहास :

 • भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे.
 • या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला.
 • डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्ला सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला.
 • सुपर ओव्हरमध्ये भारताने 4 धावांनी विजय नोंदवला.
 • भारतीय महिला संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 हून अधिक धावा करणारी स्मृती मंधाना ही दुसरी महिला खेळाडू ठरली आहे.
 • तिच्या आधी हे विशेष पराक्रम फक्त हरमनप्रीत कौरच्या नावावर नोंदवला गेला होता.
 • मंधानाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2544 धावा केल्या आहेत.

दिनविशेष:

 • भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक ‘संजय लोळ‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1940 मध्ये झाला होता.
 • गोव्याचे मुख्यमंत्री ‘मनोहर पर्रीकर‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 मध्ये झाला.
 • सन 1991 मध्ये मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
 • सायरस मिस्त्री यांना 2016 मध्ये टी.सी.एस. च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
 • अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने 2016 जागतिक विजेते घोषित केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.