12 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

12 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 डिसेंबर 2022)

पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या निवृत्तिवेतन योजनेचा निर्णय :

 • हिमाचल प्रदेशचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुखू यांचा रविवारी शपथविधी उत्साहात झाला.
 • मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 • राज्यातील जनतेला निवडणूक प्रचारात दहा आश्वासने दिली आहेत.
 • पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुनी निवृत्तिवेतन योजना (ओपीएस) लागू करू.

भुपेंद्र पटेल घेणार आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ :

 • यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने 156 जागांसह ऐतिहासिक विजय मिळवला.
 • या विजयासह भाजपा गुजरातमध्ये सातव्यांदा सत्ता स्थापन करणार असून आज भुपेंद्र पटेल 25 मंत्र्यांसह दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
 • या शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील.
 • गांधीनगरमध्ये हा शपथग्रहण सोहळा पार पडणार असून यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

एअर इंडियाच्या ताफ्यात नवी 500 विमाने :

 • टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर या विमान सेवा कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे.
 • त्यानुसार एअर बस आणि बोईंग या विमाननिर्मिती कंपन्यांकडून सुमारे पाचशे जेटलायनर विमाने खरेदी करण्याची तयारी एअर इंडियाने केली असल्याचे समजते.
 • या ऐतिहासिक विमान खरेदीचा करार लवकरच होण्याची शक्यता आहे.
 • यात सुमारे चारशे अरुंद आकाराचे जेट आणि शंभर रुंद आकाराचे जेट खरेदी केले जातील.
 • यात एअरबस ए-350 आणि बोईंग 787 आणि 777 यांचा समावेश असेल.

भारतीय महिला संघाची सरशी :

 • स्मृती मानधना आणि रिचा घोष यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविला.
 • या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
 • नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 1 बाद 187 अशी मजल मारली होती.

दिनविशेष:

 • सन 1882 मध्ये आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
 • गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म 12 डिसेंबर 1892 मध्ये झाला होता.
 • जी. मार्कोनी याला सन 1901 मध्ये प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
 • 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
 • राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 मध्ये झाला.
 • प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये झाला.
 • प्रियांका चोप्रा यांना सन 2016 मध्ये युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.