15 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

15 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2022)

मुलींसाठी गर्भाशयाच्या कर्करोगावर पुढील वर्षी लस :

  • गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग रोखण्यासाठी देशात एचपीव्ही (ह्युमन पेपिलोमावायरस) लस विकसित करण्यात आली आहे.
  • ही लस पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
  • ‘एनटीएआय’चे अध्यक्ष डॉ. एन. के. आरोरा यांनी या संदर्भात माहिती दिली.
  • 9 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना ही लस देण्यासाठी 2023 च्या मध्यापर्यंत राष्ट्रीय पातळीवर मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
  • वयाच्या 35 वर्षांनंतर गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग तपासणी करणे आवश्यक आहे.

चार वर्षांची पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट ‘पी.एच.डी’ करता येणार :

  • यूजीसीकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
  • चार वर्षांची पदवीपूर्ण असलेले विद्यार्थ्यांना आता थेट पीएच.डी साठी प्रवेश घेता येणार आहे.
  • अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली आहे.
  • विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएचडी प्रवेशासाठी असलेले पात्रता निकष बदलण्यात आले आहेत.
  • नव्या नियमानुसार आता पदवीनंतर थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे.
  • त्यासाठी आता पदव्युत्तर पदवीची अट आवश्यकता राहणार नाही.
  • चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना किमान 75 टक्के गुण किंवा समतुल्य सीजीपीए असल्यास थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे.
  • ज्यांनी चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमानंतर पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. त्यांनाही पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला पीएसडीसाठी प्रवेश मिळणार आहे.

लिओनेल मेसीकडून निवृत्तीची घोषणा :

  • अर्जेंटिनाने क्रोएशियावर 3-0 अशी मात करत सहाव्यांदा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
  • दरम्यान हा अंतिम सामना अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीचाही शेवटचा सामना असणार आहे.
  • मेसीने या सामन्यानंतर आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
  • मेसीने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले असून, अर्जेंटिनाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.
  • मेसीच्या नावावर आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये 11 गोल केल्याचा रेकॉर्ड आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनने केली विक्रमाशी बरोबरी :

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज कसोटी व एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली.
  • भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ताज्या आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती करत 8व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
  • तर युवा सलामीवीर इशान किशनने 117 स्थानांनी झेप घेतली आहे.
  • बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा इशान किशन आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत 37व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
  • ऑस्ट्रेलियाचा कसोटी फलंदाज मार्नस लाबुशेन याने अव्वल स्थानावरील पकड मजबूत करताना विराटशी बरोबरी केली.

दिनविशेष:

  • 15 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन‘ आहे.
  • नागपूरकर भोसलेंनी सन 1803 मध्ये ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला होता.
  • स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 मध्ये झाला.
  • सन 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला.
  • चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना सन 1991 मध्ये ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.