11 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

11 August 2019 Current Affairs In Marathi

11 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2019)

सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी :

 • दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
 • तर याआधी राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2019)

उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचण्या :

 • अमेरिका-दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायतींचा निषेध करण्यासाठी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या.
 • तर अध्यक्ष ट्रम्प यांनीही संयुक्त लष्करी कवायतींबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी या चाचण्या केल्या.
 • तसेच दोन लघु पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ही ईशान्येकडील हामुहंग शहरातून सोडण्यात आली. ती 400 कि.मी अंतर कापून कोरिया द्वीपकल्प व जपान यांच्या दरम्यानच्या सागरात कोसळली.
 • तर दोन आठवडय़ात क्षेपणास्त्र चाचण्यांची ही पाचवी वेळ होती. या चाचण्या म्हणजे दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्या संयुक्त लष्करी कवायतींविरोधात इशारा असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले आहे.

नेपाळात सापडले जगातील सर्वाधिक उंच सरोवर :

 • नेपाळच्या हिमालय पर्वत रांगांत नवे सरोवर सापडले असून हे जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर ठरणार आहे. 4,919 मीटर उंचावर असलेले तिलिचो सरोवर हे सध्या जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर आहे. विशेष म्हणजे, तिलिचो सरोवरही नेपाळातच आहे.
 • तर काही महिन्यांपूर्वी गिर्यारोहकांच्या एका पथकाला नेपाळातील मनंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पर्वत रांगात काजीन सारा सरोवर सापडले. हे सरोवर चामे ग्रामीण नगरपालिकेच्या हद्दीतील सिंगारखरका परिसरात आहे. गिर्यारोहकांनी केलेल्या नोंदीनुसार, हे सरोवर 5,200 मीटर उंचावर आहे.
 • तथापि, याची अद्याप अधिकृत पडताळणी करण्यात आलेली नाही. हे सरोवर अंदाजे 1,500 मीटर लांब आणि 600 मीटर रुंद आहे, असे चामे ग्रामीण नगरपालिकेचे प्रमुख लोकेंद्र घाले यांनी सांगितले.
 • तसेच सध्या सर्वाधिक उंचीवरील सरोवर असा किताब असलेले तिलिचो सरोवर 4,919 मीटर उंचावर असून त्याची लांबी 4 कि.मी., रुंदी 12 कि. मी., तर खोली 200 मीटर आहे.

बजरंगला सुवर्णपदक, विनेश अंतिम फेरीत :

 • भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आपली लय कायम राखली.
 • बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रां.पीमध्ये आपल्या विजेतेपदाचा बचाव केला. तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती
  स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
 • जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलसी ग्रांपीमध्ये गेल्या वर्षी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बंजरंग याने पुरूषांच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात इराणच्या पेइमन बिब्यानीला 2 – 0 अशी मात दिली.
 • बेलारुसच्या मिन्स्कमध्ये मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेश हिने महिलांच्या 53 किलो गटात स्थानिक पहेलवान याफ्रेमेनका हिला एकतर्फी झालेल्या सामन्यात 11-0 असे पराभूत केले.

दिनविशेष :

 • सन 1943 मध्ये सी.डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
 • दादरा व नगर हवेली हा भाग सन 1961 मध्ये भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
 • सन 1999 बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या ‘परिमार्जन नेगी‘ याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
 • डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे 11 ऑगस्ट 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.