10 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

10 August 2019 Current Affairs In Marathi

10 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2019)

शिधापत्रिकांच्या आंतरराज्य जोडणीस प्रारंभ :

  • ‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजना 1 जून 2020 पर्यंत देशभरात पूर्णपणे लागू होईल, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पास्वान यांनी सांगितले. तेलंगण-आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये शिधापत्रिकांच्या आंतरराज्य जोडणीची सुरुवात करण्यात आली. याचा अर्थ तेलंगण व आंध्र प्रदेश येथे राहणारे शिधापत्रिकाधारक लोक दोन्ही राज्यात स्वस्त धान्य दुकानात खरेदी करू शकतील.
  • तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यातील लोक दोन्हीकडे स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करू शकतील.
  • तर रामविलास पास्वान यांनी सांगितले की, आंतरराज्य शिधापत्रिका सेवा आम्ही सुरू केली आहे. हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, पंजाब, राजस्थान, त्रिपुरा या राज्यांमध्ये या योजनेचे काम सुरू आहे.
  • अन्न खात्याचे सचिव रवीकांत यांनी सांगितले की, शिधापत्रिकांची आंतरराज्य व्यवस्था जानेवारी 2020 पर्यंतपूर्ण होईल अकरा राज्यात एकच संजाल असेल त्यात 11 राज्यातील लोक कुठूनही शिधा खरेदी करू शकतील. एक देश एक
    शिधापत्रिका योजना 1 जून 2020 पर्यंत देशात लागू करण्याचा विचार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2019)

लवकरच देशात धावणार पहिली अंडरवॉटर ट्रेन :

  • आता लवकरच देशात नागरिकांना पाण्याखाली धावणाऱ्या ट्रेनचा अनुभव घेता येणार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली.
  • देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार असल्याचे यसांगण्यात आले. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्पा
    लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे.
  • दरम्यान, कोलकात्यातील प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावण्यात आले आहे.
  • तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे. नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे. ही ट्रेन लवकरच सुरू होणार असून हे उत्तम इंजिनिअरिंगचं प्रतिक
    असल्याचं पीयूष गोयल म्हणाले.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहर :

  • अत्यंत मानाच्या 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, ‘भोंगा’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे, तर आयुष्मान खुराणा, तब्बू आणि राधिका आपटे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने
    सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे.
  • शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे.
  • हिंदीत अंधाधुनला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून, त्यातील आयुष्यमान खुराणा आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ मधील विकी कौशल या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. उरीसाठी दिग्दर्शक आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे.
  • पॅडमॅन हा सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून बधाई हो ने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे पुरस्कारांची घोषणा उशिरा झाली.

बॅलेट बॉक्स नाही, ‘ईव्हीएम’वरच निवडणुका होणार :

  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधकांकडून ईव्हीएम मशिन सदोष असल्याचा आरोप करत पुन्हा बॅलेट बॉक्स आणण्याची मागणी केली जात आहे.
  • मात्र, ईव्हीएमच्या जागी परत बॅलेट बॉक्स आणणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. मतपत्रिका हा भूतकाळ आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या जागी
    बॅलेट बॉक्स आणला जाणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

दिनविशेष :

  • 10 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन‘ आहे.
  • सन 1675 मध्ये चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.
  • स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना 10 ऑगस्ट 1810 मध्ये झाली.
  • सन 1821 मध्ये मिसुरी हे अमेरिकेचे 24 वे राज्य बनले.
  • भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म 10 ऑगस्ट 1963 मध्ये झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.