12 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
12 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2019)
सचिन-सेहवागला मागे टाकत विराट-रोहित जोडी ठरली अव्वल :
- दुसऱ्या वन-डे सामन्यात रोहित-विराटने 74 धावांची भागीदारी करत सचिन-सेहवान जोडीचा आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.
- विराट-रोहित जोडीची वन-डे कारकिर्दीतली ही 32 वी अर्धशतकी भागीदारी ठरली आहे. सचिन-सेहवान जोडीच्या नावावर 31 अर्धशतकी भागीदारी जमा आहेत.
- भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करण्याच्या विक्रम हा सचिन-सौरव गांगुली जोडीच्या नावावर आहे. या जोडीने 55 अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत.
Must Read (नक्की वाचा):
‘आयसीसी’च्या नियमाला ‘बीसीसीआय’चा आक्षेप :
- देशांतर्गत स्पर्धासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंच्या सहभागाबाबत परवानगी घेण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या नियमाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जोरदार आक्षेप घेतला आहे.
- इंडियन प्रीमियर लीग किंवा रणजी करंडकासह अन्य देशांतर्गत स्पर्धासाठी आयसीसीकडून परवानग्या मागण्याची बीसीसीआयची इच्छा नाही.
- आंतरराष्ट्रीय खेळाडूने आपल्या पालक मंडळाने आयोजित केलेल्या ट्वेन्टी-20 लीगसह फक्त एकाच आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळावे, असा आयसीसीचा नवा नियम प्रस्तावित आहे.
- तर आयसीसीने हा नवा नियम बनवला असून आयपीएल, बिग बॅश तसेच रणजी करंडकासह शेकडो देशांतर्गत स्पर्धासाठी संलग्न असलेल्या जगातील सर्व राष्ट्रीय क्रिकेट मंडळांनी आयसीसीची परवानगी घेण्याचे सुचवले आहे.
- तसेच देशांतर्गत स्पर्धाचे आयोजन करताना आयसीसीची भूमिका ही फारच छोटी असते. त्यामुळे आम्ही आमचा आक्षेप, हरकती आणि निरीक्षणे आयसीसीला कळवली आहेत.
काश्मिरी खेळाडूंसाठी धोनी सरसावला, क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत :
- भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी, जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
- काश्मीरमधल्या तरुण खेळाडूंना धोनीच्या अकादमीत मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशीही चर्चा करणार असल्याचं समजतंय.
- धोनीने सध्या 2 महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून तो भारतीय सैन्यदलाच्या 106 TA Battalion (Para) तुकडीत काम करतो आहे.
दिनविशेष :
- 12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय हत्ती दिन
- 12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय युवा दिन
- 12 ऑगस्ट 1851 मध्ये आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
- पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी 12 ऑगस्ट 1953 मध्ये करण्यात आली.
- नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – 112 ऑगस्ट 1960 मध्ये ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा