1 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 December 2019 Current Affairs In Marathi
1 December 2019 Current Affairs In Marathi

1 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2019)

सुप्रसिद्ध मल्याळी कवी अक्किथम यांना ‘ज्ञानपीठ’ :

  • मल्याळी काव्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध कवी अक्किथम यांची 2019 या वर्षांसाठीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या 55व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली.
  • ज्ञानपीठ निवड मंडळाने शुक्रवारी ही घोषणा केली. अक्किथम अत्युथन नंबूथिरी असे त्यांचे पूर्ण नाव असून ते अक्किथम या नावाने सुपरिचित आहेत. कवितेबरोबरच त्यांनी नाटय़, टीकात्मक निबंध, बालसाहित्य, लघुकथा आदी साहत्यिाच्या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला आहे.
  • तर अक्किथम यांची 55 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी 45 कवितासंग्रह आहेत, त्यामध्ये खंडकाव्य, कथाकाव्य, चरित्रकाव्य आणि गाणी यांचा समावेश आहे. वीरवदम, बळिदर्शनम, निमिषा क्षेत्रम, अमृत खतिका, अक्किथम कवितका, अंतिमहाकालम ही त्यांची गाजलेली निर्मिती आहे.
  • तसेच अक्किथम यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, केरळ साहित्य अकादमी पुरस्कार, मातृभूमी पुरस्कार, वायलर पुरस्कार आणि कबीर सन्मानानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्याचा देशी आणि परदेशी भाषांत अनुवाद करण्यात आला आहे.

FASTag प्रणालीची मुदत केंद्र सरकारने 15 डिसेंबरपर्यंत वाढवली :

  • फास्टॅग प्रणालीची मुदत केंद्र सरकारने 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आली आहे.
  • 1 डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली होती. मात्र ही मुदत आता 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली होती.
  • नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे.
    तसेच यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर ‘फास्टॅग’ लावावं लागणार आहे. हा ‘फास्टॅग’ अधिकृत टॅग विक्रेते किंवा बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे. तर टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंड स्क्रिनवर ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर ‘फास्टॅग’ स्कॅन करतो. त्यानंतर ‘फास्टॅग’च्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.
  • ‘फास्टॅग’ अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्यासंबंधिचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. ‘फास्टॅग’ची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने ‘फास्टॅग’ खरेदी करावे लागणार आहे. कार, जीप,
  • व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत. तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत.

आर्थिक विकासासाठी भारत श्रीलंकेला देणार 45 कोटी डॉलर्सचे कर्ज :

  • श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला 45 कोटी डॉलर्सच कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केला. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कर्जाद्वारे आर्थिक मदतीचा हा निर्णय घेतला आहे.
  • तर 45 कोटी डॉलर्समध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्सचा समावेश आहे. गोताबाया राजपक्षे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये समाधानकारक चर्चा झाली. राजपक्षे भारत दौऱ्यावर आले आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा राजपक्षे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
  • तसेच श्रीलंकेतील तामिळ जनतेच्या विषयासह सुरक्षा, व्यापार आणि मच्छीमारांच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. विकासाच्या मार्गावर श्रीलंकेला पूर्ण सहकार्य करण्याचे मोदींनी आश्वासन दिले आहे.
  • श्रीलंकेतील विविध विकास प्रकल्पांसाठी 40 कोटी डॉलर्स तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्स देण्यात येणार आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाचा सोलोमन विजेता :

  • 34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परदेशी खेळाडूचे वर्चस्व पाहण्यास मिळाले.
  • पुरुष गटात इथिओपियाचा सोलोमन हा विजेता ठरला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे आयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
  • पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे 5 वाजता कै. बाबुराव सणस मैदानापासून ढोल ताशाच्या गजरात सुरुवात झाली.
  • देश, विदेशातील खेळाडूंसह शहरातील अनेक भागातील खेळाडू रस्त्यावर धावताना पाहण्यास मिळाले. याचसोबत स्पर्धेत विविध क्षेत्रातील मंडळीनीही हजेरी लावली. 42 किलोमीटर पुरुष, 21 किलो मीटर पुरुष आणि महिला, 10 किलोमीटर पुरुष आणि महिला, पाच किलोमीटर मुले आणि मुली आणि चॅरिटी रन साडेतीन किलोमीटरमध्ये ही स्पर्धा पार पडली.

नाबाद त्रिशतकी खेळीसह वॉर्नरने मोडला डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम :

  • सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने झळकावलेल्या नाबाद त्रिशतकी खेळाच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे.
  • पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 589 धावांवर आपला डाव घोषित केला. वॉर्नरने 418 चेंडूत 335 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 39 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
  • या खेळीदरम्यान वॉर्नरने माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला.
  • कसोटी क्रिकेटमधलं वॉर्नरचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतक झळकावणारा वॉर्नर चौथा खेळाडू ठरला आहे. याचसोबत अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही आता वॉर्नरच्या नावे जमा झाला आहे.
  • तर याआधी 29 जानेवारी 1932 रोजी ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावर नाबाद 299 धावांची खेळी केली होती. वॉर्नरने आज त्रिशतक झळकावत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

दिनविशेष:

  • 1 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी 1 डिसेंबर 1917 रोजी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.
  • एस.एस. आपटे यांनी सन 1948 मध्ये हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
  • सन 1963 मध्ये नागालँड भारताचे 16वे राज्य झाले.
  • 1 डिसेंबर 1965 मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से-बिएसएफ (BSF) ची स्थापना झाली.
  • सन 1980 मध्ये 1 डिसेंबर रोजी मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.