29 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 November 2019 Current Affairs In Marathi

29 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 नोव्हेंबर 2019)

सूर्यापेक्षा 70 पट आकाराच्या कृष्णविवराचा लागला शोध :

  • आमच्या आकाशगंगेत सूर्याच्या आकारापेक्षा 70 पट महाप्रचंड अशा ‘राक्षसी’ कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लागला असून तारे, ग्रह कसे उत्क्रांत झाले याबद्दल जे सांगितले जाते त्या सिद्धांतालाच आव्हान मिळत आहे, असे शास्त्रज्ञांनी
    म्हटले.
  • तसेच आकाशगंगेत अंदाजे 100 दशलक्ष ताऱ्यांसारखे दिसणारे ब्लॅक होल्स (महाप्रचंड ग्रह/तारे कोसळून जे अस्तित्वात आले ते म्हणजे ब्लॅक होल्स) आहेत. ही कृष्ण विवरे इतकी घट्ट आहेत की, त्यातून सूर्यप्रकाशही पलीकडे जाऊ शकत. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की, आमच्या आकाशगंगेतील स्वतंत्र असे एकेक कृष्णविवर हे सूर्याच्या 20 पटीपेक्षा जास्त नाही, असे संशोधकांनी म्हटले. या नव्या शोधामुळे आतापर्यंतचा समज भुईसपाट झाला.
  • तर आंतरराष्ट्रीय तुकडीला फार मोठ्या कृष्णविवराचा शोध लागला. तिचे नेतृत्व नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल आॅब्झर्वेटरी आॅफ चायनाने (एनएओसी) केले होते. हे संशोधन जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झाले. त्यात कृष्ण विवराचे नामकरण
    एलबी-1 असे केले गेले असून, ते पृथ्वीपासून 15 हजार प्रकाशवर्षे दूर आहे.

आशियाई तिरंदाजी स्पर्धात दीपिकाला सुवर्ण, अंकिताला रौप्य :

  • आशियाई तिरंदाजी स्पध्रेतील रीकव्‍‌र्ह प्रकारात दीपिका कुमारीने सुवर्ण आणि अंकिता भाकटने रौप्यपदकाची कमाई केली. या दोघींनीही पदकांसहित ऑलिम्पिकमधील एका स्थानाची निश्चितीसुद्धा केली आहे.
  • तर टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेची तीन वैयक्तिक स्थाने गुरुवारी निश्चित होणार होती. जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घातल्यामुळे भारतीय खेळाडू त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पध्रेत सहभागी झाले होते. परंतु याही स्थितीत अग्रमानांकित दीपिका आणि सहावी मानांकित अंकिताने लक्षवेधी कामगिरी केली.
  • तसेच महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असणाऱ्या दीपिकाने मलेशियाच्या नूर अफिसा अब्दुल हलिला 7-2, इराणच्या झाहरा नेमातीला 6-4 आणि थायलंडच्या नरीसारा खुनहिरनचायोचा 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठताना ऑलिम्पिकमधील स्थान पक्के केले.
  • नरीसाराविरुद्धच्या सामन्यात दीपिकाने आपला आयुष्याचा जोडीदार अतानू दासकडे 28 गुण साधेन, असा दावा केला
  • होता. परंतु तिने एकूण 29 गुण कमावले. यापैकी दोनदा 10 आणि एकदा 9 गुण मिळवले. मग दीपिकाने एनग्युऐटला
    6- 2 अशा फरकाने नामोहरम करीत अंतिम फेरी गाठली. मग अंतिम सामन्यात दीपिकाने अंकिताचा 6-0 असा सहज पाडाव केला.

अमेरिकेचे कुटुंब-पुरस्कृत ‘ग्रीन कार्ड’ मिळवण्यासाठी 2.27 लाख भारतीय प्रतीक्षेत :

  • अमेरिकेचे कायम नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कुटुंब- पुरस्कृत ‘ग्रीन कार्ड’ मिळवण्याकरिता अमेरिकेतील 2 लाख 27 हजारांहून अधिक भारतीय प्रतीक्षेत असून, मेक्सिकोनंतर प्रतीक्षा यादीतील ही दुसऱ्या क्रमांकाची संख्या असल्याचे ताज्या आकडेवारीत म्हटले आहे.
  • तर कुटुंब- पुरस्कृत ग्रीन कार्डासाठी अमेरिकी काँग्रेसने वर्षांला कमाल 1 लाख 26 हजार इतकी संख्या निश्चित केली असली, तरी सध्या सुमारे 40 लाख लोक हे कार्ड मिळण्याची वाट पाहात आहेत.
  • तसेच प्रतीक्षा यादीत सर्वाधिक, म्हणजे 15 लाख लोक अमेरिकेचा दक्षिणेकडील शेजारी असलेल्या मेक्सिकोतील आहेत. याखालोखाल इच्छुक भारतीयांची संख्या 2 लाख 27 हजार, तर चीनची संख्या 1 लाख 80 हजार इतकी आहे, असे अंतर्गत सुरक्षा विभागाने म्हटले आहे.

‘पार्टिकल्स’ सिनेमाला सुवर्ण मयूर पुरस्कार :

  • सुवर्ण महोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप झाला. फ्रान्स- स्वीत्झर्लंडच्या ‘पार्टिकल्स’ सिनेमाला उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर प्राप्त झाला.
  • तर रोख चाळीस लाख रुपये, चषक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समारोपावेळी दक्षिण भारतातील  चित्रपट उद्योगातील प्रख्यात संगीतकार इलायाराजा तसेच बॉलिवूडचे प्रेम चोप्रा, मंजू गोरा, रूपा गांगुली, रमेश सिप्पी,
    अरविंद स्वामी आदी अनेक मान्यवर उपस्थित राहिले.
  • तसेच उत्कृष्ट सिनेमाला प्राप्त झालेले चाळीस लाख रुपयांचे बक्षीस दिग्दर्शक व निर्मात्याला विभागून देण्यात आले. दिग्दर्शक ब्लेझ हॅरिसॉन समारोप यांनी आपले मनोगत व्हिडीओद्वारे व्यक्त केले. आपण दिग्दर्शित केलेला हा पहिलाच
    चित्रपट असून आपल्याला इफ्फीत सर्वांत मोठा पुरस्कार मिळाल्याचे वृत्त ऐकून खूप आनंद झाला.

दिनविशेष:

  • समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1869 मध्ये झाला होता.
  • प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.
  • 29 नोव्हेंबर 1993 हा दिवस जे.आर.डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा स्मृतीदिन आहे. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.
  • सन 1996 या वर्षी नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका ‘मदर तेरेसा‘ यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.