2 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

2 December 2019 Current Affairs In Marathi
2 December 2019 Current Affairs In Marathi

2 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2019)

दूरसंचार कंपन्यांकडून 50टक्के शुल्कवाढ :

 • व्होडाफोन, आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ने मंगळवार, 3 डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे 50 टक्क्यांपर्यंतवाढ करण्याचे जाहीर केले.
 • तर त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ‘रिलायन्स जियो’नेही 6 डिसेंबरपासून सुमारे 40 टक्के दरवाढीची घोषणा केल्याने मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
 • रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेने कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत.
 • तसेच मोबाइल जोडणी महिनाभर अतूट राहावी यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान 49 रुपयांचा ‘रिचार्ज’ करणे आवश्यक आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2019)

भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांत 80 टक्के आरक्षण देणार :

 • खासगी क्षेत्रातील नोक-यांमध्ये भूमिपुत्रांसाठी 80 टक्के आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कायदा करेल, तसेच शेतक-यांना कर्जमुक्ती देऊन चिंतामुक्त करण्याची ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहातील अभिभाषणात दिली.
 • राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. महिलांना समान संधी आणि त्यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे.
 • तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन व उच्च शिक्षण मोफत देण्याचा आटोकाट प्रयत्न राहील. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील 865 गावांतील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल.
 • तसेच नुकसानग्रस्त शेतक-यांना तत्काळ साहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, असेही राज्यपाल म्हणाले.

राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रीतला चौथे जेतेपद :

 • जालंधरमध्ये टाटा मोटर्सच्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या अंतिम दिवशी गुरप्रीत सिंग आणि सुनील कुमार दोघांनी सुवर्णपदक मिळवत आपली प्रतिष्ठा कायम ठेवली.
 • तर गुरप्रीत यांचे हे चौथे वरिष्ठ राष्ट्रीय पदक होते.
 • पंजाबच्या या मल्लाने दोन वेळा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचे पदक विजेते सजन भानवालला नमविले. त्याने रेल्वेचे प्रतिनिधीत्व केले. गुरप्रीतने आपल्या तरुण प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व कायम ठेवले आणि आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात चौथ्या विजयाची नोंद केली.
 • सुनिलने पंजाबच्या प्रभाळवर विजय मिळवला. रेल्वेच्या या मल्लाने पंजाबच्या खेळाडूवर 5-1 असा विजय नोंदवला.
  तसेच 55 किलो वजनी गटात कर्नाटकाच्या अर्जुनने सर्व्हिसेसचे प्रतिनिधित्व केले आणि अजयचा 9-0 ने पराभव करून सुवर्ण जिंकले.

अमित शहा यांचा मुलगा आता बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाणार :

 • भारताचे गृह मंत्री अमित शहा यांचा मुलगा सध्या बीसीसीआयमध्ये आहे. पण यापुढे जय हे आयसीसीमध्ये जाणार आहेत. बीसीसीआयच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
 • तर सध्याच्या घडीला जय हे बीसीसीआयचे सचिव आहेत. जेव्हा बीसीसीआयच्या कार्यकारीणीची निवड होणार होती. त्यावेळी जय हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार, अशी चर्चा होती. पण गांगुली यांना यावेळी अध्यक्षपद देण्यात आले आणि जय यांच्याकडे सचिवपद देण्यात आले.
 • तसेच प्रत्येक क्रिकेट मंडळाचा एक प्रतिनिधी आयसीसीमध्ये पाठवायचा असतो. साधारणत: देशाच्या मंडळाचे अध्यक्ष हे आयसीसीवर जातात, असे पाहिले गेले आहे. पण यावेळी ही जबाबदारी बीसीसीआयने सचिव जय यांच्यावर सोपवली आहे.
 • जय हे बीसीसीआयचे आयसीसीमध्ये प्रतिनिधीत्व करतील. बीसीसीआयच्याकडून आयसीसीच्या बैठकीला जाण्याचा अधिकार त्यांच्याकडे असेल. त्याचबरोबर बीसीसीआयचे म्हणणे ते आयसीसीकडे मांडू शकतील.
 • तर जेव्हा गांगुली यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होता, तेव्हा त्यांचा कार्यकाळ हा 9 महिन्यांचा असेल, असे सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयानुसार हा कार्यकाळ ठरवण्यात आला होता. पण हा नियम बदलण्याची मागणी करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयानेही या गोष्टी परवानगी दिल्यामुळे आता सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी 2024 सालापर्यंत राहू शकतात.

दिनविशेष :

 • 2 डिसेंबरजागतिक गुलामगिरी मुक्तता दिन
 • 2 डिसेंबर 1402 मध्ये लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
 • 2 डिसेंबर 1942 मध्ये एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.