SRPF Police Bharti Question Set 4

SRPF Police Bharti Question Set 4

1. ‘दुष्काळ’ याची फोड —– अशी होती?

  1.  दस+काळ
  2.  दुष:+काळ
  3.  दु:+काळ
  4.  दु+काळ

उत्तर :दु:+काळ


 2. ‘दुर्दशा, दुर्गुण, सुशिक्षित, दुराग्रह’ हे सामासिक शब्द —– समासाची उदाहरणे आहेत.

  1.  नत्रबहूव्रीही
  2.  इतरेतर व्दंव्द
  3.  कर्मधारय
  4.  षष्ठी तत्पपुरुष

उत्तर :कर्मधारय


 3. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

  1.  रितीवचक
  2.  रीतिवाचक
  3.  रीतीवाचक
  4.  रितिवाचक

उत्तर :रीतिवाचक


 4. शुद्धलेखनादृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

  1.  प्रतीकुल
  2.  प्रतीकूल
  3.  प्रतिकूल
  4.  प्रतिकुल

उत्तर :प्रतिकूल


 5. आळस या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

  1.  कामसू
  2.  उत्साह
  3.  कष्टाळू
  4.  कांक्षा

उत्तर :उत्साह


 6. गोखले यांना ‘भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगारांचा युवराज’ असे कोणी संबोधले?

  1.  रविंद्रनाथ टागोर
  2.  म.नो. रानडे
  3.  बाळ गंगाधर टिळक
  4.  जॉन मोर्ले

उत्तर :बाळ गंगाधर टिळक


 7. ‘दिनबंधू’ या नावाने कोणाला ओळखण्यात येते?

  1.  लुई फिशर
  2.  जॉन भिड
  3.  डेव्हिड हेअर
  4.  चार्ल्स अॅनड्रयुज

उत्तर :चार्ल्स अॅनड्रयुज


 8. भातसा, वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत?

  1.  ठाणे
  2.  पुणे
  3.  अहमदनगर
  4.  नाशिक

उत्तर :ठाणे


 9. महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले?

  1.  महंमद गझनी
  2.  महम्मद घोरी
  3.  अल्तमश
  4.  अल्लाउद्दीन खिलजी

उत्तर :अल्लाउद्दीन खिलजी


 10. महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद पूर्वीचे खडकी हे शहर कोणी वसविले?

  1.  औरंगजेब
  2.  मलिकअंबर
  3.  अफजलखान
  4.  मुर्तुजा निजाम

उत्तर :मलिकअंबर


 11. सन 1665 मध्ये पुरंदरचा तह कोणामध्ये झाला?

  1.  शिवाजी महाराज आणि मानसिंग राजा
  2.  शिवाजी महाराज आणि जयसिंग राजा
  3.  शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान
  4.  शिवाजी महाराज आणि अफजलखान

उत्तर :शिवाजी महाराज आणि जयसिंग राजा


 12. गोपाळ हरी देशमुखांनी ‘लोकहितवादी’ या नावाने —- या साप्ताहिकातून लिखाण केले?

  1.  दर्पण
  2.  प्रभाकर
  3.  सुधाकर
  4.  दिनमित्र

उत्तर :प्रभाकर


 13. डॉ. आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले?

  1.  सी राजा
  2.  बलदेव सिंग
  3.  बाबू जगजीवनराम
  4.  करणसिंग

उत्तर :बाबू जगजीवनराम


 14. कोल्हापुरात स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते?

  1.  श्रीपतराव शिंदे
  2.  भास्करराव जाधव
  3.  विठ्ठलराव डोणे
  4.  सदाशिव पाटील

उत्तर :भास्करराव जाधव


 15. दिल्ली येथे लॉर्ड हर्डिंग्जवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता?

  1.  रामप्रसाद बिस्मिला
  2.  चंद्रशेखर आझाद
  3.  रामबिहारी बोस
  4.  मन्मदनाथ गुप्ता

उत्तर :रामबिहारी बोस


16. स्वतंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले?

  1.  सी. राजगोपालाचार्य
  2.  राजेंद्र प्रसाद
  3.  माऊंट बॅटन
  4.  जवाहरलाल नेहरू

उत्तर :माऊंट बॅटन


 17. टिळकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

  1.  ओरायन
  2.  ईस्टर्न प्रॉब्लेम
  3.  आर्टिक होम ऑफ वेदाज
  4.  गीता रहस्य

उत्तर :ईस्टर्न प्रॉब्लेम


18. खालीलपैकी कोण होमरूल चळवळीशी संबंधीत होते?

  1.  अॅनी बेझंट
  2.  लोकमान्य टिळक
  3.  बॅरिस्टर जिना
  4.  महात्मा गांधी

उत्तर :लोकमान्य टिळक


19. नक्षलवादी चळवळीचा उगम असलेल्या नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात येतो.

  1.  पश्चिम बंगाल
  2.  आंध्र प्रदेश
  3.  छत्तीसगढ
  4.  बिहार

उत्तर :पश्चिम बंगाल


20. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

विस्तृत : व्यापक :: जरब : ?

  1.  वचक
  2.  काळजी
  3.  त्वेष
  4.  शिक्षा

उत्तर : वचक

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.