RRB Question SET 1

RRB Question SET 1

इतिहासावरील प्रश्न :

1. वसईचा तह कोणात झाला?

  1.  टिपू सुलतान – इंग्रज
  2.  दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज
  3.  रघुनाथ पेशवे – इंग्रज
  4.  पेशवे – पोर्तुगीज

उत्तर : दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज


 2. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते?

  1.  आत्माराव तर्खडकर
  2.  रा.गो. भांडारकर
  3.  गो.ग.आगरकर
  4.  न्यायमूर्ती म.गो. रानडे

उत्तर :गो.ग.आगरकर


3. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले?

  1.  पीट्स इंडिया
  2.  1935 चा कायदा
  3.  रेग्युलेटिंग अॅक्ट
  4.  रौलेक्ट अॅक्ट

उत्तर :रौलेक्ट अॅक्ट


4. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?

  1.  सर वॉरन हेस्टिंग
  2.  लॉर्ड विल्यम बेटींक
  3.  लॉर्ड डलहौसी
  4.  लॉर्ड क्लोईव्ह

उत्तर :लॉर्ड विल्यम बेटींक


5. सन 1848 ते 1856 या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

  1.  लॉर्ड लिटन
  2.  लॉर्ड कर्झन
  3.  लॉर्ड क्लाईव्ह
  4.  लॉर्ड डलहौसी

उत्तर :लॉर्ड डलहौसी


6. —– रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला?

  1.  29 मार्च 1857
  2.  26 मार्च 1857
  3.  28 डिसेंबर 1853
  4.  13 मार्च 1857

उत्तर :29 मार्च 1857


7 —– रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण फलटणच बंड करून उठली?

  1.  8 मे 1857
  2.  9 मे 1857
  3.  10 मे 1857
  4.  11 मे 1857

उत्तर :10 मे 1857


8. खालीलपैकी —– येथे 1857 चा उठाव झाला नव्हता?

  1.  अलाहाबाद
  2.  दिल्ली
  3.  मद्रास
  4.  अयोध्या

उत्तर :मद्रास


9. काँग्रेसचे 1936 चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?

  1.  फैजपूर
  2.  आवडी
  3.  मद्रास
  4.  रामनगर

उत्तर :फैजपूर


10. चौरी-चौरा घटनेने —– हे आंदोलन संपुष्टात आले?

  1.  रौलट विरोधी सत्याग्रह
  2.  छोडो भारत
  3.  असहकार
  4.  सविनय कायदेभंग

उत्तर : असहकार


11. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

  1.  व्योमेशचंद्र बॅनर्जी
  2.  दादाभाई नौरोजी
  3.  बद्रुद्दीन तैय्यबजी
  4.  महात्मा गांधी

उत्तर :व्योमेशचंद्र बॅनर्जी


12. स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?

  1.  रिपन
  2.  लिटन
  3.  डफरीन
  4.  कॉर्नवॉलिस

उत्तर :रिपन


13. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण?

  1.  लॉर्ड माऊंटबॅटन
  2.  सी. राजगोपालचारी
  3.  बॅरिस्टर जिना
  4.  सरदार पटेल

उत्तर :लॉर्ड माऊंटबॅटन


14. खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण होते?

  1.  महात्मा गांधी
  2.  मंहमद इक्बाल
  3.  खान अब्दुल गफारखान
  4.  मौलाना आझाद

उत्तर :खान अब्दुल गफारखान


15. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?

  1.  मंगल पांडे
  2.  लोकमान्य टिळक
  3.  वीर सावरकर
  4.  गो.कृ.गोखले

उत्तर :लोकमान्य टिळक


16. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

  1.  रवींद्रनाथ टागोर
  2.  लाला लजपतराय
  3.  लाला हरदयाळ
  4.  महात्मा गांधी

उत्तर :रवींद्रनाथ टागोर


17. सन 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?

  1.  लॉर्ड कॅनिंग
  2.  लॉर्ड डलहौसी
  3.  लॉर्ड बेंटिक
  4.  लॉर्ड रिपन

उत्तर :लॉर्ड कॅनिंग


18. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकार्‍याने पुढाकार घेतला?

  1.  लॉर्ड रिपन
  2.  अॅलन ह्युम
  3.  लॉर्ड डफरिन
  4.  लॉर्ड कर्झन

उत्तर :अॅलन ह्युम


19. 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली?

  1.  लॉर्ड कर्झन
  2.  लॉर्ड मिंटो
  3.  लॉर्ड चेम्सफोर्ड
  4.  पंचम जॉर्ज

उत्तर :लॉर्ड कर्झन


20. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?

  1.  1905
  2.  1906
  3.  1907
  4.  1908 

उत्तर : 1906

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.