Police Bharti Question Set 9

Police Bharti Question Set 9

1. महाराष्ट्रात पोलीस दलाची स्थापना कधी झाली?

 1.  15 ऑगस्ट 1947
 2.  26 जानेवारी 1950
 3.  2 जानेवारी 1961
 4.  2 ऑक्टोबर 1984

उत्तर : 2 जानेवारी 1961


 

2. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण ?

 1.  सत्यपाल सिंह
 2.  मिरा बोरवणकर
 3.  राकेश मारीया
 4.  हिमांशु रॉय

उत्तर :राकेश मारीया


 

3. पुढील पैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही?

 1.  गुजराती
 2.  संस्कृत
 3.  हिंदी
 4.  तमिळ

उत्तर :तमिळ


 

4. मी रस्त्यात पडलो. यात अधोरेखीत शब्दात सामान्य रूप कोणते आहे?

 1.  रस्ता
 2.  रस्त्या
 3.  रस्त्यात
 4.  रस्त्यात पडलो

उत्तर :रस्त्या


 

5. दयाळू हे कोणते नाम आहे?

 1.  भाववाचक
 2.  सर्वनाम
 3.  विशेषनाम
 4.  सामान्यनाम

उत्तर :भाववाचक


 

6. एकूण मुळ सर्वनाम किती आहेत?

 1.  9
 2.  4
 3.  5
 4.  13

उत्तर :9


 

7. ‘जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल’

वरील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

 1.  दर्शक सर्वनाम
 2.  पुरुषवाचक सर्वनाम
 3.  आत्मवाचक सर्वनाम
 4.  संबंधी सर्वनाम

उत्तर :संबंधी सर्वनाम


 

8. गणनावाचक संख्या विशेषण ओळखा.

 1.  काही तास
 2.  अर्धा तास
 3.  मागील तास
 4.  पहिला तास

उत्तर :अर्धा तास


9. ‘तो घोडा शर्यतीत पहिला आला.’ या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा.

 1.  घोडा
 2.  तो
 3.  पहिला
 4.  आला

उत्तर :तो


 

10. ‘पक्षी झाडावर बसतो.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

 1.  पक्षी
 2.  झाड
 3.  वर
 4.  बसतो  

उत्तर :वर


 

11. गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

 1.  स्वरसंधी
 2.  व्यंजनसंधी
 3.  विसर्गसंधी
 4.  विशेषसंधी

उत्तर :स्वरसंधी


 

12. खाली दिलेल्या शब्दातून नपुसकलिंगी शब्द ओळखा.

 1.  ट्रक
 2.  पेटी
 3.  लेखणी
 4.  वरण

उत्तर :वरण


 

13. मितव्ययी म्हणजे —–

 1.  कमी बोलणारा
 2.  कमी खाणारा
 3.  न रागावणारा
 4.  काटकसरीने राहणारा

उत्तर :काटकसरीने राहणारा


 

14. इच्छिलेली वस्तु देणारे झाड या शब्दसमुहासाठी खालील पैकी योग्य शब्दाची निवड करा.

 1.  कामधेनु
 2.  चिंतामणी
 3.  देवगंध
 4.  कल्पवृक्ष

उत्तर :कल्पवृक्ष


 

15. सहा महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे या शब्दसमुहाकरिता योग्य पर्याय कोणता.

 1.  षंमासिक
 2.  साप्ताहिक
 3.  पाक्षिक
 4.  मासिक

उत्तर :षंमासिक


 

16. उंबराचे फूल होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

 1.  सहज उपलब्ध होणे
 2.  दुर्मिळ होणे
 3.  फूल होणे
 4.  यापैकी नाही

उत्तर :दुर्मिळ होणे


 

17. खाली दिलेल्या शब्दापैकी ‘समुद्र’ चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता?

 1.  समीकरण
 2.  सिंधू
 3.  अर्णव
 4.  रत्नाकार

उत्तर :समीकरण


 

18. ‘प्रतिबिंब’ या शब्दास समानार्थी असलेला शब्द कोणता.

 1.  बिंबवने
 2.  पडछाया
 3.  आरसा
 4.  प्रतिमा

उत्तर :पडछाया


 

19. ‘अधोमुख’ या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द कोणता.

 1.  संमुख
 2.  उन्मुख
 3.  विमुख
 4.  दुर्मुख

उत्तर :विमुख


 

20. ‘साखरेचे खाणार त्या देव देणार’ याचा अर्थ सांगा.

 1.  गोड खाल्ले की देव भरपूर देतो.
 2.  देवाने दिले तर गोड खावे
 3.  जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो.
 4.  जशी इच्छा तशी फळ मिळत नाही.

उत्तर :जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.