पहल योजना (Pahal Yojana)

पहल योजना (Pahal Yojana)

*पहल योजना 1 जानेवारी 2015 रोजी लागू करण्यात आली.

Must Read (नक्की वाचा):

राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM)

पहल योजनेचा उद्देश – स्वयंपाकघरामध्ये वापरात येणार्‍या गॅसचे सरकारी अनुदान देशभरातील लाभार्थ्याँच्या थेट बँक खात्यात जमा करणे.

*थेट लाभार्थी हस्तांतरण योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी ही प्रक्रिया “पहल” (प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ) या नावाने ओळखली जाते.

*जून 2013 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आधारकार्ड संलग्न बँक खात्यात लाभार्थी रक्कम जमा होण्याची योजना सुरू केली होती; परंतु आधारकार्डच्या अटीने या योजनेस प्रतिसाद मिळू शकला नाही.

*सध्याच्या सरकारव्दारे LPG GAS Sylinder वर अनुदान प्रथम रद्द केले; परंतु 1 जानेवारी, 2015 पासून पुन्हा लागू केले, ज्यासाठी आता आधारकार्ड महत्वपूर्ण (सक्तीचे) बनविण्यात आले नाही.

पहल योजनेअंतर्गत सबसिडी (अनुदान) प्राप्त करण्यासाठी आवश्यक सामग्री –

1. LPG GAS Sylinder वर अनुदानासाठी ग्राहकास आपल्या बँक पासबुकची फोटोकॉपी जमा करावी लागेल.

2. आधारकार्ड किंवा ओळखपत्राची कॉपी

3. 17 Digit LPG ID दिला जातो. त्याचबरोबर वितरकास बँक अकाऊंटची माहिती दिली जाते. ज्यामार्फत ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

*सध्या 98 कोटी लोकांना आधार नंबर देण्यात आला असून प्रति सरासरी 26 लाख बायोमेट्रिक आणि 1.5 लाख ई-KYC पेमेंट करण्यात येतात. आधारकार्ड 11.19 कोटी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) खात्याशी जोडण्यात आला आहे. परंतु देशामध्ये 16.5 कोटी LPG ग्राहक खात्यामध्ये अनुदानाचा लाभ घेत आहेत.

*पहल योजनेअंतर्गत ग्राहकास LPG GAS Sylinder साधारणत: 960 रुपयांमध्ये प्राप्त होईल. ज्याची योग्य किंमत साधारणता 460 रु. आहे. उर्वरित रक्कम ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये अनुदान स्वरुपात जमा करण्यात येईल.

*पहल योजना 1 जून 2013 रोजी देशातील 291 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली. सुधारित योजना 15 नोव्हेंबर 2014 रोजी 54 जिल्ह्यांत, तर 1 जानेवारी 2015 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे.

*पहल योजना जगातील सर्वात मोठी रोख हस्तांतरण योजना म्हणून “गिनीज बुक” मध्ये नोंद करण्यात आली आहे.

*पहल योजनेअंतर्गत ग्राहकास सिलिंडरविषयक सेवेसंबंधी माहिती www.mylpq.in या वेबसाईटवर पाहता येईल.

*पहल योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणार्‍या व्यक्तींना LPG GAS Sylinder लाभ न देण्याचा निर्णय केंद्र शासनाव्दारे घेण्यात आला आहे. सध्या 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्‍यांचे प्रमाण 20.26 लाख आहे.   

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.