चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार

चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार

  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने भारतात चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठीचे केंद्र स्थापन करण्याची घोषणा 11 ऑक्टोबर 2018 रोजी केली.

oudyogik krantiche kendra

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र

  • हे केंद्र महाराष्ट्रात स्थापन केले जाईल. या केंद्राने ड्रोन्स, कृत्रिम बुद्धिमत्ताब्लॉकचेन तंत्रज्ञान हे तीन प्रकल्प सुरूवातीला हाती घेतले आहेत.
  • हे केंद्र केंद्रशासनाच्या सहकार्याने नवीन तंत्रज्ञानासाठी धोरण आराखडे व तत्वे तयार करण्याचे काम करेल. या कामात उद्योग, अॅकॅडमीक्स, स्टार्ट अप्स व आंतरराष्ट्रीय संघटना यांच्यामधील तज्ज्ञांकडून साहाय्य घेतले जाईल.
  • WEF ने सुरूवातीला महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांशी नवीन तंत्रज्ञानात्मक पुढाकारासाठी भागीदारी केली आहे. यापुढे अजून इतर राज्यांशी भागीदारीसाठी WEF प्रयत्न करेल.
  • हा प्रकल्प संपूर्ण भारतभर व जगभर लागू होईल. WEF च्या जागतिक नेटवर्कचा भाग म्हणून भारतातील हे केंद्र सॅन फ्रान्सिको, टोकयो, बीजींग या केंद्राच्या समवेत कार्यरत राहील.

औद्योगिक क्रांतीविषयी माहिती –

आधीच्या तीन औद्योगिक क्रांती खालीलप्रमाणे –

  • पहिली औद्योगिक क्रांती (18व्या शतकाच्या उत्तरार्धात): कापड उद्योगाचे यांत्रिकीकरण, वाफेचे इंजिन.
  • दुसरी औद्योगिक क्रांती (19व्या शतकाचा उत्तरार्ध): विजेचा शोध, वाहतूक, रसायने, स्टील या उद्योगांचा विकास.
  • तिसरी औद्योगिक क्रांती (20व्या शतकाच्या उत्तरार्ध): इलेट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, संगणक या क्षेत्राचा विकास.

चौथी ओद्योगिक क्रांतीविषयी माहिती –

  • ही तिसर्‍या क्रांतीचेच विस्तारित रूप असेल. यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील विकास अतिजलद गतीने होईल.
  • ही क्रांती Cyber-Physical (सायबर-भौतिक) क्षेत्रामधील असेल. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence),
  • रोबोटिक्स, बिगडाटा अॅनॅलिटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, नॅनो तंत्रज्ञान, क्वांटम कम्युटिंग यांचा समावेश असेल.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.