भारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार

भारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार

  • भारत-बांग्लादेशदरम्यान 25 ऑक्टोबर 2018 रोजी भू आणि किनारी जलमार्ग जोडणी (Inland & Coastal Waterways Connectivity) बाबत विविध करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या.

bharat-bangladesh yaanchyat bhoo aani kinari jalmarg jodani karar

महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –

  • बांग्लादेशातील छत्तोग्राम आणि मोंगला ही दोन बंदरे वाहतुकीसाठी भारतास वापरता येणार.
  • भारतातील धुब्रीन आणि बांग्लादेशातील पांगावनीन (Pangaonin) या बंदरांमधून व्यापारी वाहतुकीसाठी भूजल वाहतूक आणि व्यापार प्रोटोकॉलवर (Protocol on Inland Water Transit & Trade – PIWTT) स्वाक्षरी.
  • बंदरांबाबतचे इतर करारविषयी माहिती
    i) आसाममधील करीमगंज आणि बांग्लादेशमधील अशुगंज या बंदरांचा व्यापारासाठी समावेश. उभय देशांना एकमेकांची बंदरे व्यापारासाठी वापरता येणार.
    ii) भारतातील कोलकाता आणि हल्दिया ही बंदरे तर बांग्लादेशमधील मोंगला ही बंदरे जलमार्गाने ईशान्येकडील राज्यांस जोडणार.
  • कोलकाता-ढाका-गुवाहाटी-जोरहाट या ठिकाणांना जाण्यासाठी क्रूस प्रकारातील बोटींची सुविधा निर्माण करण्यात येणार.
  • आसामचे अंतर कमी करणे: सन 1996 मध्ये उभय देशांदरम्यान भागीरथी नदीवर जांगीपूरदरम्यानचा अडथळा दूर करून गंगेच्या पाण्याचा संयुक्त वापर करणारा करार झाला होता. या कराराचा आधार घेऊन धुलियन आणि राजशाही (दोन्ही ठिकाणे बांग्लादेश हा जलमार्ग जोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे आसामपर्यंत जाण्यासाठी लागणारे अंतर 450 km कमी होणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.