नमामि गंगे योजना (Namami Gange Yojana)

Namami Gange Yojana

नमामि गंगे योजना (Namami Gange Yojana)

7 जुलै 2016 रोजी जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांच्याव्दारे हरिव्दारमध्ये नमामि गंगे योजनेचे उद्घाटन करण्यात आले. नमामि गंगे योजनेसाठी संपूर्ण खर्च केंद्र सरकारव्दारे करण्यात येईल. नमामि गंगे योजनेचा दूसरा टप्पा वर्ष 2018 पासून सुरू होईल.
Must Read (नक्की वाचा):

पहल योजना (Pahal Yojana)

 • नमामि गंगे योजनेचे कार्य 3 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल.
 • नमामि गंगे योजना 5 राज्यांमध्ये गंगा किनारी स्थापित 103 गावे, झोपडपट्टी आणि शहरांमध्ये या योजनेचे कार्य करण्यात येईल.
 • नमामि गंगे योजना उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, प. बंगाल, हरियाणा आणि दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली आहे.
 • नमामि गंगे योजनेअंतर्गत गंगा नदीमध्ये मिसळणारे अस्वच्छ पाणी, अस्थविसर्जन, कचरा इत्यादि बंद करण्यासाठी नदीकिनार्‍यावर Sivej Tritment Plan राबविण्यात येईल.
 • नमामि गंगे योजनेअंतर्गत घाटांची निर्मिती आणि आधुनिकीकरण करण्यात येईल.
 • नमामि गंगे योजनेअंतर्गत 231 प्रोजेक्ट सुरू करण्यात आले आहेत.
 • गंगा नदीकिनारी 8 जैव-विभाजन पार्क विकसित करण्यात येतील.
 • गंगा नदीकिनार्‍यालगत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येईल.
 • नमामि गंगे योजनेसाठी जपानव्दारे वित्तीय मदत प्राप्त होईल.
 • नमामि गंगे योजनेची उद्दिष्ट – गंगेच्या संवर्धन, संरक्षण, शुद्धीकरणाचा सर्वंकष कार्यक्रम
 • नमामि गंगे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची त्रिस्तरीय यंत्रणाराष्ट्रीय स्तर – उच्चस्तरीय कार्यकारी गट – अध्यक्ष कॅबिनेट सचिव
 • राज्य स्तर – मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समित्या
 • जिल्हा स्तर – जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समित्या
 • नमामि गंगे प्रकल्पावर येत्या 5 वर्षांत 20,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
 • नमामि गंगे योजनेअंतर्गत मार्च 2019 पर्यंत गंगेत सांडपाणी जाणारच नाही हे केंद्र सरकारव्दारे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
 • नमामि गंगे योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी “राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान” व संबंधित राज्यातील राज्या कार्यक्रम व्यवस्थापन गटांवर सोपविण्यात आली आहे.
 • नमामि गंगे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगेच्या किनारी राहणारे लोक व स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी करून घेण्यात येतील.
 • नमामि गंगे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “गंगा टास्क फोर्स” ची स्थापना करण्यात येणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.