राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM)
राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM)
*केंद्र सरकारव्दारे 28 जुलै, 2014 रोजी स्वदेशी गायींचे संरक्षण आणि प्रजातीच्या विकासास वैज्ञानिक पद्धतीने प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन (राष्ट्रव्यापी योजना) लागू करण्यात आले.
*राष्ट्रीय गोकुळ मिशनचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याव्दारे नवी दिल्ली येथे करण्यात आले.
*राष्ट्रीय गोकुळ मिशन ही राष्ट्रीय पशू प्रजनन व डेअरी विकास कार्यक्रम (NPBBOO) वर केंद्रीय योजना आहे.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रीय गोकुळ मिशनचा उद्देश –
1. दूध उत्पादन व उत्पादकतेत वाढ घडवून आणणे.
2. स्वदेशी प्रजातीचा विकास आणि संरक्षण करणे
3. स्वदेशी पशू प्रजातीसाठी प्रजाती सुधारणा कार्यक्रम सुरू करणे, ज्यातून आनुवंशिक सुधार आणि गुरांच्या संख्येत वृद्धी होऊ शकेल.
4. चांगल्या पैदाशीसाठी रोगमुक्त आनुवंशिक गुणवत्ता असलेल्या वाळूंचा पुरवठा करण्यात येईल.
*राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेसाठी सरकारव्दारे वित्तीय वर्ष 2014-15 मध्ये 150 कोटी रुपये वितरित करण्यात आले.
*राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेवर 12 व्या पंचवार्षिक योजनेत 500 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. हा खर्च पुढील घटकांवर करण्यात येईल.
5. सर्वंकष स्वदेशी गुरे केंद्र जसे गोकुळ ग्राम स्थापन करणे.
6. उच्च आनुवंशिक योग्यतेच्या स्वदेशी प्रजातीच्या संरक्षणासाठी वळूंचा पुरवठा करणे.
7. देशी गुरांच्या उच्च जाती पाळणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यात येईल अशा शेतकर्यांना व संस्थांना अनुक्रमे “गोपाल रत्न” व “कामधेनु पुरस्कार” देण्यात येतील.
*राष्ट्रीय गोकुळ मिशन राज्य व्यवस्थापन एजन्सीव्दारे कार्यान्वित केली जाईल.
*राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत एकत्रित निधी स्वदेशी पशू केंद्र, गोकुळ ग्रामची स्थापना स्वदेशी प्रजाती प्रजनन भागामध्ये केली जाईल.
*गोकुळ ग्रामची स्थापना पीपीपी (सार्वजनिक-खासगी-भागीदारी) मॉडेल अंतर्गत करण्यात येईल.
*गोकुळ ग्राम शेतकर्यांसाठी प्रशिक्षण केंद्रामध्ये आधुनिक सुविधांचा पुरवठा करेल.
*गोकुळ ग्रामच्या 1000 जनावरांच्या क्षमतेमध्ये दुभत्या व बिगर दुभत्या जनावरांचे प्रमाण 60:40 असे असेल.
*गोकुळ ग्राम जनावरांचा पोषणासंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी गोकुळ ग्राममध्येच चारा उत्पादित केला जातो.
*गोकुळ ग्राम एक संस्था असेल जी खालील पदार्थांची विक्री करून अर्थिक साधनसाम्रागी उभी करेल.
1. दूध
2. जैविक खाद्य
3. मूत्र विसर्जन
4. घरातील वापरासाठी बायोगॅसपासून ऊर्जेचे उत्पादन
5. पशू उत्पादनाची विक्री करून.