मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency Yojana- MUDRA)

मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency Yojana- MUDRA)

योजनेची घोषणावित्तमंत्री अरुण जेटली यांनी 2015-16 च्या अंदाजपत्रकीय भाषणात मुद्रा योजनेची घोषणा केली.

योजनेची सुरुवात8 एप्रिल 2015

योजनेचे उद्देश

1.सूक्ष्म वित्त संस्था (MFI) आणि छोटे व्यापारी, रिटेलर, स्वसहायता गट आणि व्यक्तींना उधार देणार्‍या कंपनीस वित्तीय प्रक्रियांमध्ये मदत करणे.

2.लघु व सूक्ष्म व्यवसाय करणार्‍या स्व उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणे.

3.व्यवसायांस सूक्ष्म वित्तपुरवठा करणार्‍या संस्थांना धोरण ठरविण्यासाठी मार्गदर्शन तत्वे ठरवून देणे.

4.सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांची नोंदणी करणे व अशा संस्थांवर देखरेख ठेवणे, त्याचबरोबर त्यांचा दर्जा ठरविणे.

5.सूक्ष्म उद्योगांना देण्यात येणार्‍या कर्जासाठी गॅरंटी म्हणून क्रेडिट गॅरंटी स्कीम तयार करणे

6.वितरित करण्यात आलेल्या कर्जाची पाहणी, कर्ज घेणे आणि देण्याच्या प्रक्रियेमध्ये मदतीसाठी योग्य तंत्रज्ञान उपलब्ध करणे

7.लघुउद्योगांना वित्त पुरवठा करणे.

मुद्रा बँकेचे लक्ष्य –

1.अनौपचारिक क्षेत्रातील लघु व्यावसायिक आणि देशातील काही इतर महत्वाकांक्षी छोट्या व्यवसायिकांना 5.7 कोटींपेक्षा अधिक बँक कर्ज उपलब्ध करणे.

2.छोट्या उद्योगांसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करणे

*या योजनेअंतर्गत कर्जाची उपलब्धता ही फक्त छोट्या व्यापर्‍यांसाठी करण्यात आली आहे.

*ही योजना शेती, वाहतूक, सामुदायिक, सामाजिक व वैयक्तिक सेवा, खाद्य उत्पादन आणि टेक्स्टाईल क्षेत्र इ. साठी लागू करण्यात आली आहे.

*या योजनेअंतर्गत शैक्षणिक, घर खरेदी करणे यासारख्या उद्देशांसाठी कर्ज दिले जात नाही.  

मुद्रा बँक योजनेचा लाभ –

1.या योजनेतून शिक्षित युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.

2.या योजनेतून छोट्या व्यापार्‍यांचे मनोबल वाढून देशाचा आर्थिक विकास साध्य करता येईल.

*मुद्रा बँक योजनेअंतर्गत लघुउद्योगांना विकासाच्या अवस्थांच्या आधारे तीन प्रकारे वित्त पुरवठा केला जातो.

1.शिशू श्रेणी व्यवसायास 50,000 रु. कर्ज मिळू शकते.

2.किशोर श्रेणी व्यवसायास 50,000 ते 5,00,000 रु. कर्ज मिळू शकते.

3.तरुण श्रेणी व्यवसायिकास 5 ते 10 लाख रु. कर्ज मिळू शकते.

मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठीची पात्राता –

1.ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.

2.देशातील कोणतीही व्यक्ती ज्याचा स्वत:च्या किंवा एखाद्या बरोबर भागीदारीचा व्यापार आहे, अशा व्यक्ती आपल्या कागद पत्रांमर्फत मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकते.

महत्वपूर्ण कागदपत्रे –

MUDRA योजेंचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आयश्यक ठरते.

1.स्व-सत्य प्रमाणपत्र

2.दोन फोटोग्राफ

3.जात प्रमाणपत्र (ST/SC)

4.उद्योगासंबंधित कागदपत्रे, लायसेन्स व सर्टिफिकेट

5.उद्योगासंबंधी संपूर्ण माहिती

*मुद्रा बँक योजना सिडबीची उपकंपनी या नात्याने RBI कडे बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून नोंदणीकृत आहे.

*मुद्रा बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे नियंत्रण आहे.

*मुद्रा बँकेअंतर्गत वार्षिक 7% दराने वित्तपुरवठा केला जातो.

*मुद्रा बँकेअंतर्गत जानेवारी 2016 पर्यंत 84,672,36 कोटी रु. वितरित करण्यात आले, ज्यामधील 98,057,33 रु. शिशू श्रेणी 28,359,87 रु. किशोर श्रेणीस आणि 18,255,16 रु. तरुण श्रेणीअंतर्गत वितरित करण्यात आले आहेत.

*मुद्रा बँकेअंतर्गत जानेवारी 2016 पर्यंत एकूण 2.19 कोटी कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेतला, ज्यामधील 162 कोटी महिला कर्जदार, 77.12 लाख नवीन उद्योजक आणि 1.10 कोटी अनुसूचीत जाती/जमाती व इतर मागास वर्गातील कर्जदार आहेत.

MURDA योजनेतील प्रथम 4 लाभार्थी –

1.बबिता (हापूर)

2.राजेश जिंदाल

3.पुष्पा (मुरादनगर)

4.समीरुद्दीन (गाझियाबाद)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.