अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana – APY)

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana – APY)

योजनेची सुरुवात9 मे 2015

*अटल पेन्शन योजना ही योजना स्वावलंबन योजनेच्या जागी सुरू करण्यात आली आहे.

*अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी 18 वर्षे वयाच्या व्यक्तीला बँकेत दरमहा 42 रु. हप्ता स्वरुपात भरावे लागतात. त्यानंतर सदर व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1000 रु. दरमहा पेन्शन मिळेल. याचप्रमाणे दरमहा 210 रु. भरल्यास 5000 रु. दरमहा पेन्शन मिळेल.

*अटल पेन्शन योजना लाभार्थ्यास वय आणि सहभागाच्या आधारावर निश्चित पेन्शन उपलब्ध करते.

*अटल पेन्शन योजनेत सहभागी होणार्‍यांचे वय 18 ते 40 वर्षे असावे.

*अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी ही पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्यामार्फत केली जाते.

*अटल पेन्शन योजने अंतर्गत लाभार्थ्याचे वय 60 वर्षे झाल्यावर 1000 ते 5000 रु. प्रतिमहिना पेन्शन मिळणार आहे.

*अटल पेन्शन योजना सर्व बँक खातेधारकांसाठी खुली आहे.

*अटल पेन्शन योजनेअंतर्गत मासिक 50% हप्ता केंद्र सरकार (कमाल 1000 रु.) भरणार आहे. हा लाभ घेण्यासाठी खाते उघडण्याची मुदत 31 मार्च, 2016 पर्यंत होती.

*अटल पेन्शन योजनेचे व्यवस्थापन PFRDA व्दारे पाहिले जातो.

*अटल पेन्शन योजनेत ग्राहकास पहिल्या पाच वर्षांसाठी सरकारी योगदान असणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50% राहील. ज्या ग्राहकांसाठी कुठलाही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे.

*अटल पेन्शन योजनेअंतर्गत ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन मिळेल. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एकरकमी परत करण्यात येईल.

*अटल पेन्शन योजनेत कोणती व्यक्ती खाते उघडू/खोलू शकणार नाही. सरकारच्या घोषणेनुसार

1.ज्या व्यक्ती आयकर कराअंतर्गत येतात.

2.ज्या व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत.

3.जे EPF, EPS सारख्या योजनेत सहभागी आहेत.

*सरकारच्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार स्वावलंबन योजनेमध्ये खाते उघडणार्‍या व्यक्तीस सरळ अटल पेन्शन योजनेचा भागीदार बनविण्यात येईल, म्हणजेच त्यांच्या जुन्या पेन्शन योजनेस नवीन पेन्शन योजनेत सहभागी करण्यात येईल.

*अटल पेन्शन योजनेच्या खात्यामध्ये हप्ता जमा करणे सोपे आहे. हा हप्ता ऑटो-डेबिट सुविधेप्रमाणे जमा होईल.

*अटल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन हप्ता वयाच्या 60 वर्षांपर्यंत दरमहा जमा करणे बंधनकारक राहील.

*अटल पेन्शन योजनेस 2015-16 पासून सेवा कारातून 100% सूट देण्यात आली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.