प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Vima Yojana – PMSBY)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Vima Yojana – PMSBY)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याव्दारे 28 फेब्रुवारी 2015 रोजी 2015-16 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

योजनेची कार्यवाही1 जून 2015

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 9 मे 2015 रोजी कोलकत्ता येथे सुरू करण्यात आली.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना एका प्रकारची दुर्घटना विमा पॉलिसी असून ज्याअंतर्गत दुर्घटनेवेळी मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा रकमेसाठी क्लेम केला जाऊ शकतो.

PMSBY अंतर्गत 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्ती लाभ घेण्यास प्राप्त राहतील.

PMSBY योजनेत वार्षिक 12 रुपये हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप जमा होईल.

PMSBY योजनेअंतर्गत लाभार्थ्यास अपंगत्व आल्यास 1 लाख रु., अंशिक अपंगत्व आल्यास 2 लाख रु. व अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास 2 लाख रु. अर्थसाहाय्य मिळेल.

1 जानेवारी 2016 नुसार PMSBY अंतर्गत 2200 पेक्षा अधिक खातेदारांनी अर्थसाहाय्य मिळण्यासाठी अर्ज केले, ज्यातील 1200 खातेदारांना अर्थसाहाय्य देण्यात आले.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही काही कालावधीनंतर प्रधानमंत्री जनधन योजनेशी जोडण्यात येईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एका वर्षासाठी असून पुढील वर्षासाठी ती रिन्यू करणे बंधनकारक राहील.

योजनेची पात्रता –

1.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्ती लाभ घेण्यास पात्र राहतील.

2.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधारकार्ड असणे गरजेचे राहील.

3.जर एखाद्या व्यक्तीचे 1 किंवा त्यापेक्षा अधिक बचत खाती आहेत तेव्हा अशी व्यक्ती कोणत्याही एका खात्याअंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी राहण्याचे मार्ग-

प्रत्येक वर्षी 1 जून अगोदर फॉर्म भरणे. फॉर्म भरल्यानंतर बँक हप्ता रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यातून वजा करून घेतली जाईल.

दूसरा मार्ग – 2 ते 4 वर्षांचा Long Time Risk Coverage आहे. यास ग्राहकाने पसंती दिल्यास हप्ता रक्कम प्रत्येक वर्षी बँक स्वत: लाभार्थ्यांच्या खात्यातून वजा करून या खात्यावर जमा करते.

*प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज बँक, विमा कंपनी किंवा ऑनलाईन या मार्गाने प्राप्त करता येईल.

*प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही प्रथम SBI व्दारे लागू करण्यात आली. नंतर ती खासगी बँक व LIC बरोबर जोडण्यात आली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना समाप्त होण्याचे निकष-

लाभार्थ्यांच्या वयाच्या 70 व्या वर्षी पॉलिसी समाप्त/बंद करण्यात येईल.

जर हप्त्याची रक्कम वेळेवर जमा करण्यात आली नाही तर बँक किंवा विमा कंपनी मार्फत पॉलिसी बंद केली जाऊ शकते.

जर एखाद्या लाभार्थ्याची बँकेत 2 बचत खाती असतील व तो दोन्ही खात्यामार्फत PMSBY योजनेत सहभागी असेल तर अशा लाभार्थ्यास एकाच खात्याअंतर्गत लाभ प्राप्त होईल.

*प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 80 C कलमाअंतर्गत करमुक्त आहे; परंतु जर विमा पॉलिसी अंतर्गत 1 लाख रु. देण्यात आले व फॉर्म 15 G किंवा 15 H जमा नाही करण्यात आला तर एकूण उत्पन्नातून 2% TDS कापण्यात/कमी करण्यात येईल.

*प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबरोबर अटल पेन्शन योजना व जीवन ज्योती योजना सुरू करण्यात आली.

*प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेस 2015-16 पासून सेवा कारातून 100% सूट देण्यात आली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.