मोबाईल मेडिकल यूनिट उपक्रमाबद्दल माहिती

मोबाईल मेडिकल यूनिट उपक्रमाबद्दल माहिती

  • फिरते रुग्णालय सेवा हा एक नवीन उपक्रम आहे.
  • या उपक्रमांतर्गत राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्याच्या सेवांपसून वंचित लोक राहतात. अशा लोकांना आरोग्याच्या सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  • ही फिरती रुग्णालये स्वयंसेवी माध्यामातून चालवण्याची संकल्पना आहे.
  • मिलेनियम डेव्हलेपमेंट गोल्सच्या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये सुधारणा करण्याकरिता समन्वय साधणे. (उदा. बाळमृत्यू, मातामृत्यू दरात घट, आयुर्मान वृद्धी इत्यादी) फिरते वैधकीय पथकाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र स्वरुपाच्या सर्व आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण, शस्त्रक्रिया व प्रसूती सेवा वगळून) व संदर्भ सेवा देणे.
  • मोबाईल मेडिकल यूनिटचा मासिक दैनंदिन कार्यक्रम 20 दिवस क्षेत्रभेटीसाठी, 4 दिवस औषधांचासाठा व वाहनाची देखभाल व दुरूस्ती, अहवाल तयार करणे व मासिक सभा प्रत्येकी 1 दिवस अशा प्रकारचा आहे.
  • सर्व जिल्ह्यांमधील मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पासाठी दुर्गम अथवा अतीदुर्गम (Unserved & underserved areas) भागांची निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्हयासाठी 1 याप्रमाणे 33 जिल्हयांसाठी 22 युनिट आणि नंदुरबार व गोंदियासाठी अधिक प्रत्येकी 2 आणि गडचिरोलीसाठी 3 असे 40 युनिट आहेत.
  • आजपर्यंत 35 स्वयंसेवी संस्थांची निवड मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पासाठी करण्यात आलेली आहे.
  • नंदुरबार, परभणी आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रुग्ण कल्याण समितीपर्यंत प्रकल्प सुरू आहे.
Must Read (नक्की वाचा):

शिक्षण अधिकार कायदा-2009

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.