महत्वाच्या पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती

महत्वाचे पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती

शौर्य पदके :

1. अशोकचक्र-

  • रणांगणा व्यतिरिक्त इतर क्षेत्रात दाखविलेल्या शौर्याबद्दल किंवा असामान्य त्यागाबद्दल दिले जाणारे सर्वोच्च सन्मान पदक ‘अशोकचक्र’ हे पदक सुवर्णाचे असून गोलाकार असते.
  • शांती काळातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • सन 2013 चा पुरस्कार आंध्रप्रदेशातील सबइन्स्पेक्टर के.एल.व्ही. प्रसाद यांना मरणोत्तर देण्यात आला.  

2. कीर्ती चक्र-

  • रणांगणा व्यक्तिरिक्त इतर क्षेत्रात दाखविलेल्या शौर्याबद्दल किंवा असामान्य त्यागाबद्दल दिले जाणारे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च सन्मान पदक.
  • हे पदक चांदीचे असते.
  • सन 2013 चा हा सन्मान मेजर महेश कुमार, लोहित सोनोवाल (मरणोत्तर) आणी अविनाश टॉमी यांना देण्यात आला.

3. शौर्य चक्र-

  •  रणांगणा व्यतिरिक्त इतर क्षेत्रात दाखविलेल्या किंवा असामान्य त्यागाबद्दल दिले जाणारे तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च पदक असून हे पदक ब्रोंझचे असते.

ज्ञानपीठ पुरस्कार  :

  • भारतात साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.
  • 1965 पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
  • 5 लाख रुपयेवाग्देवीची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  1. 44 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2008 : अखलख खान शहरयार (उर्दू साहित्य : ख्वाब के दार बंद है या काव्यसंग्रहासाठी)
  2. 45 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2009 : हिंदी लेखक अमरकांत व श्रीलाल शुल्क यांना संयुक्त.
  3. 46 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2010 : कन्नड लेखक चंद्रशेखर कंबार.
  4. 47 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2011 : प्रतिभा राय (ओरिया)
  5. 48 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2012 : रावुरी भारव्दाज (पकडू रालू या तेलगू कादंबरीसाठी)
  6. 49 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2013 : केदारनाथ सिंह (दिल्ली) हिंदी साहित्यासाठी
  7. 50 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2013 : भालचंद्र नेमाडे (मराठी साहित्यासाठी)

दादासाहेब फाळके पुरस्कार:

  • चित्रपटसृष्टीचे भीष्माचार्य दादासाहेब फाळके यांच्या नावाने सन 1969 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
  • 10 लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  1. दादासाहेब फाळके पुरस्कार – 2010 : के. बालाचन्दर
  2. दादासाहेब फाळके पुरस्कार – 2011 : सोमित्र चॅटर्जी बंगाली चित्रपट निर्माते
  3. दादासाहेब फाळके पुरस्कार – 2012 : अभिनेता प्राण (प्राण कृष्ण सिकंद)
  4. दादासाहेब फाळके पुरस्कार – 2013 : गुलजार
  5. दादासाहेब फाळके पुरस्कार – 2014 : शशीकपूर

62 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – 2014:

  1. सर्वोकृष्ट चित्रपट                  – कोर्ट (मराठी)
  2. उत्कृष्ट मराठी चित्रपट            – किल्ला
  3. उत्कृष्ट करमणूक प्रधान चित्रपट – मेरीकोम
  4. सर्वोकृष्ट दिग्दर्शक                – श्रीजीत मुखर्जी (बांगला, चतुष्कोन)
  5. सर्वोत्कृष्ट अभिनेता               – विजय (कन्नड)
  6. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री               – कंगणा रानावत (व्कीन-हिंदी)
  7. सर्वश्रेष्ट पार्श्वगायक              – सुखविंदरसिंग (हैदर)
  8. सर्वश्रेष्ट गायिका                  – उषा उन्नीकृष्णन (तामिळ)
  9. सर्वश्रेष्ट संगीतकार               – मुथुकुमार (तामिळ)
  10. सर्वश्रेष्ट बालकलाकर           – जे. विग्नेश, व रमेश (तामिळ)
  11. विशेष ज्युरी पुरस्कार          – ख्वाडा (मराठी)

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार – 2014:

  • हा पुरस्कार 7.5 लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह या स्वरुपात देण्यात येतो.
  • 2014 चा पुरस्कार सानिया मिर्झा यांना प्रदान करण्यात आला.
  1. 2013 : रंजन सोढी;     
  2. 2012 : विजय कुमार, योगेश्वर दत्त;     
  3. 2011 : गगन नारंग (नेमबाज);
  4. 2010 : सायना नेहवाल (बॅडमिंटन);     
  5. 2009 : एम.सी. मेरीकोम (बॉक्सिंग), विजेंद्र सिंग (बॉक्सिंग), सुशिलकुमार (कुस्ती) या तीन खेळाडूंना विभागून.

ध्यानचंद पुरस्कार – 2014 :

  1. रोमिओ जेम्स (हॉकी);
  2. शिवप्रकाश मिश्रा (टेनिस);
  • पी.पी, नायर (व्हालीबॉल)

    यांना 2014 चा ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • या पुरस्कारासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र दिले गेले.

द्रोणाचार्य पुरस्कार – 2014:

  • हा पुरस्कार 1985 मध्ये सुरू करण्यात आला.
  • द्रोणाचार्य पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी द्रोणाचार्याची मूर्ती, पाच-पाच लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र दिले गेले.
  1. नवलसिंग (पॅरा अॅथलेटिक्स)
  2. अनुपसिंग (कुस्ती),
  3. हरबनसिंग (अॅथलेटिक्स जीवनगौरव),
  4. स्वतंतर राजसिंग (बॉक्सिंग जीवनगौरव)
  5. निहार अमीन (जलतरण जीवनगौरव)
  • यांना 2014 चा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अर्जुन पुरस्कार – 2014 :

  • 1961 पासून दिले जाऊ लागलेल्या अर्जुन पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, अर्जुनाचा पुतळा व सन्मानपत्र असे आहे.
  1. नेमबाज    – जितू राय
  2. हॉकी       – पी.आर. श्रीजेश
  3. तिरंदाजी   – संदीप कुमार
  4. बॅडमिंटन    – के श्रीकांत
  5. वेटलिफ्टिंग  – सतीश शिवलिंगम
  6. पॅरासेलिंग   – शरद गायकवाड
  7. कबड्डी     – अभिलाषा म्हात्रे
  8. रोलर स्केटिंग- अनुपकुमार यामा
  9. जिम्न्यास्टिक – दीपा कर्माकर
  10. कुस्ती – बबिता बजरंग
  11. क्रिकेट – रोहित शर्मा
  12. नौकानयन – स्वर्णसंग विर्क
  13. वुशु – संथोई देवी
  14. अॅथलॅटिक्स – एम.आर. पुनम्मा
  15. कबड्डी – मनजित चिल्लर

*महाराष्ट्रातील पुरस्कार :

महाराष्ट्र भूषण –

  • ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार युती सरकारने 1996-97 साली कला, क्रीडा व विज्ञान क्षेत्रातील व्यक्तीसाठी सुरू केला होता.
  • 2003 मध्ये यात बदल करून समाज प्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन व आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यक्तींचा या पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येते.
  1. 1996-97      –  पू.ल.देशपांडे
  2. 1997-98      – लता मंगेशकर
  3. 1998-99      – सुनील गावस्कर
  4. 1999-2000  – डॉ. विजय भटकर
  5. 2000-01     – सचिन तेंडुलकर
  6. 2001-02     – भीमसेन जोशी
  7. 2002-03     – डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग
  8. 2003-04     – बाबा आमटे
  9. 2004-05     – डॉ. रघुनाथ माशेलकर
  10. 2005-06   – रतन टाटा
  11. 2006-07  –  रामराव कृष्णराव उर्फ दादासाहेब पाटील
  12. 2007-08  –  मंगेश पाडगावकर आणि नारायण विष्णु उर्फ नानासाहेब धर्माधिकारी.
  13. 2008-09  –  सुलोचना लाटकर (दीदी)
  14. 2009-10  –  डॉ. जयंत नारळीकर
  15. 2010-11  –  डॉ. अनिल काकोटकर
  16. 2014-15  –  बाबासाहेब पुरंदरे

लता मंगेशकर पुरस्कार-

  • हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी पाच लाख रु. व मानचिन्ह या स्वरूपाचा देण्यात येतो.
  1. 2010 – सुलोचना चव्हाण    
  2. 2011- यशवंत देव.    
  3. 2012 – आनंदजी शहा
  4. 2013 – अशोक पत्की     
  5. 2014 – कृष्णा कल्ले     
  6. 2015 – प्रभाकर जोग

लोकमान्य टिळक पुरस्कार – 2015:

  • लोकमान्य टिळक ट्रस्ट, पुणे तर्फे दिल्या जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार 2015 मल्याळम मनोरमाचे संपादक मॅमन मॅथ्यु यांना देण्यात आला.
  • एक लाख रुपये, सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  1. 2008     –    मॉटेकसिंग अहलुवालिया
  2. 2009     –    प्रवण मुखर्जी
  3. 2010     –    शिला दिक्षित
  4. 2011     –    कोटा हरिनारायण
  5. 2012     –    डॉ. प्रकाश व विकास आमटे
  6. 2013     –    दिल्ली मेट्रोचे शिल्पकार इ. श्रीधरण
  7. 2014     –    श्रावण गर्ग (दैनिक भाष्करचे संपादक)      

Must Read (नक्की वाचा):

भारतातील सर्वात जास्त

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.