महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती – कार्य, विचार आणि निबंध

Mahatma Jyotiba Phule (Maharashtratil Samaj Sudharak) Full Information

महात्मा ज्योतिबा फुले

महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती (भाषण) कार्य, विचार आणि निबंध

 • मूळ आडनाव गोह्रे
 • जन्म11 एप्रिल 1827
 • मृत्यू28 नोव्हेंबर 1890
 • 1869 स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.
 • 1852 पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.
 • 21 मे 1888 वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.
 • युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय

आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्‍यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण

फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

विवाह

महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

संस्थात्मक योगदान

 • 3 ऑगस्ट 1848 पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
 • 4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
 • 1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
 • 1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
 • 1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
 • 1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
 • 10 सप्टेंबर 1853 महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
 • 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना.
 • व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
 • 1880 म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
 • महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :
 • 1855तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).
 • 1868ब्राम्हणांचे कसब
 • 1873गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.
 • 1873 अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.
 • 1 जानेवारी 1877 ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.
 • 1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.
 • 1883 शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.
 • 1885 इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.
 • अस्पृश्यांची कैफियत.
 • शिवाजी महाराजांचा पोवाडा. 

महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये

 • थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.
 • 1864 पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
 • 1868 अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.
 • 1879 रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.
 • 2 मार्च 1882 हंटर कमिशन पुढे साक्ष.
 • ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.
 • उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.
 • सत्यशोधक समाजाचे ब्रीद ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी
 • सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.
You might also like
8 Comments
 1. Shikha says

  I like this site

 2. Prashant says

  Please correct DOB,month of Birth is April not May

 3. Rahul Dilip kamble says

  Good study point

 4. sarika says

  I.like it. it is very useful to all.

 5. Nikita Sanjay amle says

  Like

 6. Dashrath karhale says

  nice

 7. Amit Raut says

  विवाह मध्ये नारगाव नसून नायगाव आहे तथापि ते बदलता (Edit) करता येत असल्यास करावे

  1. Dhanshri Patil says

   Corrected. Thank you.

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World