भारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी

Bharatache Viceroy Yanchi Kaamgiri

भारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी

 • अलिगड येथे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेल्या ‘मुस्लिम अॅग्लो-ओरीएंट‘ कॉलेजला सक्रीय प्रोत्साहन व्हाईसरॉय नार्थब्रुकने दिले.
 • सतत पडणार्‍या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी लॉर्ड लिटनने सर रिचर्ड स्टॅची यांच्या अध्यक्षतेखाली एक खास ‘दुष्काळ समिती‘ नेमली होती. याच समितीच्या शिफारशीन्वये 1883 मध्ये ‘दुष्काळ संहिता‘ तयार करण्यात आली.
 • लॉर्ड लिटनने इ.स. 1877 मध्ये दिल्ली येथे दरबार भरवून राणी व्हिक्टोरियाला ‘भारताची सम्राज्ञी‘ किंवा ‘कैसर-ए-हिंद‘ हा किताब दिला.
 • लॉर्ड लिटनने मार्च 1878 मध्ये ‘व्हरनेक्यूलर प्रेस अॅक्ट‘ (देशी वृत्तपत्र कायदा) पास करून देशी वृत्तपत्रावर अनेक बंधने लादली.
 • भारतीयांनी वरील कायद्याची ‘मुस्कटदाबी कायदा‘ (The Gagging Act) अशी संभावना केली.
 • 1879 मध्ये लॉर्ड लिटनने ‘स्टॅट्युटरी सिव्हील अॅक्ट‘ पास करून सनदी सेवेचे वय 21 वर्षावरून 18 वर्षावर आणले.
 • लॉर्ड लिटनने अलिगड येथे स्थापन झालेल्या मुस्लिम विद्यापीठास प्रोत्साहन दिले.
 • लॉर्ड रिपन या उदारमतवादी व्हाईसरॉयची नियुक्ती लॉर्ड लिटननंतर झाली.
 • इ.स. 1881 मध्ये लॉर्ड रिपनने इंग्लंडप्रमाणे भारतात ‘फॅक्टरी अॅक्ट‘ पास केला.
 • लॉर्ड लिटनने केलेला देशीवृत्तपत्रबंदी कायदा लॉर्ड रिपनने 19 जाने. 1881 रोजी रद्द करून मुद्रण स्वातंत्र्य दिले.
 • इ.स. 1854 मध्ये ‘वुड समितीने‘ केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे पाहण्यासाठी लॉर्ड रिपनने 1882 मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली ‘हंटर समिती’ नेमली.
 • लॉर्ड रिपनने 18 मे 1882 रोजी प्रत्येक प्रांतात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी एक ठराव पास केला. त्यामुळे त्यास ‘स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक‘ असे म्हटले जाते.
 • इलबर्ट बिल‘ पास करून रिपनने मोठेच धाडस केले परंतु युरोपियनांच्या सामुहिक प्रतिकारामुळे ते अस्तित्वात येऊ शकले नाही.
 • लॉर्ड डफरिनच्या कारकिरर्दितील महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली.
 • लॉर्ड डफरिनच्या काळात लोकसेवा आयोगाची स्थापना 1886 मध्ये करण्यात आली.
You might also like
2 Comments
 1. Sachin thombare says

  Bharatachya voiceroy yachya nawachi kramanusar. Mandani

 2. Aarman Aayakhan Vanjari says

  Ok

Leave A Reply

Your email address will not be published.