Current Affairs of 9 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2015)

चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2015)

स्विस सरकारने एका नव्या भारतीय कंपनीचे नाव केले जाहीर :

 • परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशांची भारत सरकारच्या वतीने चौकशी सुरू असून स्विस सरकारने मंगळवारी एका नव्या भारतीय कंपनीचे नाव जाहीर केले.
 • इंदूरस्थित वस्त्रोद्योग कंपनी निओ कॉर्प इंटरनॅशनल लि. या कंपनीबाबतची माहिती देण्याची विनंती भारत सरकारने केली असल्याचे स्विस अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • निओ कॉर्प ही 1985 मध्ये छोटी कंपनी सुरू करण्यात आली आणि आता ती बहुराष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग समूह असल्याचा दावा केला जात आहे.
 • कर चुकविल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या विविध संकुलांवर छापे टाकले होते.
 • भारत आणि स्वित्र्झलडमध्ये प्रशासकीय सहाय आणि माहितीची देवाणघेवाण याबाबतचा करार करण्यात आला असून त्याचा एक भाग म्हणून भारताने विविध कंपन्या आणि व्यक्ती यांच्याबद्दलची सविस्तर माहिती मागितली आहे.
 • स्विस सरकारच्या अधिकृत पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतीय कंपन्यांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव नव्याने आले आहे.

महाराणी पदावर राहण्याचा विक्रम राणी एलिझाबेथ यांनी केला :

 • अर्ध्याहून अधिक जगावर ज्या राजसत्तेचे राज्य होते आणि ज्या राजाच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नसे अशा सत्तेमध्ये 63 वर्षे महाराणी पदावरRani Elizabeth राहण्याचा विक्रम राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी केला आहे.
 • वयाच्या 25व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ या आता 89 वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असेही रेकॉर्ड त्यांनी बनविले आहे.
 • आज त्यांना ब्रिटिश राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन 63 वर्षे पूर्ण होत आहेत.
 • या सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले.
 • राणी एलिझाबेथ द्वितीय यांना लहानपणी लिलिबेट अशा नावाने हाक मारली जाई.
 • राणीपदावर असताना त्यांनी विविध देशांना भेटी दिल्या आहेत.
 • आजवर 116 देशांना 265 भेटी देण्याचा त्यांचा विक्रम आहे.
 • अमेरिकेच्या गेल्या 13 राष्ट्राध्यक्षांपैकी त्यांनी 12 राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे.

गगन नारंग आशियाई नेमबाजी क्रमवारीत अव्वल :

 • भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगने 50 मीटर रायफल प्रोन विभागात आशियाई क्रमवारीत अव्वल स्थान घेतले, तर जितू राय याने 50 मीटर पिस्तूल विभागात द्वितीय मानांकन प्राप्त केले.
 • नारंगने लंडन येथे 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते.
 • फोर्ट बेनिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत नारंगने 626.3 गुणांसह अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत 185.8 गुण नोंदवत ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली.
 • 32 वर्षीय नारंगचे आता 971 गुण झाले आहेत.
 • चीनच्या शेंगबो झाओने 896 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.
 • तरपिस्तूल विभागात जितूने 1929 गुण मिळविले आहेत.
 • दक्षिण कोरियाच्या जोंगहो जिनने अव्वल स्थान घेतले आहे.
 • ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने 10 मीटर एअर रायफलमध्ये पाचवे मानांकन मिळवले असून नारंगने या प्रकारात सातवे स्थान घेतले आहे.
 • गुरप्रित सिंगने 25 मीटर रॅपीड फायर पिस्तूलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
 • अभिनव व गुरप्रित यांनी यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.

व्हिलर बेटाचे आता कलाम बेट म्हणून नामांतराची घोषणा :

 • क्षेपणास्त्र चाचणीसाठी वापरले जाणारे व्हिलर बेटाचे (Wheeler Island) आता कलाम बेट (A P J Abdul Kalam Island)  म्हणून नामांतराची अधिकृतAbdul kalam घोषणा ओडिशा सरकारने केली आहे.
 • देशातील तरुणाईला हे बेट आपली शक्ती विकासकामासाठी वापरण्याकरिता सतत प्रेरणा देईल.
 • ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक यांच्या कार्यकाळात 1993 मध्ये सरकारने व्हिलर बेट डीआरडीओच्या ताब्यात दिले.
 • कलाम यांच्या नेतृत्वाखाली डीआरडीओने या बेटावर देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षमतेच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरु केल्या.
 • ऑगस्ट महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मेघालय येथे निधन झाले होते.
 • कलाम यांना श्रद्धांजली म्हणून दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामकरण कलाम रोड असे करण्याच्या निर्णय स्थानिक पालिकेने घेतला.
 • या नामांतरानंतर आता व्हिलर बेटाचे कलाम बेट असे नामांतर करण्यात आले आहे.

मालवाहतुकीच्या वाहनांचेही ऑनलाईन बुकिंग :

 • प्रवासी वाहतुकीसाठी बुक केल्या जाणाऱ्या वाहनांप्रमाणेच आता मालवाहतुकीच्या वाहनांचेही ऑनलाईन बुकिंग करता यावे यासाठी www.sastabhada.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
 • या संकेतस्थळावर मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहतूक धारकांची नोंद करण्यात येणार आहे.
   
 • इंब्युलीयन्स इन्फोवेब कंपनीच्या मदतीने www.sastabhada.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
 • सस्ताभाडा या संकेतस्थळावरून ट्रक किवा टेम्पो बुक केल्यास गाडीच्या मालकासह वाहन बुक करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा फायदा होणाच्या विश्वास संकेतस्थळाच्या निर्मात्यांनी व्यक केला आहे.
 • इंब्युलीयन्स इन्फोवेब प्रायवेट लिमिटेडने यासाठी एक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे.
 • या प्रणाली मुळे कोणतीही जीपीएस प्रणालीचा वापर न करता किवा वाहकाकडे कोणतेही साधन न देताही वाहने ट्रॅक होऊ शकतात.
 • सध्या ही कंपनी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यांमध्ये कार्यरत आहे.

कॉलड्रॉपसाठी नुकसाभरपाई देण्याची ‘ट्राय’ची सूचना :

 • मोबाइलवर कॉल सुरू असताना, तो अचानक मध्येच बंद होण्याची (कॉलड्रॉप) गंभीर दखल घेऊन दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशा सेवा Phoneपुरवठादार कंपन्यांनी ग्राहकांना नुकसाभरपाई द्यावी, असे सुचवले आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॉलड्रॉपविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर ‘ट्राय’ने एक सल्लापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यावर 28 सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
 • सेवेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची नसेल, तर अशा मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला ‘ट्राय’ दंड आकारते.
 • एखाद्या मोबाइल नेटवर्कवरून केलेल्या एकूण कॉलपैकी कॉलड्रॉपचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे ‘ट्राय’चे म्हणणे आहे.
 • ‘ट्राय’ने सुचविल्यानुसार कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये.
 • मात्र पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. अशी भरपाई देताना शेवटची पल्स गृहित धरण्यात येऊ नये.

फिफाच्या क्रमवारीमध्ये भारत 155 व्या स्थानावर :

 • फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून भारत 155 व्या स्थानावर पोहोचले आहेत.fifa
 • फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताला दोन सलग पराभवांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांची 156 व्या स्थानावर घसरण झाली होती.
 • कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेला अर्जेटिनाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.
 • बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानावर असून विश्वविजेता जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

दिनविशेष :

 • 1948 : उत्तर कोरिया प्रजासत्ताक दिन
 • 1991 : ताजिकिस्तान स्वातंत्र्य दिन
 • 1776 : अमेरिकेची अधिकृ्तरित्या देश म्हणून घोषणा करण्यात आली.
 • 1991 : ताजिकिस्तानला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.