Current Affairs of 10 September 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 सप्टेंबर 2015)
सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस जोडीने अंतिम फेरीत :
- अग्रमानांकित भारताच्या सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस जोडीने आपल्या लौकीकास साजेशी कामगिरी करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
- महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत सानिया-मार्टिना जोडीने अकराव्या मानांकित इटलीच्या सारा एर्रानी-फ्लाव्हिया पेन्नेट्टा यांचा 6-4, 6-1 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
- हा सामना 1 तास 17 मिनिटे चालला.
- या विजयामुळे सानिया-मार्टिना आणखी एक ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविण्यापासून एक पाऊल दूर आहेत.
- यावर्षी सानिया-मार्टिना जोडीने विंबल्डनचे विजेतेपद मिळविले होते.
- सानिया-मार्टिना जोडीने उपांत्यपूर्व फेरीत नवव्या मानांकित हाओ-चींग चॅन आणि युंग-जॅन चॅन या तैवानच्या जोडीला 7-6 (7-5), 6-1 असे हरविले होते.
- आता अंतिम फेरीत सानिया-मार्टिनाचा सामना कॅसी डेलेक्वा व यारोस्लावा श्वेदोवा आणि अॅना ग्रोनेफिल्ड व कोको वांडेवेगे यांच्यातील विजेती जोडीशी होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
अनिरुद्ध काथिरवेलने “द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी” स्पर्धा जिंकली :
- भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील “द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी” स्पर्धा जिंकली.
- या स्पर्धेचे बक्षीस 50 हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही दहा हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे.
- तमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे जन्मलेला काथिरवेलचा मंगळवारी गौरव करण्यात आला.
- ऑस्ट्रेलियातील स्पेलिंग बी स्पर्धेत अंतिम पाचमध्ये भारतीय वंशांची मुलगी अर्पिताने (वय 8) धडक मारली होती.
ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधन :
- ग्राफिनला लिथियमच्या अणूंचे आवरण देऊन भौतिकशास्त्रज्ञांनी त्याचे अतिवाहक रूप तयार केले आहे.
- अतिवाहक हा असा पदार्थ असतो ज्यात विशिष्ट तापमानाला विद्युतरोध शून्य असतो, त्यामुळे सगळीच्या सगळी वीज ऱ्हास न होता वाहून नेली जाते.
- अतिवाहकता हा गुणधर्म ग्राफाईटमध्ये काही विशिष्ट त्रिमिती स्फटिकांना अल्कली धातूंच्या अणूंचे आवरण दिल्यास निर्माण होतो हे आधी माहिती होते, पण ग्राफिन म्हणजे एकस्तरीय कार्बनमध्ये अतिवाहकतेचा गुणधर्म निर्माण करता येऊ शकतो याची कल्पना नव्हती.
- तसेच त्यात इलेक्ट्रॉनिक्स व पूंज भौतिकीवर आधारित नॅनो उपकरणे तयार करणे शक्य होणार आहे.
- काही धातूंमध्ये अतिवाहकतेचा गुणधर्म केवल शून्य तापमानाच्या खाली तयार होतो.
- ग्राफिन हे पोलादापेक्षा 200 पट मजबूत असते.
- ग्राफिन हा कार्बन अणूंचा मधाच्या पोळ्यासारखा रचलेला एकच थर असतो.
- आता त्यामुळे अतिवेगवान ट्रान्झिस्टर (इलेक्ट्रॉनिक भाग), अर्धवाहक, संवेदक व पारदर्शक इलेक्ट्रोड तयार करता येणार आहेत.
सहा टक्के वाढीव महागाई भत्ता (डीए) केला जाहीर :
- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सहा टक्के वाढीव महागाई भत्ता (डीए) जाहीर केला आहे.
- म्हणजे आतापर्यंत मूळ वेतनावर 113 टक्के मिळणारा महागाई भत्ता यापुढे 119 टक्के होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज या निर्णयाला मंजुरी दिली.
- 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 56 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल.
“मिसेस इंडिया ग्लोब” स्पर्धेत डॉ. इलाक्षी मोरे-गुप्ता ठरली विजेती :
- ‘वॉव फाउंडेशन’तर्फे घेतल्या जाणाऱ्या “मिसेस इंडिया ग्लोब” स्पर्धेत अकोल्याची डॉ. इलाक्षी मोरे-गुप्ता विजेती ठरली आहे.
- ती आता “मिसेस ग्लोब” स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
- अकोल्याच्या डॉ. शशिकांत व डॉ. मीनाक्षी मोरे या डॉक्टर दाम्पत्याची कन्या असलेल्या इलाक्षीने नागपूर येथून दंतवैद्यक शास्त्रातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
- देशातील एकूण 26 स्पर्धकांचा यात सहभाग असून 5 सप्टेंबरला ही स्पर्धा झाली.
- त्यामुळे डिसेंबर 2015 मध्ये चीन येथे होणाऱ्या मिसेस ग्लोब स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
विराटला ट्विटरवर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या 80 लाखांच्या पुढे :
- विराट कोहलीने कर्णधार बनल्यावर काही महिन्यांतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गजांना मागे टाकलेय.
- विराटला ट्विटरवर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या 80 लाखांच्या पुढे गेली आहे.
- त्याने सचिन आणि धोनीला मागे टाकले होते.
- ट्विटरवर सचिनचे 77 लाख फॉलोअर्स आहेत, तर धोनीचे सुमारे 45 लाख फॉलोअर्स आहेत.
सायना नेहवाल, श्रीकांत, पारुपल्ली कश्यप यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश :
- जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेली भारताची सायना नेहवाल, तिसरा मानांकित किदांबी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप यांनी बुधवारी जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
- दुसरीकडे अजय जयराम, पीव्ही सिंधू यांच्यासह ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या जोडीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
अहमद जावेद मुंबईचे नवे पोलीस आयुक्त :
- मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली आहे.
- तर त्यांच्या जागी होमगार्ड विभागाचे महासमादेशक अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- 1980 च्या बॅचचे आयपीएस असलेले अहमद जावेद यांनी आठ वर्षांपूर्वी मुंबईत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे.
- त्यानंतर त्यांनी अपर महासंचालक (प्रशासन), नवी मुंबईचे पोलीस आयुक्त व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे.
- 18 फेबु्रवारी 2014 रोजी त्यांची महासंचालकपदी बढती मिळून होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
- ते पुढच्या वर्षी 31 जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत.
- त्यामुळे त्यांना आयुक्त म्हणून जेमतेम साडे चार महिन्यांचा कालावधी मिळेल.
- त्यानंतर राज्य सरकार आपल्या अधिकारात तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ शकते.
ओएनजीसीद्वारे व्हॅनकोरनेफ्टमधील 15 टक्के हिस्सा खरेदी
- तेल व वायू क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम ‘ओएनजीसी विदेश लिमिटेड’ने रशियातील व्हॅन्कोर तेलक्षेत्रात कार्यरत व्हॅनकोरनेफ्ट या कंपनीचे 15 टक्के भांडवली समभाग 1.268 अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात ताब्यात घेतले आहेत.
- रशियातील सैबेरिया क्षेत्रात क्रॅस्नोयाक प्रदेशातील तुरुखान्स्की जिल्ह्यात व्हॅन्कोर हे तेलक्षेत्र आहे.
- रशियातील दुसरा मोठा तेलसाठा असलेले या क्षेत्राचे त्या देशाच्या एकूण तेल उत्पादनांत त्याचे 4 टक्के योगदान आहे.
- येथून दिवसाला 4.42 लाख पिंप म्हणजे दरसाल अडीच अब्ज पिंपे तेल मिळविता येईल आणि त्यापैकी 33 लाख टन उत्पादित तेल ओएनजीसी विदेशला प्रतिवर्षी प्राप्त होऊ शकेल.
- 2013 मध्ये ‘ओएनजीसी विदेश लिमिटेड’ने मोझांबिकमधील गॅस साठ्यासाठी 4.125 अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजले होते.
- तर 2009 मध्ये 2.1 अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजून रशियाची इंपेरियल एनर्जी कंपनी विकत घेतली होती.
दिनविशेष :
- जिब्राल्टर राष्ट्र दिन
- चीन शिक्षक दिन
- 1939 : दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- 1943 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने रोममध्ये ठाण मांडले.
- 1974 : गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- 2002 : स्वित्झर्लंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.