Current Affairs (चालू घडामोडी) of 9 March 2015 For MPSC Exams

अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | सायना नेहवाल पराभूत |
2. | मतदान केंद्रावर लागणार बायोमेट्रीक मशीन्स |
3. | पुणे मेट्रोला हिरवा कंदील |
4. | विनोद मेहता यांचे निधन |
सायना नेहवाल पराभूत :
- ऑल इंडिया बॅडमिंट स्पर्धेत सायना नेहवालचा स्पेनच्या कॅरोलिन मरिनने 16-21, 21-14, 21-7 असा पराभव केला.
- स्पेनच्या कॅरोलिन मरिनची ऑल इंडिया बॅडमिंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची पहिलीच वेळ होती.
- ऑल इंडिया बॅडमिंट स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे.
Must Read (नक्की वाचा):
मतदान केंद्रावर लागणार बायोमेट्रीक मशीन्स :
- बोगस मतदनाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील मतदानात मतदारांच्या अंगठ्याचे ठसे बंधनकारक करण्याची तयारी सुरू केली आहे.
- यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बायोमेट्रीक मशीन्स लावल्या जाणार आहेत.
- त्यासाठी मतदारांचे अंगठ्याचे ठसे घेण्याची तयारी सुरू आहे.
पुणे मेट्रोला हिरवा कंदील :
- पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गास पुणे मेट्रोला राज्य शासनाने शनिवारी मान्यता दिली.
- मान्यतेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- यापूर्वी 29 ऑक्टोबर 2013 मध्ये 31.5 किलोमीटरच्या मार्गास मान्यता दिली आहे.
विनोद मेहता यांचे निधन :
- ज्येष्ठ पत्रकार आणि आऊटलुक मासिकाचे संपादक विनोद मेहता यांचे रविवारी निधन झाले.
- मेहता 72 वर्षाचे होते.