Current Affairs of 8 October 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2017)
मानवी जनुकांचा चार मितींचा नकाशा तयार करण्यात यश :
- मानवी जनुकीय घडय़ांचा चार मितींचा नकाशा तयार करण्यात आला असून त्यात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा समावेश आहे.
- स्टॅनफर्ड व हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी हे यश मिळवले असून त्यामुळे जनुकीय आजारांवर उपचारात मदत होणार आहे.
- गेली काही दशके संशोधकांना असे वाटत होते की मानवी पेशी या काही विशिष्ट पद्धतींनी एकमेकांशी संपर्कात असतात. ते एकमेकांच्या लगेच सान्निध्यात येतात व गुणसूत्राभोवती कडे करतात.
- एनएच्या घटकांची फेररचना करता येते त्यातून पेशी कुठली जनुके क्रियाशील करायची हे ठरवत असतात.
- 2014 मध्ये वैज्ञानिकांनी असे सांगितले होते की, ही वेटोळी शोधता येतात.
- यातील पहिले नकाशे हे स्थिर स्वरूपाचे होते व त्यात वेटोळ्यातील बदल टिपता आला नव्हता.
- पेशी केंद्रकाच्या गर्दीच्या जागेत डीएनए एकमेकांना कसे ओळखतात व पेशींचा प्रतिसाद कसा नियंत्रित होतो हे आता समजत आहे.
- यापूर्वी जे नकाशे होते त्यात घडी असलेल्या जिनोमचा विशिष्ट अवस्थेत वेध घेतला जात होता पण स्थिर चित्रातून बदल कळत नव्हते त्यामुळे प्रक्रिया नेमक्या कशा घडतात हे कळत नव्हते असे स्टॅनफर्डचे विद्यार्थी सुहास राव यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
रघुराम राजन यांना मिळू शकते अर्थशास्त्रातलं ‘नोबेल’ :
- सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश आहे.
- ‘क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स’ने नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केली आहे. रघुराम राजन यांनाही या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
- क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स अॅकॅडमी ही एक संशोधन संस्था आहे. ते आपल्या संशोधनावरून नोबेल पुरस्कारांच्या संभावित विजेत्यांची यादी तयार करतात.
- वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार राजन हे त्या सहा अर्थतज्ज्ञांपैकी एक आहेत ज्यांना क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्सने यावर्षी आपल्या यादीत समाविष्ट केले आहे.
- कॉर्पोरेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
- रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.
- सर्वात कमी वयाचे (40) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) प्रमुख झालेले राजन हे 2005 मध्ये शोध निबंध सादरीकरण केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले.
- राजन यांनी अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर सादरीकरण केलं होतं.
भारताकडून पाकिस्तानच्या दोघांना वैद्यकीय व्हिसा :
- पाकिस्तानच्या एका आजारी नागरिकाला यकृत प्रत्यारोपण आणि तीन वर्षीय मुलीच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी भारताकडून व्हिसा देण्यात येणार आहे.
- विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: ही माहिती दिली.
- लाहोर येथील उजैर हुमायूं यांच्या आग्रहावरून त्यांच्या मुलीला वैद्यकीय व्हिसा देण्यात येणार असून तिच्यावर हृदय शस्त्रक्रिया होणार असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
टपाल बचत योजनांसाठीही ‘आधार’ :
- सरकारने बॅंक खात्यांपाठोपाठ आता टपाल कार्यालयांमधील बचत योजनांसाठीही “आधार” क्रमांक बंधनकारक केला आहे.
- यासोबतच, भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि किसान विकास पत्र (केव्हीसी) घेणाऱ्यांना “आधार’ क्रमांक देणे आवश्यक राहील.
- या निर्णयामुळे सर्व खातेधारकांना 31 डिसेंबरपर्यंत “आधार’ क्रमांक टपाल कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे.
- या निर्णयाबाबत सरकारने चार वेगवेगळ्या अधिसूचना जारी केल्या होत्या.
- या निर्णयानुसार “आधार” क्रमांकाची सक्ती असली, तरी ज्या खातेधारकाकडे “आधार” क्रमांक नसेल, त्याला “आधार’ क्रमांकासाठी अर्ज केल्याचा पुरावा द्यावा लागेल.
- तसेच विद्यमान खातेधारकांना 31 डिसेंबरपर्यंत आपला “आधार’ क्रमांक टपाल कार्यालयाकडे जमा करावा लागेल.
- याशिवाय, वाहन चालविण्याचा परवानाही (ड्रायव्हिंग लायसन्स) “आधार” क्रमांकाशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा